छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य | Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य (Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi) जाणून घेणार आहोत.

Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य (Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य (Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi)

नाव छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म 19 फेब्रुवारी 1630
मृत्यू3 एप्रिल 1680
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
राज्याभिषेक 6 जून 1674

जय भवानी
जय शिवाजी

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत…
सिहांसनाधीश्वर… योगीराज…
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

ही शान कोणाची फक्त….
आमच्या शिवबांची

झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा…
गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही

सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ
एकच आवाज गुंजतो…
तो म्हणजे छत्रपती

ना शिवशंकर…. ना कैलासपती…
ना लंबोदर तो गणपती..
नतमस्तक तया चरणी ..
ज्याने केली स्वराज्य निर्मिती…
देव माझा तो राजा छत्रपती

छत्रपती आमुचा मान
तोची आमुचा सन्मान

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

वैकुंठ रायगड केला…
लोक देवगण बनला…
शिवराज विष्णू झाला..
वंदन त्या छत्रपती शिवरायांना…

शौर्यवान योद्धा…
शूरवीर…
असा एकच राजा जन्मला …
तो आमुचा शिवछत्रपती

अतुलनीय… अलौकीक…
अद्वितीय राजा म्हणजे
आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी!

निश्चयाचा महामेरु…
बहुत जनांसी आधारू…
अखंड स्थिती निर्धारु…
श्री छत्रपती

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना “छत्रपती” म्हणतात !

सागराचे पाणी कधी आटणार नाही…स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…हा जन्म काय, हजार जन्म झालेतरी…..नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..

Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi

धाडस असं करावंजे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!अन इतिहास असा करावा कि 33 कोटी देवांची फौज झुकावी मुजऱ्याला…!

एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची..
चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची…
म्हणूनच म्हणतात,
“जय भवानी जय शिवाजी”

मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात ,
ताज महल
माझ्या राजानं आईची ईच्छा पुर्ण केली ,
हिंदवी स्वराज्य

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला, वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात देवांनीही ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे. छत्रपती शिवराय माझे.

शब्द पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती. राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

अंगात हवी रग. रक्तात हवी धग. छाती आपोआप फुगते. एकदा जय शिवराय बोलून बघ.

जातीपेक्षा मातीला अणि मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

भगवा म्हणजे नुसता झेंडा किंवा निशाणी नाही.भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य,भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

दिनदुबळ्यांचा वाली तो, गरीबांचा कैवारी तो. ना घरतीचा ना स्वर्गाचा, रयतेचा राजा तो.

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीचा कणावर आणि विश्वासाच्या प्रणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.

जगात एकूण 195 देश आहे, त्यातला एक भारत देश भारत देशात एकूण 29 राज्य आहेत, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत,तरीदेखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे.

आई ने चालायला शिकवलेवडिलांनी बोलायला शिकवलेआणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले🙏🚩जय शिवराय🚩

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखेज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.मैत्री टिकवावी शंभुराजांसारखीज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

हा लेख जरूर वाचामराठा साम्राज्याचा सहावा राजा – राजाराम दुसरा भोसले (Rajaram II of Satara in marathi)

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य (Chhatrapati Shivaji Maharaj slogans in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *