महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांची माहिती | Information about accomplished women in Maharashtra

Information about accomplished women in Maharashtra : मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. आजच्या या लेखामध्ये आपण अशाच काही महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांची माहिती (Information about accomplished women in Maharashtra) जाणून घेणार आहोत.

Information about accomplished women in Maharashtra
महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांची माहिती (Information about accomplished women in Maharashtra)

महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांची नावे (Names of accomplished women in Maharashtra)

  • दुर्गाबाई कामत
  • सुरेखा यादव
  • भाग्यश्री ठिपसे
  • हर्षिणी कण्हेकर
  • शिला डावरे
  • आमदार डॉ. भारती लव्हेकर
  • अरुणाराजे पाटील
  • स्नेहा कामत
  • रजनी पंडित
  • डॉ. इंदिरा हिंदुजा

महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांची माहिती (Information about accomplished women in Maharashtra)

आता आपण महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांची माहिती जाणून घेऊयात.

दुर्गाबाई कामत

भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री. दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ (1913) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. या दोघी माय-लेकी यांच्या या कामामुळे चित्रपटात आणि नाटकात काम करण्याकरिता भारतीय महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले.

सुरेखा यादव

पहिल्या महिला रेल्वे चालक. ही भारतीय रेल्वेची पहिली महिला ट्रेन चालक आहे. 1988 मध्ये ती भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनली. सुरेखा यादव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत. इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करणाऱ्या सुरेखा यादव यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली.

त्यांनी सर्वप्रथम 1988 मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली व त्यानंतर 8 मार्च 2011 मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजल्या जातो. त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत. त्यांना नुकतेच भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भाग्यश्री ठिपसे

या भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. या महिला इंटरनॅशनल मास्टर असून त्यांनी पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. यांना भारत सरकारकडून पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत. भागश्री ठिपसे या जागतिक ग्रॅंड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू असल्यामुळे त्यांना नुकतेच फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भागश्री ठिपसे या जागतिक ग्रॅंड मास्टर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू आहेत. या मुंबई येथे राहतात. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळातील मानाचा असा राष्ट्रीय चॅंपियनशीपचा मान मिळविला आहे तसेच,त्या साल 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. राष्ट्रकुल देशांच्या खेळात व स्पर्धेत त्यांना तीन वेळा रजत पदक प्राप्त झाले आहे. 1986 सालातील जागतिक बुद्धिबळ संघाचा ‘जागतिक महिला मास्टर’ हा बहुमान त्यांनी मिळविला आहे. बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे हे त्यांचे पती आहेत.

हर्षिणी कण्हेकर

भारताची पहिली महिला अग्निशामक 38 वर्षीय हर्षिनी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.  हर्षिनीचे सशस्त्र दलात भरती होण्याचे आणि सैन्याचा गणवेश घालण्याचे स्वप्न होते, परंतु सुदैवाने ती अग्निशामक बनली. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर हर्षिनी ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनमध्ये (ओएनजीसी) अग्निशमन अभियंता झाली.

नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून त्यांनी फायर इंजिनीअरिंगचा कोर्स केला. 2002 मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारी ती पहिली भारतीय महिला होती. इतकंच नाही तर प्रवेशानंतर हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन पुढे जाणारी ती पहिली महिला ठरली.

हर्षिनीने नागपूर प्रमुख कन्या महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. ती एनसीसी कॅडेटही होती. हर्षिनीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अनेकदा सांगितले आहे की, कोणतीही नोकरी केवळ पुरुषांसाठी किंवा केवळ महिलांसाठी असते असे मला वाटत नाही. प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो पण खरे सांगायचे तर मला ज्या गोष्टीत रस होता, मला जे आवडते तेच मी आज करत आहे.

शिला डावरे

शीला डावरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. त्यांनी सुमारे 13 वर्षे ऑटोरिक्षा चालविली व नंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी एक अकादमी सुरू केली. त्या परभणी जिल्ह्यात राहतात. त्यांना भारताचा फर्स्ट लेडी पुरस्कार मिळाला आहे.

1988 मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. रिक्षाचालकांमध्ये पुरुषांची मक्तेदारी, सामाजिक दृष्टिकोन यामुळे त्यांना  सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. योग्य प्रशिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मी त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या या कृतीची नोंद त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती.

आमदार डॉ. भारती लव्हेकर

डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापल्या. या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, महिला आरोग्य व शिक्षण यासाठीपण कामे केलीत.

स्नेहा कामत

स्नेहा कामत ह्या भारतातील प्रथम कार प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या महिला आहेत. त्या मुंबईच्या आहेत.त्यांना नुकतेच भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.महिलांना कार चालनाचे शिक्षण देण्यासाठी 2012 साली त्यांनी ‘शी कॅन ड्राईव्ह’ हा एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी कारचालनाचे सुमारे 400 महिलांना प्रशिक्षण दिले आहे.

रजनी पंडित

देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आहेत. रजनी पंडित यांना भारताचे जेम्स बाँड म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण रजनी पंडित यांनी सर्वांचा सामना केला. लहान-मोठ्या मिळून 80 हजारांहून अधिक प्रकरणे रजनीने सोडवली होती.

डॉ. इंदिरा हिंदुजा

या भारतीय डॉक्टर व प्रसूतीशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या देखरेखीखाली ६ ऑगस्ट, 1986 रोजी पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. त्यांनी गॅमीट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर या तंत्राचे विकसन करून त्याद्वारे ४ जानेवारी, 1988 रोजी पहिल्या बाळाचा जन्म होण्यास मदत केली.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील कर्तुत्ववान महिलांची माहिती (Information about accomplished women in Maharashtra) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *