एमएससीआयटी चा फुल फॉर्म काय आहे | MSCIT Full form in marathi

MSCIT Full Form in Marathi : कॉम्प्युटर हा आजच्या काळात सर्वांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आणि याबद्दल जाणून घ्यायला सर्वांनाच आवडते. आणि भविष्यात सुद्धा याबाबतीत लोक जागृत राहतील. कॉम्प्युटर शिकण्यासाठी अनेक पद्धतीचे कोर्सेस बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा कोर्स म्हणजे एमएससीआयटी. आजच्या या पोस्टमध्ये आपण एमएससीआयटी म्हणजे काय (MSCIT Information in Marathi), एमएससीआयटी चा फुल फॉर्म काय आहे (MSCIT Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एमएससीआयटी म्हणजे काय (MSCIT Information in Marathi)

एमएससीआयटी हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध कॉम्प्यूटर विषयी माहिती देणारा कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी साधारणपणे तीन महिन्याचा असतो. कारण हा एक कॉम्प्युटर चा सर्वात बेसिक कोर्स आहे. जर तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल काहीही माहिती नसेल तरीही तुम्ही हा कोर्स करू शकता. यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल खूप चांगली माहिती मिळेल.

एमएससीआयटी हा कोर्स 2001 मध्ये MKCL द्वारे सुरू केला गेला होता. आणि याला काही दिवसातच खूप प्रसिद्धी मिळाली. दहावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हा तीन महिन्यांचा कोर्स पूर्ण करतात. या कोर्सची फी सुद्धा जास्त नाही. याची फी तीन महिन्यासाठी जास्तीत जास्त चार हजार रुपये असते.

एमएससीआयटी या कोर्स मध्ये आपल्याला थेरी आणि प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते. याबरोबरच यामध्ये e-learning based self-learning sessions through MKCLs e-learning revolution foe All म्हणजेच ERA च्या माध्यमातून शिकता येते.

MSCIT Full form in marathi
एमएससीआयटी चा फुल फॉर्म काय आहे (MSCIT Full form in marathi)

एमएससीआयटी चा फुल फॉर्म काय आहे (MSCIT Full form in marathi)

एमएससीआयटी चा फुल फॉर्म आहे (MSCIT Full form in marathi) Maharashtra State Certificate In Information Technology. यालाच मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र असे म्हणतात. एमकेसीएल (Maharashtra Knowledge Corporation LTD) द्वारे हा कोर्स तयार केला गेला आहे. हा भारतातील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे (एमएसबीटीई) दिला जाणारा एक लोकप्रिय संगणक साक्षरता अभ्यासक्रम आहे.

एमएससीआयटी मध्ये काय शिकवले जाते (MSCIT syllabus in Marathi)

 • Windows 7
 • Internet
 • MS Word 2013
 • MS Excel 2013
 • MS PowerPoint 2013
 • MS outlook
 • ERA

एमएससीआयटीपरीक्षा (MSCIT Exam)

तीन महिन्याचा संपूर्ण कोर्स झाल्यानंतर शंभर मार्काची एक परीक्षा असते. ज्यामध्ये आपल्याला काही प्रॅक्टिकल्स आणि थेरी प्रश्न विचारले जातात. जे आपल्याला सोडवावे लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला एमएससीआयटी पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट मिळते.

एमएससीआयटी हा कोर्स कोण करू शकते?

 • विद्यार्थी
 • ज्यांना कॉम्प्युटर शिकण्याची इच्छा आहे असे लोक.
 • जे लोक कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आपले भविष्य बनवू इच्छित आहेत असे लोक.
 • जे आपण आधी करत असलेल्या कॉम्प्युटरशी संबंधित नोकरी मध्ये प्रमोशन मिळवू इच्छितात असे लोक.
 • बेसिक कॉम्प्युटर शिकणारे लोक.
 • स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लोक.
 • एमएससीआयटीसाठी कोणतेही विशिष्ट पात्रता निकष नाहीत. ज्याला संगणकाच्या मूलभूत गोष्टी शिकण्यात आणि लोकप्रिय ऑफिस उत्पादकता सॉफ्टवेअरमध्ये प्राविण्य मिळविण्यात स्वारस्य आहे तो या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो.

एमएससीआयटी हा कोर्स आपण कोठे करू शकतो?

एमएससीआयटी शिकवणारी अनेक इन्स्टिट्यूट आपल्या शहरांमध्ये असतात. तेथे जाऊन आपण चौकशी करू शकतो. आणि अशा ठिकाणी आपण एमएससीआयटी साठी प्रवेश घेऊ शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एम एस सी आय टी कोर्स कोणी सुरू केला?

एम एस सी आय टी कोर्स महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) यांनी सुरू केला आहे.

एम एस सी आय टी चा कालावधी (ms-cit course duration)

एमएससीआयटी हा कोर्स साधारणपणे तीन महिन्यांचा असतो.

एमएससीआयटी कोर्स ची फी किती असते (ms-cit course fees)

एमएससीआयटी कोर्स ची फी साधारणपणे 3500 ते 4000 असते.

एमएससीआयटी पूर्ण केल्यानंतर करिअरच्या संधी काय आहेत?

एमएससीआयटी पूर्ण केल्यानंतर उमेदवार आयटी, बीपीओ आणि केपीओसह विविध उद्योगांमध्ये काम करू शकतात. ते डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट किंवा कस्टमर सपोर्ट रोलमध्ये देखील काम करू शकतात.

एमएससीआयटीला सरकारची मान्यता आहे का?

होय, एमएससीआयटी हा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे (एमएसबीटीई) मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे आणि महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मौल्यवान पात्रता मानली जाते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एमएससीआयटी म्हणजे काय (MSCIT Information in Marathi), एमएससीआयटी चा फुल फॉर्म काय आहे (MSCIT Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

3 thoughts on “एमएससीआयटी चा फुल फॉर्म काय आहे | MSCIT Full form in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *