संत्री खाण्याचे फायदे | Orange benefits in marathi

Orange benefits in marathi : महाराष्ट्रात नागपूर मध्ये संत्री हे पीक सर्वाधिक घेतले जाते. म्हणूनच आपण नागपूरची संत्री असं म्हणतो. संपूर्ण जगामध्ये संत्री हे पीक घेतले जाते. संत्री हे फळ खाण्याच्या बरोबरच त्याच्या पासून ज्यूस तसेच इतर पेये देखील बनवली जातात. तसेच संत्र्याचा वापर औषधे बनवण्यामध्ये सुद्धा केला जातो. संत्र्याचा ज्युस वर वेगवेगळी प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने बनवली जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण संत्री खाण्याचे फायदे (Orange benefits in marathi) जाणून घेणार आहोत.

संत्री माहिती मराठी (Orange information in marathi)

फळसंत्री (Orange in marathi)
कुटुंब रुटासी
विभागणीमॅग्नोलियोफायटा
वर्गमॅग्नोलिओप्सिडा
वंशमोसंबी
संत्री माहिती मराठी (Orange information in marathi)

संत्री हे एक फळ आहे. संत्री हाताने सोलल्यानंतर त्याचे स्नायू वेगळे करून चोखून खाता येतात. संत्र्याचा रस काढून आपण पिऊ शकतो. संत्री हे आरोग्यदायी फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. लोह आणि पोटॅशियम देखील पुरेसे असते. संत्र्यांची उत्पत्ती आग्नेय आशियामध्ये झाली आहे.

नागपुरी संत्री ही संत्र्याची एक जात आहे. ती मुख्यत: नागपूर जिल्हा व आसपासच्या भागात पिकविली जाते. याशिवाय मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातही पिकविली जाते. संत्र्याचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते. संत्र्याच्या झाडाची गडद हिरवी पाने आणि लहान पांढरी फुले आपल्याला आकर्षित करतात. अनेक मधमाशा ह्या फुलांच्या गोड रसाचा आनंद लुटतात.

Orange benefits in marathi
संत्री खाण्याचे फायदे (Orange benefits in marathi)

संत्री खाण्याचे फायदे (Orange benefits in marathi)

एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यावर आपले मन प्रसन्न होते. संत्री हे फळ खाण्यासाठी जवळी स्वादिष्ट आहे तितकेच ते आरोग्यवर्धक देखील आहे. एका व्यक्तीला जेवढ्या विटामिन सी ची आवश्यकता असते ती दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते.

दररोज एका संत्री चे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यामध्ये वृद्धी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपाय म्हणून देखील काम करते. चला तर मग आता आपण संत्री खाण्याचे फायदे (Orange benefits in marathi) जाणून घेऊयात.

1) संत्र्याचा रस पिल्याने जखम लवकर भरते. कारण संत्री मध्ये फोलेट तत्व असते. हे शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी मदत करते.

2) संत्री सेवन केल्याने सर्दी दूर होते. यासोबतच कोरडा खोकला दूर करण्याचा देखील संत्री मदत करते.

3) संत्री हे फळ ओला खोकला असलेल्या कफला पातळ करून बाहेर काढते.

4) संत्री मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी लोह आणि पोटॅशियम असते. संत्री ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये फ्रुक्टोज, डेक्स्त्रोज, खनिजे आणि विटामिन असतात. आणि हे शरीरात पोहोचल्यावर लगेच ऊर्जा देण्याचे काम करतात.

5) संत्र्याच्या रसाचा एक ग्लास संपूर्ण शरीराला आरामदायी करतो. यामुळे आपला तणाव आणि थकवा दूर होतो. यासोबतच मस्तकामध्ये ताजेपणा येतो.

6) पोट साफ न होण्याची समस्या असेल तर संत्रीच्या रसामध्ये बकरीचे दूध मिसळून प्यायल्याने खूप फायदा मिळतो.

7) संत्री चे नियमित सेवन केल्याने मुळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्त्राव थांबवण्याची क्षमता सुद्धा संत्री मध्ये असते.

8) एखाद्या व्यक्तीला खूप ताप आला असेल तर त्याला संत्री चा रस दिल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी होते.

9) संत्री या फळांमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड मूत्र रोग आणि किडनीच्या आजारांना दूर करते.

10) हृदयरोग असणाऱ्या लोकांना संत्री चा ज्युस मध्ये मध्ये मध टाकून दिल्याने आश्चर्यकारक फायदे होतात.

11) संत्री च्या नियमित सेवन केल्याने दात आणि हिरड्या चांगल्या राहतात. दात पांढरे होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या दूर होते.

12) संत्री या फळांमध्ये अँटीऑक्सीडेंट अधिक प्रमाणात असतात. जे कॅन्सरच्या प्रभावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

13) कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी अनेक लोक नियमित संत्री चा रस पितात.

14) लहान मुलांसाठी संत्री चा रस अमृतासमान आहे. मुलांना स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी गोड संत्रीच्या दोन-तीन फोडींचा रस दुधात टाकून प्यायला दिल्याने हे एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करते.

15) जेव्हा लहान मुलांचे दात उगवतात तेव्हा त्यांना उलटी आणि अतिसार होतो. त्यावेळी संत्री चा ज्युस लहान मुलांना दिल्याने त्यांची अस्वस्थता दूर होते. हे लहान मुलांमध्ये पचनशक्ती वाढवण्याचे सुद्धा काम करते.

16) पोटातील गॅस, अपचन, उच्च रक्तदाब या रोगांसाठी संत्री हे रामबाण औषध आहे.

17) गरोदर महिला किंवा यकृतीचा रोग झालेल्या महिलांसाठी संत्री चा ज्युस खूप फायदेशीर ठरतो.

18) गरोदर काळामध्ये संत्री या फळाचे सेवन केल्याने प्रसववेदना पासून मुक्ती मिळते. या सोबत बाळाचे आरोग्य खूप चांगले राहते.

19) लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने आराम मिळतो.

20) संत्री चे ताजे फुल बारीक करून त्याचा रस केसांना लावल्याने केसांची चमक वाढते. केस लवकर वाढतात आणि त्यांचा काळे पणा वाढतो.

21) संत्री या फळाचे त्याच्या मोसमामध्ये नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

22) डायटिंग न करताही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करणे शक्य आहे.

23) संत्र्याचा ज्यूस बनवण्यासाठी संत्रीची साल काढून त्याचा ज्यूस काढून घ्यावा. ज्युस मध्ये थोडी साखर आणि मीठ टाकावे.

24) उन्हाळ्यामध्ये मध्ये थकवा आणि तणाव अधिक प्रमाणात जाणवतो. त्यासाठी संत्र्याचे सेवन केल्याने यावर गुणकारी ठरते.

संत्र्याच्या सालीचे फायदे

  • संत्री या फळांची साल वाळवून त्याचे चूर्ण तयार करून हे चूर्ण गुलाब जल किंवा दुधात टाकून चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि पिंपल्स दूर होतात. सावळेपणा दूर करण्यासाठी सुद्धा संत्री खूप उपयुक्त ठरते.
  • संत्र्याच्या सालीपासून तेल काढले जाते. हे तेल अंगावर लावल्याने डास चावत नाहीत.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते?

महाराष्ट्रात नागपूर मध्ये संत्री हे पीक सर्वाधिक घेतले जाते. म्हणूनच आपण नागपूरची संत्री असं म्हणतो.

संत्री जाती नावे / संत्री च्या जाती

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संत्र्यांचे 400 प्रकार आहेत.
1) गोड नारिंगी जाती
2) कडू संत्रा वाण

संत्री कोणत्या ऋतूत येते?

संत्री हिवाळा या ऋतूत येते.

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण संत्री खाण्याचे फायदे (Orange benefits in marathi) जाणून घेतले. संत्री माहिती मराठी (Orange information in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. Orange in Marathi ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *