औषधी वनस्पती माहिती मराठी | Medicinal plants information in marathi

Medicinal plants information in marathi : मित्रांनो आपल्या अवतीभवती अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. या वनस्पतींचे अनेक उपयोग असतात. आपल्या अनेक देशांमध्ये या वनस्पतींचे उपयोग सांगितले गेले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण औषधी वनस्पती माहिती (Medicinal plants information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents

औषधी वनस्पती नावे (Names of Medicinal plants in marathi)

  • जेष्ठमध,
  • अश्वगंधा,
  • शतावरी ,
  • काळे मिरे
  • पिंपळी,
  • हळद,
  • आवळा,
  • मंजिष्ठ,
  • कडुनिंब,
  • आले,
  • गुळवेल,
  • एरंड,
  • रानभेंडी,
  • मोरशेंड
  • वराही कंद
  • कुर्डू
  • आघाडा
  • आग्या
  • केवडा
 Medicinal plants information in marathi
औषधी वनस्पती माहिती (Medicinal plants information in marathi)

औषधी वनस्पती माहिती (Medicinal plants information in marathi)

हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन इत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग (जसे मूळ, खोड, पान, फुले, बिया, साल, इ.) व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या, लेप, तेले इत्यादी स्वरूपांत उपयोगात आणले जातात.

रानभेंडी

  • रानभेंडी ला हिंदीमध्ये जंगली भेंडी असं म्हटलं जातं. रान भेंडी ला इंग्रजी मध्ये Yellow hibiscus असे म्हणतात. रान भेंडी चे शास्त्रीय नाव Hibiscus Farcatus आहे. रानभेंडी वनस्पती आपल्याला सहसा जंगलामध्ये आढळून येते. या वनस्पतीमध्ये आपल्याला अँटी कॅन्सर युक्त घटक पाहायला मिळतात.
  • म्हणजे कॅन्सर या रोगाचे निदान करण्यासाठी या वनस्पतीची मुळे खूप उपयोगात येतात.
  • याबरोबरच त्वचाविकार, शरीराला खाज येणे, खरुज यांसारख्या आजारांसाठी रान भेंडी ची पाने खूप उपयुक्त ठरतात.
  • एखाद्या भागाला आलेली सूज कमी करण्यासाठीसुद्धा रानभेंडी च्या पानांचा लेप लावला जातो.
  • शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नपुसकत्व घालवण्यासाठी रानभेंडी च्या बिया रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी त्याचे पाणी पिले जाते.
  • रानभेंडी च्या मुलाचा काढा मुतखडा घालवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.

मोरशेंड

  • मोरशेंड ही वनस्पती तुम्ही अनेक वेळा पाहिली असेल परंतु अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही. या वनस्पतीला काटेरी फुले येतात. मोरशेंड या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Bydance Byternaneta आहे.
  • संधिवात किंवा यूरिक ॲसिड चे शरीरात प्रमाण वाढले असेल, आणि जर युरिक ऍसिड मुळे साध्या ला सूज येत असेल तर ती कमी करण्यासाठी ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते. यासाठी या वनस्पतीची कोवळी पाने खाल्ली जातात.
  • शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि जे रक्ताचे विकार असतात ते कमी करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते.

वराही कंद

  • या वनस्पतीला मटालू असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. वराही कंद या वनस्पतीला इंग्रजीमध्ये Earpotato असे म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Dioscoria Bulbeferia असे आहे.
  • या वनस्पतींची गोल आणि लहान फळे मुळव्याधासाठी खूप उपयुक्त ठरतात. परिपक्व झालेले एक फळ भाजून त्याला बारीक त्यामध्ये खडीसाखर आणि तूप घालून त्या फळाचे सेवन केल्याने मूळव्याध या आजारापासून सुटका होण्यास मदत होते.
  • पोट साफ होण्यासाठी या वनस्पती ची भाजी सुद्धा खूप उपयुक्त ठरते.

कुर्डू

  • कुर्डू ही वनस्पती आपल्याला शेतामध्ये किंवा बांधावरती सहजपणे आढळून येते. परंतु या वनस्पती बद्दल औषधी गुणधर्म आपल्याला माहित नसतात. या वनस्पतीला हिंदी मध्ये सफेद मुर्गा असे म्हटले जाते. कुर्डू या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Selosia Argentiya आहे.
  • मुतखडा, किडनी स्टोन, लघवीला जळजळ होणे, थेंब थेंब लघवी होणे, किंवा लघवी चा संसर्ग यासाठी ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते. यासाठी या वनस्पतीच्या मुळाचा काढा उपयुक्त ठरतो.

आघाडा

  • या वनस्पतीला अपमार्ग किंवा लाठजीरा असे म्हणून सुद्धा ओळखले जाते.
  • आघाडा या वनस्पतीच्या मुळाचा काढा पित्तशामक आहे. याचा काढा पोटाचे विकार, खोकला, मूळव्याध, हृदय विकार यासाठी सुद्धा हा काढा उपयुक्त ठरतो.
  • ही वनस्पती विषणाशक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा किडा चावल्यावर त्यावर या वस्पतीच्या पानांचा लेप लावावा.
  • पिसाळलेला कुत्रा चावल्यावर या वनस्पतीचे मूळ आणि कोवळा तुरा यावर लावावा.
  • उंदराच्या विषावर सुद्धा याची कोवळी पाने उपयुक्त ठरतात.
  • विंचवाचे विष उतरवण्यासाठी याचे मूळ आणि पाने उगाळून द्यावे.
  • या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण रातांधळेपणा वर सुद्धा उपयुक्त ठरते.

आग्या

  • ही वनस्पती अत्यंत दाहक आणि विषारी आहे. या वनस्पतीचे काटे हे आपल्याला टोचतात. आणि जर या वनस्पतीचे काटे आपल्या शरीराला टोचले तर आपल्या शरीराला प्रचंड खाज येते. इतकी विषारी वनस्पती सुद्धा अनेक औषधी गुणधर्म दर्शवते.
  • उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या आजारांसाठी ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते.
  • गुडघे दुखी आणि संधिवात यासाठीसुद्धा ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते.

केवडा

  • केवढा ही बहुउपयोगी वनस्पती आहे. केवढा या वनस्पतीच्या फुलांचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी आणि सुगंधी औषधे तयार करण्यासाठी केला जातो. केवढा या वनस्पतीला हिंदीमध्ये केतकी असे म्हणतात. याच वनस्पतीला संस्कृत मध्ये गंधपुष्प, इंदूकलिका असे म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Pandanus Odoratissimus आहे.
  • या वनस्पतीची पाने काटेरी तीक्ष्ण स्वरूपाची असतात. या वनस्पतीची पाने ही विषनाशक असतात.
  • या वनस्पतीची पाने कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाला पसरण्यापासून वाचवतात.
  • अनेक प्रकारच्या त्वचा विकारांसाठी या वनस्पतीची पाने खूप उपयुक्त ठरतात.
  • केवड्याचे तेल ही डोकेदुखी, गुडघेदुखी, संधिवात आणि सूज अश्या विकारांसाठी उपयुक्त ठरते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

औषधी वनस्पती तुळस माहिती मराठी

आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.

तुळस वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत.आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात.

अडुळसा औषधी वनस्पती

अडुळसा ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात.

साधारणपणे 2000 वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत.

आजीबाईचा औषधी वनस्पतीचा बटवा

जुन्या काळात जेव्हा आपण आजारी पडत होतो तेव्हा आपली आजी डॉक्टरांकडे जाण्याअगोदर काही उपाय करायची. त्यालाच आजीबाईचा औषधी वनस्पतीचा बटवा असे म्हणतात.

ब्राह्मी औषधी वनस्पती

याचा जत्रुवर (मानेच्या वरील रोग) फारच उपयोग होतो.
मेंदुला शांत ठेवायचे कार्य ब्राम्ही कडून फार चांगल्या तऱ्हेने होते.
ब्राम्ही मेंदुसाठी पुष्टीदायक आहे. डोक्यास लावावयाचे तेलात याचा वापर करतात.

कडुलिंब औषधी वनस्पती माहिती मराठी

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे. याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही.
बुद्धी तल्लख होते.
कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर उपाय म्हणून काम करते.

कोरफड औषधी वनस्पती माहिती मराठी (Medicinal plants information in marathi)

कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.

सर्पगंधा औषधी वनस्पती माहिती

सर्पगंधा वनस्पतीच्या मुहीळापासून अजमालाईन, सर्पेन्टाईन, रॉऊलफाईन, रेसरपीन ही महत्त्वाची अल्कलॉईड्‌ज मिळवली जातात. यापैकी रेसरपीन हा औषधगट रक्तदाब कमी करण्यासाठी वापरला जातो. नव्‍‌र्हस सिस्टमवर ही औषधे गुणकारी आहेत. वेड्या, भ्रमिष्ट लोकांसाठी औषध म्हणून या वनस्पतीचा वापर होत असल्याने या वनस्पतीला ‘पागल की दवा’ असेही म्हणतात.

तसेच मासिक पाळी वेळेवर व योग्य प्रमाणात येण्यास मुळांचा वापर करतात. सर्पदंश झाल्यास मुळाचा लेप जखमेवर लावतात. सर्पगंधेस जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे.

जिनसेंग औषधी वनस्पती मराठी माहिती

जिनसेंग ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. यापासून तयार केलेल्या फेस पॅकचा उपयोग केल्यास त्वचा तरूण आणि डागविरहित राहण्यास मदत मिळते.

रिठा औषधी वनस्पती माहिती मराठी

अंगाचा दाह होत असल्यास रिठ्याचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो.

कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते.

रक्तचंदन औषधी वनस्पती

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

बावची औषधी वनस्पती

खडकाळ जमिनीत उगवणाऱ्या बावची वनस्पतीने त्वचेवर दिसणारा वाढत्या वयाचा प्रभाव सोबतच डाग दूर केले जाऊ शकतात. बावची ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

तज्ज्ञांनुसार, बावची ही वनस्पती खाज, खरुज, पांढरे डाग आणि दातांचं दुखणं यावर उपाय म्हणूण वापरली जाते. बावचीच्या बीयांचा आणि मूळांचा वापर औषधांसारखा केला जातो. ही मूळं बारीक करुन तुरटीमध्ये मिश्रित करुन मंजन तयार केलं जातं. याने दातांचं दुखं, कीड आणि पायरिया समस्या दूर होते.

अमरवेल औषधी वनस्पती माहिती व उपयोग

अमरवेल हे केस मजबूत करण्यासठी एकदम उत्तम आहे.

ही वनस्पती पौष्टिक व आरोग्यपुनःस्थापक असून पित्तविकार, चर्मरोग, जुनाट आमांश, मूत्रविकार इत्यादींवर उपयुक्त आहे. तिळेलातून तिचे चूर्ण केसांना लावण्यात चांगले; तसेच नेत्रदाहात हिचा रस थोडी साखर घालून डोळ्यात घालतात. जुनाट (दृढमूल) व्रणांना लोणी, आले व अमरवेलीचे चूर्ण मिसळून लावतात.

पानफुटी औषधी वनस्पती माहिती मराठी

पानफुटी वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की या वनस्पतींच्या पानांमुळे तुमचा किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा निघून जातो.

कुर्डू औषधी वनस्पती

मुतखडा, किडनी स्टोन, लघवीला जळजळ होणे, थेंब थेंब लघवी होणे, किंवा लघवी चा संसर्ग यासाठी ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते. यासाठी या वनस्पतीच्या मुळाचा काढा उपयुक्त ठरतो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण औषधी वनस्पतींची माहिती (Medicinal plants information in marathi) जाणून घेतली. औषधी वनस्पती माहिती व उपयोग ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

2 thoughts on “औषधी वनस्पती माहिती मराठी | Medicinal plants information in marathi

  1. फार छान आयुर्वेदीक औषधाची माहीती प्राप्त झाली आहे. ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *