उंट प्राणी माहिती मराठी | Camel information in marathi

Camel information in marathi : वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला प्राणी म्हणजे उंट. उष्ण प्रदेशांमध्ये आपल्या शारीरिक विशेषता साठी ओळखला जातो. वाळवंटातील वास्तव्यासाठी त्याची नैसर्गिक जडणघडण झाली आहे. त्याचा घुमट ही त्याची ओळख आहे. लोकांना असं वाटतं की तो घुमट मध्ये पाणी साठवून ठेवतो. परंतु हे चुकीचं आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण उंट प्राणी माहिती मराठी (Camel information in marathi) जाणून घेणार आहोत.

Camel information in marathi
उंट प्राणी माहिती मराठी (Camel information in marathi)

उंट प्राणी माहिती मराठी (Camel information in marathi)

प्राणी उंट (Camel)
जात सस्तन प्राणी
वैज्ञानिक नावकॅमलस
वंशपृष्ठवंशीय
कुळकॅमेलिडे
आयुष्यमान40-50 वर्ष
उंट माहिती मराठी (Camel information in marathi)

1) उंट हा एक अरेबिक शब्द आहे, ज्याचा अर्थ सुंदरता असा होतो.

2) एक उंट सात फूट लांब आणि 680 किलोचा असू शकतो.

3) उंटाला वाळवंटामध्ये रहाण्याची सवय असते. या वातावरणाचा हिशोबानुसार त्याच्या भुवया या दहा सेंटिमीटर लांब असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये वाळवंटातील रेत जाणार नाही.

4) त्यांच्या कानामध्ये केस सुद्धा याच कारणामुळे असतात, त्यामुळे त्यांच्या कानामध्ये सुद्धा रेत जाऊ शकत नाही.

5) उंटाचे पाय खूप अनोख्या पद्धतीचे असतात. त्यामुळेच ते सहजपणे वाळवंटातून चालू शकतात.

6) लोक म्हणतात की उंट आपल्या घुमटा मध्ये पाणी साठवून ठेवतो. परंतु हे असत्य आहे. खरं म्हणजे हे त्याच्या फॅटसाठी असतं. जेव्हा त्यांना अन्न मिळत नाही तेव्हा या पासून त्यांना ऊर्जा मिळते.

7) बिना काही खाता, बिना पाणी पिता उंट खूप लांब काळापर्यंत जिवंत राहू शकतो.

8) जेव्हा उंट पाणी पितात तेव्हा ते जवळजवळ 151 लिटर पाणी पितात.

9) रात्रीच्या वेळी उंटाच्या शरीराचं तापमान 34 डिग्री सेल्सियस असतं. आणि दिवसा च्या वेळी 41 डिग्री सेल्सिअस.

10) उंटाच्या दुधामध्ये आयर्न, विटामिन आणि मिनरल्स आढळतात.

उंट माहिती मराठी (Unt mahiti marathi)

11) गाईच्या दुधापेक्षा उंटाच दुध आपल्या शरीराला अधिक चांगलं असतं. कारण यामध्ये कमी प्रमाणात फॅट असते.

12) एका तासामध्ये एक उंट 40 मैल अंतर धाऊ शकतो.

13) वाळवंटातील लढाईमध्ये सुद्धा उंटा चा वापर केला जात होता.

14) जेव्हा उंटाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराचा उपयोग खाण्यासाठी आणि कपडे बनवण्यासाठी केला जातो.

15) एका उंटाचा जीवन काळ 40 ते 50 वर्षापर्यंत असतो.

16) उंटाला पाळून त्याला सर्कस मध्ये लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो.

17) काही उंटा मध्ये एक घुमट आढळतो तर काही उंटा मध्ये दोन घुमट आढळतात.

18) उंटाचे जवळजवळ चौदा मिलीयन प्रकार आहेत.

19) उंट तोपर्यंत थुकत नाही जोपर्यंत त्याला त्याच्याकडून कोणताही धोका जाणवत नाही.

20) उंट फक्त आपल्याला पाहायलाच कमी चालणारे दिसतात. परंतु ते खूप धावू शकतात.

उंट प्राणी माहिती मराठी (Camel in marathi)

21) गाई प्रमाणे उंट सुद्धा आपण खाल्लेला चारा परत रवंथ करू शकतो.

22) प्रत्येक झाडाला खाल्ल्यानंतर उंटाला त्यातून पाण्याचे तत्व मिळतं.

23) उंट एक शाकाहारी प्राणी आहे.

24) उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात.

25) उंट हा प्राणी आपल्या पाठीवर कमीत कमी 180 किलो सामान उचलू शकतो.

26) एक उंट एका दिवसामध्ये सरासरी 40 किलोमीटर अंतर पार करू शकतो.

27) उंटांच्या मुख्यत्वे दोन जाती आहेत. एक वाशींडी व दोन वाशींडी (बॅक्ट्रीयन उंट). या शिवाय उंटांच्या अजून चार उप-जाती आहेत. या पैकी लामा अल्पाका, ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऱ्या उप प्रजाती आहेत.

28) आज जगात मुख्यतः उंट आफ्रिका खंडात सोमालिया, सुदान या देशांच्या आसपास आढळतात. तसेच आशिया खंडात मंगोलिया, चीन, अफगाणिस्तान, इराक या भागातही आढळतात. भारतातही राजस्थान येथे उंट आढळतात.

29) उंट अन्न चरबीच्या रुपात वाशींडां मध्ये साठवून ठेवतो आणि अन्नाची कमतरता आल्यावर त्यातून गरज भागवतो. उंटांच्या लाल पेशीचा आकार अंडाकृती असतो यामुळे कमी पाणी शरीरात असतांनाही त्या कार्यरत राहतात.

30) उंटांच्या तोंडाला जाड चामड्याचे अस्तर असते, ज्यामुळे ते काटेरी वाळवंटातील झाडे चावू शकतात.

31) जर त्यांच्या डोळ्यात वाळू साचली तर ते त्यांच्या पारदर्शक तिसऱ्या पापणीचा वापर करून ते काढून टाकू शकतात.

32) उंटांची चाल आणि रुंद पाय त्यांना वाळूत न बुडता पुढे जाण्यास मदत करतात.

33) उंटाचे पाय लांब असतात कारण ते उंटाला तापमानवाढीपासून दूर ठेवण्यास सक्षम असतात.

34) उंट एका वेळी एकच पिलाला जन्म देऊ शकतो.

35) अनेक वर्षांपूर्वी लोक वैद्यकीय कारणांसाठी उंटाचे मूत्र प्यायचे.

उंट प्राण्याचा इतिहास (History of camel in Marathi)

उंटांच्या अवषेशांवरून असे सिद्ध झाले आहे की एक वाशींडी उंट हे मुलतः अमेरिकेतून अलास्का मार्गे आशिया खंडात पसरले असे मानले जाते. तर दोन वाशींडांचे उंट मूलतः तुर्कस्तान च्या वाळवंटी प्रदेशातून आशिया खंडात पसरले असे मानले जाते. पू्र्वी तुर्कस्तानला बॅक्ट्रीया असे नाव होते त्यावरून बॅक्ट्रीयन उंट असे नाव या प्राण्याला पडले.

उंट प्राण्याचे उपयोग

  • सुदान मध्ये उंटांची शेती ही केली जाते.
  • लष्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.
  • उंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.
  • उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर चामडे पादत्राणे बनविण्यासाठी वापरले जाते.
  • उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रेही बनविली जातात.
  • सर्कस मध्ये लोकांचे मनोरंजन करण्यासाठी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात?

रेताड वाळवंटातून ओझे घेऊन, दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला जाणे अशक्य असल्यामुळे, उंटाला ‘वाळवंटातील जहाज’ असे म्हणतात.

उंटाच्या पाठीवरील उंचवटा त्याला काय म्हणतात?

मदार

वाळवंटात राहणारे लोक उंट का पाळतात?

वाळवंटात कोणत्याही प्रकारची वाहने जाऊ शकत नाहीत आणि इतर कोणताही प्राणी वाळवंटात चालू शकत नाही त्यामुळे वाळवंटात राहणारे लोक उंट पाळतात.

उंट किती दिवसांनी पाणी पितो?

उंट हा प्राणी 15 दिवस पाण्याशिवाय राहू शकतो.

उंट स्त्रीलिंगी शब्द मराठी?

उंट स्त्रीलिंगी शब्द उंटीण

उंट काय खातो?

उंट हा एक शाकाहारी पाळीव प्राणी आहे. तो जंगलात सुद्धा राहू शकतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे गवत अनई धान्य खातो.

उंट किती दिवसातून पिल्लांना जन्म देते?

संयोगानंतर मादी सरासरी 315 दिवसांनी एका पिलाला जन्म देते.

उंट हाकणार्याला काय म्हणतात?

Camel Driver

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण उंट प्राणी माहिती मराठी (Camel information in marathi) जाणून घेतली. उंट माहिती मराठी (Camel in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *