मेंढी प्राणी माहिती मराठी | Sheep information in marathi

Sheep information in marathi : मेंढी हा एक चतुष्पाद पाळीव प्राणी आहे, ज्याचं पालन मनुष्य खूप काळापासून करत आला आहे. मेंढी हा मानवाच्या इतिहासातला सर्वात आधी पाळला गेलेला प्राणी आहे. याची सुरुवात सुमारे नऊ ते अकरा हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा एक अंदाज आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण मेंढी प्राणी माहिती मराठी (Sheep information in marathi) जाणून घेणार आहोत.

Sheep information in marathi
मेंढी प्राणी माहिती मराठी (Sheep information in marathi)

मेंढी प्राणी माहिती मराठी (Sheep information in marathi)

1) मेंढी पूर्ण जगभर आढळते. मेंढीचे आयुष्यमान सरासरी आठ वर्षाचे असते. परंतु काही मेंढ्या यापेक्षाही जास्त जगतात.

2) मेंढी एक शाकाहारी प्राणी आहे. जो गवत आणि अन्नधान्य खातो. मेंढी मध्ये ऐकण्याची क्षमता खूप जास्त असते.

3) मेंढीचे पालन मुख्य रूपात त्याच्या लोकरीसाठी केले जाते. त्याच्या शरीरावर ची लोकर ही आयुष्यभर वाढत असते.

4) मेंढीच्या लोकरीची उत्पादनक्षमता तिच्या जातीवर अवलंबून असते. उत्तम जातीच्या मेंढ्यांची पैदास केल्याने लोकरीची उत्पादन क्षमता वाढते.

5) मेंढीचे दुध खूप पौष्टिक असतं. कारण यामध्ये प्रोटीन ची मात्रा जास्त प्रमाणात असते.

6) मेंढी एक स्तनदायी प्राणी आहे. ज्याला चार पाय असतात. मेंढीची ओळखी तिच्या कातडी वरून म्हणजेच लोकरीवरून होते.

7) मेंढीची लक्षात ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते. मेंढी काही वर्षापर्यंत एखादी गोष्ट लक्षात ठेवू शकते.

8) मेंढीच्या काही प्रजाती मध्ये शिंगे आढळतात. परंतु जास्त करून प्रजातीमध्ये शिंगे नसतात.

9) चीन मध्ये सर्वात जास्त मेंढ्या आढळतात.

10) वाघ, सिंह, कुत्रा हे मेंढीचे शिकारी असतात.

मेंढी माहिती मराठी (Mendhi mahiti marathi)

11) पूर्ण जगामध्ये एक अरब पेक्षा जास्त मेंढ्या आहेत.

12) मेंढ्या कळपामध्ये राहण्यास पसंद करतात.

13) मेंढी हा प्राणी मुळात युरोप व आशिया या खंडांचा रहिवासी आहे.

14) मेंढीची लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो.

15) मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात.

16) ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्त मेंढी पालन केले जाते. ऑस्ट्रेलियातील वातावरण मेंढी पाळण्यासाठी पूरक असल्याने तेथे मेंढी पालन हा मुख्य व्यवसाय आहे.

17) भारतात मेंढ्यांच्या विविध 39 जाती आढळतात. भारतीय मेंढ्यांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत.

18) एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मेंढ्या 50 इतर मेंढ्यांचे चेहरे ओळखू शकतात आणि त्यांना दोन वर्षे लक्षात ठेवू शकतात.

19) मेंढ्या मानवांप्रमाणेच विविध प्रकारच्या भावनांचा अनुभव घेण्यास सक्षम असतात. अनेक अभ्यासांनी मेंढ्यांची भीती, राग, कंटाळा, दुःखी आणि आनंदी वाटण्याची क्षमता ठळक केली आहे.

20) मेरिनो, रॉम्नी, कॉट्सवोल्ड आणि रॅम्बुइलेट जाती या काही लोकर पुरवणाऱ्या चांगल्या प्रदाता म्हणून ओळखल्या जातात.

मेंढी विषयी माहिती (Sheep information in marathi)

21) डॉर्पर, हॅम्पशायर, साउथडाउन, सफोक, आणि शेविओट या जाती मांस उत्पादनासाठी वाढवल्या जातात.

22) दुग्धोत्पादनासाठी ईस्ट फ्रिजियन, फिन्निश लँड्रेस आणि पॉलीपे या सर्वात लोकप्रिय मेंढीच्या जाती आहेत.

23) चीन, ऑस्ट्रेलिया, भारत, नायजेरिया आणि सुदान हे सर्वात जास्त मेंढ्यांची संख्या असलेले देश आहेत.

24) कापूस किंवा रेशमापासून बनवलेल्या कपड्यांपेक्षा लोकरीचे कपडे जास्त काळ टिकतात.

25) एक मेंढी प्रति वर्ष 30 पौंड लोकर तयार करू शकते.

26) मेंढीच्या दुधात प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखे पौष्टिक पदार्थ आणि व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, आणि व्हिटॅमिन डी यांसारखे जीवनसत्त्वे जास्त असतात.

मेंढ्यांच्या महाराष्ट्रातील जाती

महाराष्ट्रात मेंढ्यांच्या दख्खनी व माडग्याळ या दोनच प्रमुख जाती आढळतात. दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात. माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढ्यांना हे नाव पडले.

मेंढ्यांच्या परदेशी जाती

मेंढ्यांच्या विदेशी जातींमध्ये मेरिनो, रॅमब्युलेट, चेव्हिओट, कॉरिडेल, डॉरसेट, साऊथ-डाऊन, पोलवर्थ, सफॉल्क विशेष प्रसिद्ध आहेत. मेरिनो मेंढीचे उगमस्थान स्पेन असून उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी ती जगप्रसिद्ध आहे. संकरीकरणाद्वारे स्थानिक मेंढ्यांचे लोकर उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी मेरिनो नरांचा विविध देशांत वापर केला जातो. सफॉल्क, डॉरसेट, साऊथ-डाऊन मेंढ्यांचे उगमस्थान इंग्लंड असून त्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.

मेंढीपालन

मेंढ्यांचा माणसाशी संबंध प्राचीन काळापासूनचा असून मेंढीपालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. मेंढीपालकांना केवळ मेंढ्यांपासून लोकर आणि मांस मिळत नाही तर मेंढीचे खत देखील जमीन अधिक सुपीक बनवते.

  • मालपुरा, जैसलमेरी, मंडिया, मारवाडी, नली शबाबाद आणि छोटानागपुरी आणि बिकानेरी, मारिनो, कोरिड्याल, रामबुटू इत्यादी मेंढ्या मांसासाठी निवडाव्यात.
  • मुख्यतः मालापुरा, जैसलमेरी, मारवाडी, शहााबाद आणि छोटानागपुरी ह्या मेंढ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मेंढी पासून आपल्याला काय मिळते?

मेंढी पासून आपल्याला दूध आणि लोकर मिळते.

मेंढीचा आवाज

मेंढी में में असा आवाज काढते.

मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात?

मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात.

माडग्याळ मेंढी

माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढ्यांना हे नाव पडले आहे.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण मेंढी प्राणी माहिती मराठी (Sheep information in marathi) जाणून घेतली. मेंढी माहिती मराठी (Mendhi mahiti marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *