नायब तहसीलदार विषयी माहिती | Naib Tahasildar information in marathi

Naib Tahasildar information in marathi : नायब तहसीलदार हे प्रशासनातील एक महत्त्वाचे पद आहे. नायब तहसीलदार या अधिकाऱ्या विषयी तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकले असेल. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की नायब तहसीलदार म्हणजे काय, तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नायब तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar information in marathi) जाणून घेणार आहोत.

Naib Tahasildar information in marathi
नायब तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar information in marathi)

नायब तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar information in marathi)

नायब तहसीलदार हे राजपत्रित गट ब वर्गातील पद आहे. राज्यशासन एका तालुक्यासाठी एक किंवा त्यापेक्षा जास्त नायब तहसीलदार यांची नेमणूक करते. नायब तहसीलदार होण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तीन टप्पे आहेत. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की ही मुलाखत कोणत्या भाषेत द्यावी लागते? तरी एमपीएससी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची मुलाखत आपण हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देऊ शकतो.

नायब तहसीलदार शैक्षणिक योग्यता

नायब तहसीलदार या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक असते. नायब तहसीलदार होण्यासाठी कोणत्याही पद्धतीची शारीरिक पात्रता विचारात घेतली जात नाही.

नायब तहसीलदार वयोमर्यादा (Age limit of Naib Tahasildar)

नायब तहसीलदार होण्यासाठी आपल्याला वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते. राखीव उमेदवारांनाही परीक्षा 18 ते 38 वयापर्यंत देता येते. तर अराखीव विद्यार्थ्यांना ही परीक्षा 18 ते 40 वर्षापर्यंत देता येते. दिव्यांग विद्यार्थ्यांना ही परीक्षा 18 ते 45 वयापर्यंत देता येते.

नायब तहसीलदार कसे व्हावे (How to become Naib Tahasildar)

नायब तहसीलदार होण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून घेतली जाणारी राज्य सेवा आयोगाची परीक्षा आपल्याला द्यावी लागते. या परीक्षेचे मुख्य तीन टप्पे असतात. सर्वात पहिल्यांदा पूर्व परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतात. आणि या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असतो. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाते.

मुख्य परीक्षेमध्ये चार पेपर द्यावे लागतात. मुख्य परीक्षा ही पूर्व परीक्षेचे तुलनेने थोडी कठीण असते. मुख्य परीक्षेत मिळालेल्या अंकांच्या आधारावरच आपल्याला रँकिंग दिली जाते. मुलाखत ही यातील सर्वात शेवटची प्रक्रिया असते. मुलाखतीला ला फक्त त्याच विद्यार्थ्यांना बोलावले जाते जे मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात. मुलाखत दाराकडून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, आणि आपल्याला यामध्ये उत्तरे द्यावी लागतात. मुलाखती मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी बोलावले जाते.

नायब तहसीलदार यांची कामे (Duties of Naib Tahasildar)

  • जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे काम नायब तहसीलदार करत असतो.
  • महसुली कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम करतो.
  • जमीन महसूल, कालवा महसूल इतर सरकारी कर व त्याबरोबरच सरकारी देय वसूल करण्याचे काम नायब तहसीलदार करतो.
  • तहसीलदारांना जी कामे असतात तीच कामे नायब तहसीलदार यांना सुद्धा असतात. फरक फक्त इतकाच आहे की तहसीलदार हे राजपत्रित गट अ वर्गातील पद आहे तर नायब तहसीलदार हे राजपत्रित गट ब वर्गातील पद आहे.

नायब तहसिलदार पगार (Naib Tahasildar Salary)

नायब तहसीलदाराला पगाराच्या रूपामध्ये 9300 ते 34800 रुपयापर्यंत पगार दिला जातो. याबरोबरच राहण्यासाठी सरकारी घर वाहन आणि अन्य कर्मचारी सुद्धा दिले जातात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नायब तहसीलदाराला किती पगार असतो?

9300 ते 34800 रुपये.

नायब तहसीलदार होण्यासाठी वयोमर्यादा काय असावी लागते?

नायब तहसीलदार होण्यासाठी आपल्याला वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar information in marathi) जाणून घेतली. नायब तहसीलदार माहिती मराठी (Naib Tahasildar mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

3 thoughts on “नायब तहसीलदार विषयी माहिती | Naib Tahasildar information in marathi

  1. सत्यप्रती attested करण्याचे अधिकार असल्याचे नियम कृपया सांगावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *