Deputy collector information in marathi : उपजिल्हाधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर हे राज्य प्रशासनातील खूप महत्त्वाचे एक पद आहे. उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित गट वर्गातील पद आहे. उपजिल्हाधिकारी होण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आजच्या या पोस्टमध्ये आपण उपजिल्हाधिकारी माहिती मराठी (Deputy collector information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
उपजिल्हाधिकारी माहिती मराठी (Deputy collector information in marathi)
उपजिल्हाधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर हे राज्य प्रशासनातील खूप महत्त्वाचे एक पद आहे. हे आपल्याला तर माहित आहेच. उपजिल्हाधिकारी यांना शासनाच्या अंतर्गत विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले जाते. ती पदे म्हणजेच उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी.
उपजिल्हाधिकारी होण्यासाठी पात्रता
- उपजिल्हाधिकारी होण्यासाठी आपण वयाची अठरा वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे.
- राखीव उमेदवार ही परीक्षा 18 ते 38 वर्षापर्यंत देऊ शकतात.
- तर अराखीव उमेदवार 18 ते 43 वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात.
- एमपीएससी च्या नियमानुसार राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी सुद्धा काही मर्यादा देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा वेळा तर SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अमर्यादित वेळा आणि OBC आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 9 वेळा ही परीक्षा देता येते.
उपजिल्हाधिकाऱ्यांची कामे (Duties of deputy collector in marathi)
- उपविभागातील कायदा व सुव्यवस्था राखणे.
- जमीन महसूल गोळा करणे.
- निवडणुका घेणे.
- गावोगावी पोलीस पाटील नेमणे.
- दुष्काळ पाहणी करणे व आपत्ती व्यवस्थापन करणे.
- जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करणे.
उपजिल्हाधिकारी वेतन (Salary of deputy collector in Marathi)
उपजिल्हाधिकारी पदासाठी 56 हजार ते एक लाख 77 हजार दरम्यान पगार असतो. यामध्ये महागाई भत्ता सुद्धा मिळतो.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण उपजिल्हाधिकारी माहिती मराठी (Deputy collector information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
most powerful job post in the government exam?