अरुणाचल प्रदेश माहिती मराठी | Arunachal Pradesh information in marathi

Arunachal Pradesh information in marathi : अरुणाचल प्रदेश भारताच्या पूर्व भागामध्ये येतो. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. जो सूर्य उगवणारे पहिले क्षेत्र आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh information in marathi) जाणून घेणार आहोत.

Arunachal Pradesh information in marathi
अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh information in marathi)

Contents

अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh information in marathi)

राज्य अरुणाचल प्रदेश
राजधानीइटानगर
सर्वात मोठे शहर इटानगर
जिल्हे 25
लोकसंख्या13,82,611 (2011)
क्षेत्रफळ 83,743 चौकिमी
अधिकृत भाषाइंग्लिश
अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh information in marathi)

1) अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 ला झाली आहे.

2) अरुणाचल प्रदेश ची राजधानी इटानगर आहे.

3) अरुणाचल प्रदेश मधील सर्वात मोठे शहर इटानगर आहे.

4) अरुणाचल प्रदेश मध्ये एकूण 25 जिल्हे आहेत.

5) अरुणाचल प्रदेश मधील वाहनाचा कोड AR आहे.

6) अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या तेरा लाख 83 हजार 727 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारावर अरुणाचल प्रदेशचा सत्ताविसावा क्रमांक लागतो.

7) अरुणाचल प्रदेश ची राज्यभाषा इंग्लिश आहे.

8) अरुणाचल प्रदेश चे पहिले मुख्यमंत्री प्रेम खंडू थुंगण हे होते.

9) अरुणाचल प्रदेश चे पहिले राज्यपाल भीष्म नारायण सिंह हे होते.

10) अरुणाचल प्रदेश मध्ये 1.5 मिलियन पेक्षा अधिक निवासी राहतात.

अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh mahiti marathi)

11) श्री बिभासु दास शास्त्रीजी यांनी नॉर्थईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA) याचे नाव बदलून अरुणाचल प्रदेश ठेवले होते.

12) 1972 मध्ये अरुणाचल प्रदेश ला केंद्रशासित प्रदेश बनवले गेले होते. परंतु यानंतर 20 फेब्रुवारी 1987 ला याला भारतीय संघराज्य मध्ये चोविसावे राज्य बनवले.

13) अरुणाचल प्रदेशचे आदर्श वाक्य सत्यमेव जयते आहे.

14) अरुणाचल प्रदेश चा राज्य पक्षी हॉर्नबिल आहे.

15) अरुणाचल प्रदेशचा राज्यप्राणी मिथुन आहे.

16) अरुणाचल प्रदेश चा राज्य वृक्ष हॉलोंग आहे.

17) अरुणाचल प्रदेश मध्ये भात, मका, बाजरी, गहू, ऊस इत्यादी उत्पादने घेतली जातात.

18) अरुणाचल प्रदेश मधील 13 टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माची आहे.

19) अरुणाचल प्रदेश चा साक्षरता दर 2011 नुसार 66.95 टक्के आहे.

20) अरुणाचल प्रदेश मधील जलवायु उंची नुसार बदलतो.

अरुणाचल प्रदेश विषयी रोचक तथ्य (Facts about Arunachal Pradesh in marathi)

21) अरुणाचल प्रदेश मध्ये 750 पेक्षा अधिक पक्षांच्या आणि 200 पेक्षा जास्त प्राण्यांच्या प्रजाती आहेत.

22) अरुणाचल प्रदेश मध्ये कृषी व्यवसाय मुख्य रूपाने अर्थव्यवस्थेला चालवतो.

23) अरुणाचल प्रदेश चा भाग घनदाट जंगलांनी भरलेला आहे. वन्य उत्पादन राज्याच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे.

24) अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. 1962 साली युद्ध केले होते.

25) आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य इ.स. 1987 साली स्थापन झाले आहे.

26) अरुणाचलच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत.

27) भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे.

28) अरूणाचलची साक्षरता 66.95 टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते.

29) अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.

30) अरुणाचलमधील 63% रहिवासी 19 प्रमुख जमाती आणि 85 इतर जमातींचे आहेत. यापैकी बहुतेक तिबेटो-बर्मन किंवा ताई-बर्मी मूळचे आहेत. उर्वरित 35% लोकसंख्या स्थलांतरित आहे.

अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh information in marathi)

31) अरुणाचल प्रदेशातील नागरिकांच्या उपजीविकेचा मुख्य आधार शेती आहे. या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ‘ झुम ‘ शेतीवर आधारित आहे. आजकाल, बटाटे यांसारखी नगदी पिके आणि सफरचंद, संत्री आणि अननस यांसारख्या बागायती पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे.

32) अरुणाचल प्रदेश मिनरल डेव्हलपमेंट’ आणि ‘व्यापार निगम लिमिटेड’ (APMDTCL) ची स्थापना 1991 मध्ये राज्यातील अफाट खनिज संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली.

33) अरुणाचल प्रदेशमध्ये 87,500 हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे.

34) अरुणाचल प्रदेश राज्याची ऊर्जा क्षमता सुमारे 30,735 मेगावॅट आहे. राज्यातील 3,649 गावांपैकी सुमारे 2,600 गावांमध्ये विद्युतीकरण करण्यात आले आहे.

35) अरुणाचल प्रदेशातील काही महत्त्वाचे सण म्हणजे ‘आदिस’ समाजाचे ‘मापिन आणि सोलांगू’, ‘मोनपा’ समाजाचे ‘लोसार’, ‘आपटानी’ समाजाचे ‘द्री’, ‘टागिनस’ समुदायाचे ‘सी-दोनई’, ‘ इडू. सणांमध्ये ‘मिश्मी’ समुदायाचा ‘रेह’, ‘निशिंग’ समुदायाचा ‘न्योकुम’ इ. बहुतेक सणांमध्ये प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा आहे.

36) कांगटो हे अरुणाचल प्रदेश राज्यातील सर्वोच्च शिखर 7,060 मीटर उंचीचे आहे. न्यागी कांगसांग, मुख्य गोरीचेन शिखर आणि पूर्व गोरीचेन शिखर ही इतर उंच हिमालय शिखरे आहेत.

37) अरुणाचल प्रदेशातील प्रमुख नद्यांमध्ये कामेंग, सुबनसिरी, सियांग (ब्रह्मपुत्रा), दिबांग, लोहित आणि नोआ दिहिंग या नद्यांचा समावेश होतो.

38) अरुणाचल प्रदेश राज्यात मौलिंग आणि नामदाफा राष्ट्रीय उद्याने आहेत.

39) वाघ, बिबट्या, हिम बिबट्या, आशियाई हत्ती, सांभार हरण, चितळ हरिण, बार्किंग डीअर, स्लॉथ बेअर, मिथुन ( बॉस फ्रंटालिस ), गौर, ढोले, महाकाय गिलहरी, मार्बल मांजर, बिबट्या मांजर या प्रमुख प्राण्यांच्या प्रजाती अरुणाचल प्रदेश राज्यात आढळतात.

40) अधिकृत आकडेवारीनुसार अरुणाचल प्रदेश ची साक्षरता 2001 मध्ये 54.74% वरून 2011 मध्ये 66.95% वर पोहोचली आहे. साक्षर लोकसंख्या 789,943 इतकी आहे.

अरुणाचल प्रदेश प्रतीके

अरूणाचल प्रदेश बोधवाक्य सत्यमेव जयते
अरूणाचल प्रदेश राज्यप्राणीमिथुन (बॉस फ्रंटालिस)
अरूणाचल प्रदेश राज्यपक्षी हॉर्नबिल (बुसेरोस बायकोर्निस)
अरूणाचल प्रदेश राज्यमासागोल्डन महसीर (टोर पुटिटोरा)
अरूणाचल प्रदेश राज्यफूल फॉक्सटेल ऑर्किड (Rhynchostylis retusa)
अरूणाचल प्रदेश राज्यवृक्षहॉलॉन्ग (डिप्टेरोकार्पस मॅक्रोकार्पस)
अरूणाचल प्रदेश चिन्हे (Arunachal Pradesh state symbols)

अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हे (Districts in Arunachal Pradesh)

अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग आहेत. अरुणाचल प्रदेशात एकूण 25 जिल्हे आहेत, पश्चिम सियांग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि तवांग हा सर्वात लहान जिल्हा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने पापम हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि दिवांग व्हॅली हा सर्वात लहान जिल्हा आहे.

विभाग जिल्हे
पूर्व लोहित जिल्हा, अंजाव जिल्हा, चांगलांग जिल्हा, तिरप जिल्हा, लोअर दिबांग व्हॅली जिल्हा, पूर्व सियांग जिल्हा, अप्पर सियांग जिल्हा, नामसाई जिल्हा, सियांग जिल्हा, लाँगडिंग जिल्हा, दिबांग व्हॅली जिल्हा.
पश्चिम तवांग जिल्हा, पश्चिम कामेंग जिल्हा, पूर्व कामेंग जिल्हा, कुरुंग कुमे जिल्हा, क्रा दादी जिल्हा, पश्चिम सियांग जिल्हा, लोअर सियांग जिल्हा, अप्पर सुबनसिरी जिल्हा, पापम पारे जिल्हा, कमले जिल्हा, लोअर सुबनसिरी जिल्हा, पक्के-केसांग जिल्हा, लेपा-राडा जिल्हा, शि-योमी जिल्हा.
अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हे (Districts in Arunachal Pradesh)

अरुणाचल प्रदेश मधील पाहाण्यासारखी ठिकाणे

किल्ला

पर्यटक इटानगरमधील इटा किल्ल्यालाही भेट देऊ शकतात. हा किल्ला 14-15 व्या शतकात बांधला गेला. त्याच्या नावावरून इटानगर असे नाव पडले आहे. या किल्ल्यावरून अनेक सुंदर नजारे पर्यटकांना पाहता येतात. किल्ला पाहिल्यानंतर पर्यटकांना येथील पौराणिक गंगा तलावही पाहता येतो. याशिवाय इतरही अनेक तलाव आणि वास्तुकलेची सुंदर दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात.

पौराणिक गंगा तलाव

इटानगरपासून 6 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. तलावाजवळ एक सुंदर जंगल देखील आहे. हे जंगल खूप सुंदर आहे. पर्यटकांना या जंगलात सुंदर वनस्पती, वन्यजीव आणि फुलांच्या बागा पाहायला मिळतात. येथे येणाऱ्या पर्यटकांनी या तलावाला आणि जंगलाला नक्कीच भेट द्यायला हवी.

बौद्ध मंदिर

येथे एक सुंदर बौद्ध मंदिर आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनीही याला भेट दिली आहे. या मंदिराचे छत पिवळे असून हे मंदिर तिबेटी शैलीत बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या छतावरून संपूर्ण इटानगरचे सुंदर दृश्य पाहता येते. या मंदिरात एक संग्रहालयही बांधण्यात आले आहे. त्याचे नाव जवाहरलाल नेहरू संग्रहालय आहे. येथे पर्यटकांना संपूर्ण अरुणाचल प्रदेशाची झलक पाहता येईल.

डोनी-पोलो विद्या भवन, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंदिरा गांधी उद्यान आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ही पर्यटन स्थळे प्रमुख आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अरूणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री कोण आहेत?

पेमा खांडू (2016 पासून) हे अरूणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री आहेत.

अरूणाचल प्रदेश चे पहिले राज्यपाल (First governor of arunachal pradesh)

भीष्म नारायण सिंह हे अरूणाचल प्रदेश चे पहिले राज्यपाल आहेत.

अरूणाचल प्रदेश ची राजधानी कोणती आहे (Capital of Arunachal Pradesh)

अरूणाचल प्रदेश ची राजधानी इटानगर आहे.

सिक्कीम व अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रदेशात कोणता देश आहे?

सिक्कीम व अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रदेशात चीन हा देश आहे.

अरूणाचल प्रदेश ची लोकसंख्या किती आहे (Population of Arunachal Pradesh)

अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या तेरा लाख 83 हजार 727 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारावर अरुणाचल प्रदेशचा सत्ताविसावा क्रमांक लागतो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh information in marathi) जाणून घेतली.अरुणाचल प्रदेश माहिती मराठी (Arunachal Pradesh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *