लोगो बनवण्यासाठी उपयुक्त असे तीन टूल | Top 3 logo design tools in marathi

Top 3 logo design tools in marathi : लोक नेहमी कंपन्यांना त्यांच्या लोगो वरून ओळखतात. उदाहरणासाठी Nike जवळ स्टिक आहे, ट्विटर जवळ पक्षी आहेत आणि लेम्बोर्गिनी जवळ बैल आहे. आपण सर्वजण या ब्रँड ना नक्कीच ओळखतो. आणि आपण यांना त्यांच्या लोगो वरून सुद्धा ओळखतो. लोगो हा कंपनीची सेवा आणि उद्देश वर्णन करण्याचा एक भाग आहे. यामुळेच ब्रँडची ओळख दाखवण्यासाठी लोगो चांगल्या पद्धतीने बनवता आला पाहिजे. लोगो बनवण्यासाठी अनेक जण ग्राफिक डिझाईनर किंवा लोगो डिझायनर ची मदत घेतात. परंतु जर तुम्हाला स्वतः ऑनलाइन लोगो बनवायचा असेल तर आजच्या या पोस्टमध्ये आपण लोगो बनवण्यासाठी उपयुक्त असे तीन टूल (Top 3 logo design tools in marathi) जाणून घेणार आहोत.

Top 3 logo design tools in marathi
लोगो बनवण्यासाठी उपयुक्त असे तीन टूल (Top 3 logo design tools in marathi)

लोगो बनवण्यासाठी उपयुक्त असे तीन टूल (Top 3 logo design tools in marathi)

1) WIX

विक्स ha वास्तवामध्ये वर्डप्रेस नंतर वापरला जाणारा सर्वात मोठा वेबसाईट बिल्डर प्लॅटफॉर्म आहे. आणि याच्या ऑनलाइन लोगो निर्माण करण्याच्या टूलच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटला एक चांगला लूक देऊ शकतो. अद्भुत लोगो बनवण्याची क्षमता आणि अनुकूल यूजर इंटर्फेस यामुळे वीक्स या प्लॅटफॉर्मचे 120 मिल्लियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

विक्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने लोगो बनवणे खूप सोपे आहे. कारण विक्स आपल्याला उच्च गुणवत्तेच्या वेगवेगळ्या फाइल्स उपलब्ध करून देतो. त्यामुळे आपण वेगवेगळ्या आकारांमध्ये लोगो सहज बनवू शकतो. आणि आपण येथून हा लोगो सहजपणे आणि फ्री मध्ये डाऊनलोड करू शकतो.

2) Adobe Illustrator

Adobe आपल्या अद्भुत सॉफ्टवेअर जसे की फोटोशॉप आणि Adobe Reader यामुळे ग्राफिक डिझाइन क्षेत्रांमध्ये नेहमी लोकप्रिय राहिला आहे. Illustrator हे Adobe चे एक टूल आहे. जे खास करून ग्राफिक डिझाईनर साठी तयार केले गेले आहे. फोटो शॉप मध्ये जरी Illustrator सारखी वैशिष्ट्ये असली तरीही लोगो डिझाईन करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा नेहमी Illustrator लाच निवडले जाते.

यामध्ये अनेक वेगवेगळी टूल्स आपल्याला पाहायला मिळतील. यातील प्रत्येक टूल चा उपयोग जाणून घेण्यासाठी आपल्याला खूप वेळ सुद्धा द्यावा लागेल.

3) Canva

हा एक ऑस्ट्रेलियाचा स्टार्टअप आहे जो आपल्याला डिझाईन टेम्प्लेट उपलब्ध करून देतो. येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोगो बनवण्यासाठी वेगवेगळी टेम्प्लेट्स पाहायला मिळतील. याचा वापर आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतो. लोगो बनवताना आपण आपल्या टीम मेंबर्स ला सुद्धा हा लोगो लाईव्ह दाखवू शकतो. याच्या मदतीने आपण आपल्याला जसा हवा तसा लोगो सहजपणे बनवू शकतो.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण लोगो बनवण्यासाठी उपयुक्त असे तीन टूल (Top 3 logo design tools in marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण ही माहिती नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *