Buffalo information in marathi : म्हैस एक 4 पायांचा पाळीव प्राणी आहे, ज्याचा उपयोग दुधासाठी केला जातो. मित्रांनो तसं तर म्हशीला पूर्ण जगामध्ये पाळले जाते. परंतु सर्वात पहिल्यांदा याला आशियातील देशामध्ये पाळले जात होते. खासकरून भारतामध्ये. आजच्या या पोस्टमध्ये आपण म्हैस माहिती मराठी (Buffalo information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
म्हैस माहिती मराठी (Buffalo information in marathi)
प्राणी | म्हैस (Buffalo) |
श्रेणी | पृष्ठवंशी |
शास्त्रीय नाव | बुबालस बुबालिस |
वंश | बुबलास |
आयुष्मान | 15-20 वर्षे |
1) म्हैशीच्या दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारत शिवाय आशियातील अन्य देशामध्ये सुद्धा म्हैशीच्या दुधाचे उत्पादन केले जाते. म्हशीच्या दुधामध्ये फॅट गाय आणि बकरी च्या फॅट पेक्षाही जास्त असते. म्हशीच्या दुधामध्ये कॅल्शियम, कार्बोनेट, प्रोटिन्स असतात.
2) म्हशीचे पालन भारतामध्ये सिंधू संस्कृतीपासून म्हणजे पाच हजार वर्ष आधीपासून करण्यात येत आहे. सर्वात पहिल्यांदा म्हशी फक्त आशियातील देशांमध्ये पाळल्या जात होत्या. परंतु आता अमेरिका आणि युरोपमधील काही देशांमध्ये सुद्धा पाळली जाते.
3) म्हशी एक शाकाहारी पाळीव प्राणी आहे, जी फक्त गवत आणि चारा खाते. तसेच म्हशीला अन्नधान्य सुद्धा खायला दिले जाते. अधिक दूध उत्पादनासाठी म्हशीला भुस्सा आणि विविध प्रकारचे खाद्य सुद्धा दिले जाते.
4) म्हशीची ओळख ही तिचा काळा रंग आहे. म्हशीच्या शरीराचा पूर्ण रंग काळा असतो. म्हशीचे केस सुद्धा काळे असतात.
5) म्हशीच्या शरीराचा आकार 1.7 मीटर ते 1.8 मीटर इतका असतो. म्हशीच्या शरीराचं वजन 600 ते 900 किलो इतक असतं. म्हैस जमिनीवर 35 किलोमीटर प्रत्येक तासाला च्या वेगाने धावू शकते. म्हैस नदी आणि तलावांमध्ये पोहू सुद्धा शकते.
6) म्हशीचा गर्भकाल हा 300 ते 350 दिवसांचा असतो. म्हशीचे रेडकू जवळ जवळ सहा महिने आईचे दुध पिते.
7) म्हशीचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये मुऱ्हा, पंढरपुरी, जाफराबादी, नागपुरी इत्यादी प्रमुख जाती आहेत. सर्वात जास्त दूध उत्पादनासाठी मुऱ्हा ही जात प्रसिद्ध आहे. ही म्हैस पंजाब आणि हरियाणा मध्ये पाळली जाते. ही म्हैस 15 ते 20 लिटर दररोज दूध देते.
8) आशिया मध्ये जंगली म्हैस ची संख्या चार हजार पेक्षाही कमी आहे. एका काळामध्ये पूर्ण आशियाच्या दक्षिण पूर्वला सर्वात जास्त जंगली म्हशी आढळत होत्या. परंतु आता फक्त भारत, नेपाळ, थायलंड येथेच या म्हशी आढळतात. भारतामध्ये काझीरंगा आणि मानसी राम येथे या म्हशी आढळतात.
9) आफ्रिका मध्ये राहणारे लोक सर्वात जास्त जंगली म्हशींना घाबरतात. आफ्रिकेमध्ये म्हशी मुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हिप्पो आणि क्रोकोडाइल नंतर म्हशीला आफ्रिकेमध्ये सर्वात खतरनाक प्राणी मानला जातो.
10) भारतात म्हशीच्या गावठी, जाफराबादी, पंढरपुरी, मुऱ्हा, मेहसाणा, नागपुरी, नीलीरावी, सुरती, बन्नी, बरगूर, भडवारी, छत्तीसगढी, चिलीका, गोजरी, कलहंडी, मराठवाडी, तोडा इत्यादी जाती आढळतात.
11) म्हशीच्या उत्पत्तीचा इतिहास तितकासा स्पष्ट नाही. यूरोपातील उत्खननात रवंथ करणाऱ्या प्राण्यांतील हरिणासारख्या प्राण्यांचे एक ते अडीच कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळातील जीवाश्म अवशेष मिळालेले आहेत पण या काळात गाय, शेळी व मेंढी या प्राण्यांचा काहीच विकास झाला असल्याचे दिसत नाही.
12) म्हशीचे दूध पचनास जड असून त्याच्या सेवनाने बुद्धिमांद्य येते, असा भारतीयांमध्ये समज आहे.
13) म्हशींच्या दुधातील चरबीच्या प्रमाणाचा फायदा घेऊन अलिकडे दूध पुरवठा वाढविण्यासाठी त्यात पाणी व चरबीरहित दुधाची भुकटी मिसळून प्रमाणित दूध तयार करतात.
14) भारतामधील म्हशींच्या दुधातील चरबीचे प्रमाण 6.5 ते 8.0% असते. फिलिपीन्स व चीन येथील म्हशींच्या दुधातील हेच प्रमाण अनुक्रमे 10 व 12% असते.
15) म्हशीच्या दुधातील चरबीचे प्रमाण तिची जात, दुग्धकालातील वेळ, वय व आहार यांवर अवलंबून असते.
जंगली म्हैस (Wild Water Buffalo)
जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसन चे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला. जंगली म्हशीला एशियन बफेलो असे पण म्हणतात. सध्या जंगली म्हशी आसाम च्या जंगलात मोठया प्रमाणावर आढळतात. जंगली म्हशी पासून सध्याच्या पाळीव म्हशींची उत्पत्ती झाली.
मुऱ्हा म्हैस माहिती (Murrah buffalo in marathi)
मुऱ्हा ही पाळीव म्हशींची एक प्रजाती आहे जी दूध उत्पादनासाठी पाळली जाते. हा मूळतः पंजाबचा प्राणी आहे परंतु आता तो इतर प्रांत आणि इतर देशांमध्ये (जसे की इटली, बल्गेरिया, इजिप्त इ.) पाळला जातो. हरियाणात तिला ‘ब्लॅक गोल्ड’ म्हणतात. दुधात चरबी निर्माण करण्यासाठी मुऱ्हा ही सर्वोत्तम जात आहे. मुऱ्हा म्हशीची शिंगे जीलेबीच्या आकाराची असतात. तिच्या दुधात 7% फॅट असते. मुऱ्हा म्हशीचा गर्भधारणा कालावधी 310 दिवसांचा असतो.
या जातीच्या प्राण्याचा रंग गडद काळा असतो. त्यांचे डोके लहान असते आणि शिंगे अंगठीच्या आकाराची असतात. पण डोक्यावर, शेपटीवर आणि पायावर सोनेरी रंगाचे केस आढळतात. त्यांची शेपटी लांब असते. ब्राझीलमध्ये, म्हशीची ही जात मांस आणि दूध या दोन्ही उत्पादनासाठी वापरली जाते.
जाफराबादी म्हैस (Jafrabadi buffalo in marathi)
जाफराबादी म्हैस ही एक म्हशीची जात आहे. या जातीच्या म्हशी आकाराने आणि वजनाने सर्वांत मोठ्या असतात. शरीर लांब आणि शरीराची हाडे पूर्ण वाढलेली पण शरीराच्या मानाने मांसल भाग कमी असतो. शिंगे मुळात जाड आणि चपटी, मुळापासून पाठीमागे आणि खालच्या बाजूने वळलेली असतात. या जातीची म्हैस एका वेताला 1800 ते 2500 लीटर दूध देते.
सुरती म्हैस (Surati buffalo in marathi)
सुरती म्हैस ही एक म्हशीची जात आहे. या म्हशींचा शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात व भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लीटर असते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात?
रेडकू
मुऱ्हा म्हैस किंमत
मुऱ्हा म्हशीची किंमत 60,000 ते 130,000 रुपये असते आणि ती म्हशीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
म्हैस किती वर्ष जगते?
म्हैस साधारणपणे 15-20 वर्षे जगते.
म्हशीचे स्त्रीलिंगी पिल्लू
रेडी
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण म्हैस माहिती मराठी (Buffalo information in marathi) जाणून घेतली. म्हैस प्राणी माहिती (Mhais prani mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.