बीयूएमएस म्हणजे काय | BUMS full form in marathi

BUMS full form in marathi : अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांव्यतिरिक्त युनानी औषधाचे नाव तुम्ही ऐकले असेलच. जर तुम्ही हा शब्द पहिल्यांदा ऐकत असाल तरीही काही अडचण नाही. ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला बीयूएमएस म्हणजे काय (BUMS information in marathi) आणि बीयूएमएस चा फुल फॉर्म (BUMS full form in marathi) काय आहे हे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल.

BUMS full form in marathi
बीयूएमएस चा फुल फॉर्म काय आहे (BUMS full form in marathi)

बीयूएमएस म्हणजे काय (BUMS information in marathi)

तुम्हाला माहित आहे का?

सध्या देशात 263 नोंदणीकृत युनानी रुग्णालये आहेत. बंगळूरु येथे राष्ट्रीय युनानी चिकित्सा संस्था आहे. युनानी औषधोपचार पद्धतीचा प्रसार या संस्थेमार्फत केला जातो.

बीयूएमएस म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन आणि सर्जरी. यालाच युनानी औषधोपचार पद्धती असे म्हणतात. युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत.

युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. यापैकी कोणत्याही घटकाचा अपव्यय किंवा त्यांच्या भौतिक स्थितीतील बदल आजाराला किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ही सात घटकतत्त्वे खालीलप्रमाणे आहेत :

1) अल्‌-अरकान किंवा अल्‌-अनासीर (मूलद्रव्य)
2) अल्‌-मिजाज (स्वभाव किंवा प्रवृत्ती)
3) अल्‌-अखलात (शारीरिक द्रव्ये)
4) अल्‌-आझा (अवयव)
5) अल्‌-अखाह (जीवनावश्‍यक स्फूर्ति)
6) अल्‌-कवा (शक्ती)
7) अल्‌-अफआल (शारीरिक क्रिया)

युनानी रोगनिवारक शास्त्राच्या तत्त्वानुसार, युनानी चिकित्सकाला रोग्याच्या खालील बाबी नेहमीच लक्षात घेतल्या पाहिजेत. उदा. रोग्याची प्रवृत्ती, स्वभाव, भावना, वागणूक, सवयी, मूलस्थान, राहणीमान, जीवनपद्धती, जात, व्यवसाय, हवामान व पर्यावरण.

युनानी ही खरेतर पारंपारिक औषधांची एक शाखा आहे, जी दक्षिण आशियामध्ये उपचार आणि आरोग्य देखरेखीसाठी वापरली जात होती.

बीयूएमएस चा फुल फॉर्म (BUMS full form in marathi)

बीयूएमएस चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. यालाच मराठी मध्ये युनानी औषध व शस्त्रक्रिया पदवी असे म्हणतात. हा एक प्रकारचा बॅचलर डिग्री कोर्स आहे. जो 5.5 वर्षात पूर्ण होतो ज्यामध्ये 1 वर्षाची इंटर्नशिप समाविष्ट असते.

बीयूएमएस प्रवेशासाठी पात्रता

1) बीयूएमएस अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) या दोन्ही वर्गात कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक असते.
3) बारावी मध्ये PCB (Physics, Chemistry, Biology) आणि English हे विषय असणे आवश्यक असते.

BUMS अभ्यासक्रमानंतर नोकरीच्या संधी (BUMS course career opportunities)

  • Research Officer
  • Unani Consultant
  • Unani Physician
  • Unani Publication Officer
  • Unani Medical Officer
  • Healthcare Community

BUMS कोर्स साठी किती खर्च येतो (BUMS course fees)

सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की BUMS ची फी प्रत्येक कॉलेजची सारखी नसते, ती वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगळी असते आणि या कोर्सची फी 50,000 ते 5,00,000 च्या आसपास असू शकते.

बीयूएमएस चे इतर फुल फॉर्म (BUMS other full forms in marathi)

  • Bath University Maths Society (गणित सोसायटी युनिव्हर्सिटी बाथ)
  • Brandon University Music Students (संगीत विद्यार्थी विद्यापीठ ब्रँडन)
  • Bristol University Music Society (संगीत सोसायटी विद्यापीठ ब्रिस्टल)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

युनानी या उपचार पद्धतीचा सर्वप्रथम उगम कोणत्या देशात झाला?

युनानी या उपचार पद्धतीचा सर्वप्रथम उगम ग्रीस देशात झाला.

Unani meaning in marathi

युनानी चिकित्सा पद्धती भारतात फार पुरातन काळापासून प्रभावशाली पद्धतीने वापरली जात आहे. भारताला हिची ओळख अरब आणि पर्शिअन लोकांनी अकराव्या शतकाच्या आसपास करुन दिली आहे.

Dot उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते?

Dot उपचार पद्धती क्षय रोगासाठी वापरली जाते.

युनानी म्हणजे काय?

युनानी प्रणालीत, प्रत्येकाचा स्वभाव हा फार महत्वाचा आहे कारण तो अद्वितीय मानला जातो.

बीयूएमएस म्हणजे काय?

बीयूएमएस हा साडेपाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे जो विद्यार्थ्यांना पारंपारिक युनानी औषध पद्धतीचे प्रशिक्षण देतो.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बीयूएमएस म्हणजे काय (BUMS information in marathi) ही माहिती जाणून घेतली. बीयूएमएस चा फुल फॉर्म (BUMS full form in marathi) काय आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *