NEFT चा फुल फॉर्म काय आहे | NEFT Full Form in Marathi

NEFT Full form in marathi : NEFT ही एक भारतीय रिझर्व बँक द्वारे सुरू केलेली सेवा आहे. या सेवेच्या मदतीने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवू शकतो. याबद्दल अजूनही काही लोकांना माहिती नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण NEFT म्हणजे काय (NEFT information in marathi), NEFT चा फुल फॉर्म काय आहे (NEFT Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

NEFT म्हणजे काय (NEFT information in marathi)

आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला सर्व कामे खूप जलद व्हावी असे वाटते. लांब रांगेमध्ये तासनतास उभे राहण्यासाठी कोणालाही वेळ नाही. याच गोष्टीचा विचार करून आपल्या सुविधेसाठी ऑनलाइन पेमेंट चा शुभारंभ झाला. आज आपण बँकेला न जाता,  वाट न पाहता लगेच पैसे पाठवू शकतो.

या सुविधेचा वापर NEFT च्या माध्यमातून केला जातो. जे लोक ऑनलाईन बँकिंग चा वापर करतात त्यांना याबद्दल नक्कीच माहित असेल. एनइएफटी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर जी भारतीय रिझर्व बँकेद्वारे सुरु केलेली इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टिम आहे. जी आपल्याला जगभरातील कोणत्याही वेळेला आणि कधीही दोन बँकांमध्ये पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
2005 मध्ये सुरू झालेली ही सुविधा आज जवळ जवळ सर्व बँकेने स्वीकारली आहे. यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे जो ग्राहक पैसे पाठवत आहे त्याची शाखा NEFT साठी सक्षम असावी.

NEFT Full Form in Marathi
NEFT चा फुल फॉर्म काय आहे (NEFT Full Form in Marathi)

NEFT चा फुल फॉर्म काय आहे (NEFT Full Form in Marathi)

NEFT चा फुल फॉर्म आहे (NEFT Full Form in Marathi) National Electronic Funds Transfer. यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असे म्हणतात.

NEFT चा अर्थ काय आहे (NEFT meaning in Marathi)

NEFT चा अर्थ आहे (NEFT meaning in Marathi) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. ही एक पैसे पाठवण्याची प्रक्रिया आहे. यालाच इंग्रजीमध्ये National Electronic Funds Transfer असे म्हणतात.

NEFT कसे काम करते?

NEFT व्यवहार करण्यासाठी इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या लोकांकडे थर्ड पार्टी व्यवहार ऍक्टिव्हेट करणे गरजेचे असते. याशिवाय आपल्याला ज्या व्यक्तीशी ही प्रक्रिया करायची आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. जसे की अकाउंट होल्डरचे नाव, त्याचा अकाउंट नंबर, ब्रांच चे नाव, आयएफएससी कोड इत्यादी.

  • जेव्हा आपल्याला कोणाशी तरी हा व्यवहार करायचा असेल तेव्हा आपल्याला त्याला Verify करण्यासाठी काही तासांचा वेळ लागतो. तेव्हाच आपण त्या अकाउंट वर पैसे ट्रान्सफर करू शकतो.
  • या प्रक्रियेमध्ये आपल्याला पैसाचे व्यवहार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा NEFT किंवा RTGS यामधील एक निवडावे लागते. त्यानंतर ज्याच्याशी आपल्याला व्यवहार करायचा आहे त्याची सर्व माहिती टाकून सेक्युरिटी पासवर्ड टाकल्यानंतर फंड ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी जवळजवळ काही तासांचा वेळ लागतो. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते.

NEFT वरून पैसे कसे पाठवावेत?

  • सर्वात पहिल्यांदा आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड याचा उपयोग करून आपले ऑनलाईन बँकिंग खाते लॉगिन करावे लागते.
  • आता आपण होम पेजवर जाऊन तेथील NEFT Fund Transfer वर जावे लागेल.
  • ज्याला आपल्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव, त्याचा अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड टाकून त्यामध्ये ऍड करावे.
  • ही सर्व माहिती बरोबर असल्यास आपण NEFT द्वारे पैसे पाठवू शकतो. आपल्याला किती राशी पाठवायची आहे तितकी टाकली म्हणजे झालं.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बँकेचे प्राथमिक कार्य कोणते?

ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात.

ई बँकिंग म्हणजे काय?

इ- बँकिंग म्हणजे “इलेक्ट्रॉनिक बँकिंग”होय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून केला जाणारा बँक व्यवसाय म्हणजे इ- बँकिंग होय. जेव्हा बँक सेवा पुरवण्याच्या व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाची अत्याधुनिक साधने वापरली जातात तेव्हा त्यास इ- बँकिंग असे म्हणतात.

बँकेचे प्रकार

1) मध्यवर्ती बँक
2) व्यावसायिक बँक
3) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
4) खासगी क्षेत्रातील बँका
5) सहकारी बँक

राष्ट्रीयकृत बँकेची नावे

1) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
2) इलाहाबाद बँक
3) आंध्रा बँक
4) बँक ऑफ बड़ौदा
5) बँक ऑफ इंडिया
6) बँक ऑफ महाराष्‍ट्र
7) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
8) पंजाब नॅशनल बँक

बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते?

बँकांची बँक म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडिया ओळखली जाते.

सहकारी बँक म्हणजे काय?

सहकारी बँकिंग ही सहकारी तत्त्वावर आयोजित किरकोळ आणि व्यावसायिक बँकिंग आहे. सहकारी बँकिंग संस्था जगातील बहुतेक भागांमध्ये ठेवी घेतात आणि पैसे कर्ज देतात.

इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक कोणती

ICICI बँक ही इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक आहे.

मध्यवर्ती बँकेचे कार्य

मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असून देशाचे मौद्रिक, द्रव्य विषयक धोरण तिच्यामार्फत राबवले जाते. देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते.

एनईएफटी वापरण्याचे फायदे काय आहेत?

एनईएफटी वापरण्याच्या फायद्यांमध्ये सुविधा, वेग आणि सुरक्षा समाविष्ट आहे. एनईएफटी व्यवहार ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत सुरू केले जाऊ शकतात आणि निधी सामान्यत: काही तासांच्या आत प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा केला जातो. एनईएफटी व्यवहार देखील सुरक्षित आहेत, कारण ते सुरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे प्रक्रिया केले जातात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण NEFT म्हणजे काय (NEFT information in marathi), NEFT चा फुल फॉर्म काय आहे (NEFT Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *