Bhajan in marathi : भारतीय संगीताचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि लोकसंगीत. भजन हा सुगम संगीताचा एक प्रकार आहे. त्याचा आधार शास्त्रीय संगीत किंवा लोकसंगीत असू शकतो. हे रंगमंचावर देखील सादर केले जाऊ शकते परंतु मुळात हे एखाद्या देवाची किंवा देवतेची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण भजन माहिती मराठी (Bhajan in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
भजन माहिती मराठी (Bhajan in marathi)
भजन किंवा भजना हा संस्कृत शब्द मूळ भजपासून बनला आहे, ज्याचा अर्थ “विभाजित करणे, वाटणे, भाग घेणे, मालकीचे असणे” असा होतो. या शब्दाचा अर्थ “अध्यात्मिक, धार्मिक तत्त्व किंवा तारणाचे साधन म्हणून एखाद्या गोष्टीची आसक्ती, भक्ती, प्रेम, श्रद्धा, श्रद्धा किंवा प्रेम, उपासना, धार्मिकता” असा होतो.
एखाद्या देवाची किंवा देवतेची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे म्हणजे भजन. यालाच आळविणे असे सुद्धा म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संत परंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, निवृत्ती, एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.
धर्मग्रंथातील कल्पना, पौराणिक महाकाव्ये, संतांची शिकवण आणि देवतेची प्रेमळ भक्ती हे भजनातील वैशिष्ट्यपूर्ण विषय आहेत. भजने मोठ्या प्रमाणावर अज्ञातपणे रचली गेली आहेत आणि संगीत आणि कला परंपरा म्हणून सामायिक केली गेली आहेत.
भजनाचे स्वरूप काय आहे (Bhajan information in marathi)
स्थानिक स्तरावर संवादिनी (हार्मोनियम), मृदंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत. शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही.
परदेशात चिन्मयानंद मिशन तसेच हरेकृष्ण संप्रदायाचे अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्तियोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो.
भजनांचे प्रकार (Types of Bhajan in marathi)
चक्री भजन
एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. यालाच चक्री भजन असे नाव आहे.
सोंगी भजन
या प्रकारात देवभक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.
रिंगण भजन
या प्रकारात तीन वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे.
धरिला पंढरीचा चोर मराठी भजन लिरिक्स (Dharila Pandharicha Chor Marathi Bhajan lyrics)
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..
सोहम शब्दांचा मारा केला
विट्ठल कौकोड़ी ला आला
जनि मने का विट्ठला
जिवे न सोडी मी रे तूला
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भजन म्हणजे काय?
एखाद्या देवाची किंवा देवतेची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे म्हणजे भजन.
निर्गुणी भजन म्हणजे काय?
मिराबाई आणि कबीर यांच्या भजनाना निर्गुण भजने म्हणतात.
सारांश (Summary)
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भजन माहिती मराठी (Bhajan in marathi) जाणून घेतली. भजनाचे स्वरूप काय आहे (Bhajan information in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.