गोगलगाय विषयी माहिती | Snail information in marathi

Snail information in marathi : पावसाळ्यामध्ये गोगलगाय आपल्याला पाहायला मिळते. गोगलगाय आकाशातून खाली पडते असे सुद्धा अनेक वेळा सांगितले जाते. गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण गोगलगाय विषयी माहिती (Snail information in marathi) जाणून घेणार आहोत.

Snail information in marathi
गोगलगाय विषयी माहिती (Snail information in marathi)

गोगलगाय विषयी माहिती (Snail information in marathi)

नाव गोगलगाय (Snail in marathi)
प्रकार मोलस्का
वर्ग गॅस्ट्रोपोडा
आयुर्मान2 ते 10 वर्षे
गोगलगाय विषयी माहिती (Snail information in marathi)

1) गोगलगायींच्या अंदाजे 35000 जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे, आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते.

2) गोगलगायी चे श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणाऱ्या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते.

3) गोगलगायी उभयलिंगी असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसऱ्यांशी गोगलगायींशी संभोग करावा लागतो.

4) जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात.

5) पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात.

6) शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना भक्ष बनवतात.

7) जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा ते सहसा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या कवचात माघार घेतात.

8) सर्वात मोठी जमीनीवरील गोगलगाय Achatina achatina, विशाल आफ्रिकन गोगलगाय आहे.

9) गोगलगाईला पाठीचा कणा नसतो.

10) काही जमिनीवरील गोगलगायी इतर स्थलीय गोगलगायींना खातात.

गोगलगाय विषयी काही रोचक तथ्य (Facts about Snail in Marathi)

11) उत्तर अमेरिकेत सुमारे 500 स्थानिक गोगलगाय प्रजाती आहेत.

12) गोगलगायी 2 ते 5 वर्षे जगतात, परंतु बंदिवासात त्या 10 किंवा 15 वर्षांपेक्षा जगू शकतात.

13) काही ठिकाणी लोक गोगलगायीची अंडी खातात आणि त्यांना “पांढरा कॅविअर” म्हणतात.

14) गोगलगाईचा चालण्याचा वेग सुमारे 0.5 – 0.8 इंच प्रति सेकंद असतो. जर ते न थांबता पुढे गेले तर 1 किलोमीटर अंतर पूर्ण होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागेल.

15) कॅल्शियम कार्बोनेट हा गोगलगायीच्या कवचाचा मुख्य घटक असतो.

16) गोगलगायीच्या कवचाचा आकार त्याचे वय दर्शवितो.

17) गोगलगायीच्या शरीरात पाच मुख्य भाग असतात- डोके, मान, आंतरीक कुबड, शेपटी आणि पाय.

18) गोगलगायांची जीभ रिबनसारखी असते ज्याला रडुला म्हणतात ज्यामध्ये हजारो लहान दात असतात.

19) गोगलगायांच्या पाठीवर एक सर्पिल कवच असते जे त्यांच्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करते.

20) गोगलगाई प्रामुख्याने शाकाहारी असतात त्यामुळे त्या पाने, फुले, फळे, शेतातील देठ आणि बागेतील पिके खातात. मोठे गोगलगाय आणि काही समुद्री-आधारित प्रजाती मांसाहारी किंवा अगदी सर्वभक्षक आहेत.

गोगलगाय माहिती मराठी (Gogalgai mahiti marathi)

21) गोगलगाय प्रामुख्याने कॅल्शियम युक्त अन्न खातात जे त्यांचे कवच घट्ट आणि निरोगी ठेवते.

22) पिकलेली स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो हे गोगलगायी चे आवडते पदार्थ आहेत.

23) सर्वात वेगवान गोगलगाय हेलिक्स ऍस्पर्सा आहे जो 0.03 मैल प्रतितास वेगाने चालू शकतो.

गोगलगायी चे उपयोग

1) काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो.

2) युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात.

3) हिंदू धर्म पुरातन काळापासून शंखाचा उपयोग करत असल्याचे आढळते. हिंदू संस्कृतीत शंखनाद हा पूजेचा एक भाग असतो.

गोगलगायी चा उपद्रव

शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्यास, रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायींनी रोपांची पाने खाल्ल्याने शेताचे नुकसान होते. महाराष्ट्रातील गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकाचवेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही.

गोगलगायी चा उपद्रव रोखण्यासाठी काय करावे?

1) शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात राख पसरवावी. त्यावर मोरचूद व कळीचा चुना दोनास तीन प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा त्यामुळे गोगलगाय तेथे येत नाही.

2) उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या मरतात.

3) कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.

4) शेतामध्ये ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग ठिकठिकाणी करावेत. त्यांखाली गोगलगायी मोठ्या संख्येने जमतात. लपलेल्या गोगलगायी सकाळीसकाळी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये त्यांनी घातलेली पिवळट पांढऱ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

गोगलगाय ला किती डोळे असतात?

गोगलगाय ला दोन डोळे असतात. परंतु काही गोगलगायींना डोळे नसतात किंवा ते पाहण्यास असमर्थ असतात.

गोगलगाय ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

गोगलगाय ला इंग्लिश मध्ये Snail म्हणतात.

गोगलगाय हा जलचर प्राणी आहे का?

गोगलगाय हा जलचर प्राणी नाही. गोगलगाय जलचर प्राणी आहे हे विधान चुकीचे आहे. कारण गोगलगाय जमिनीवर राहते. गोगलगायी च्या काही प्रजाती समुद्रामध्ये सुद्धा आढळतात.

गोगलगाय कोणत्या संघात मोडतो?

गोगलगाय गॅस्ट्रोपोडा संघात मोडते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण गोगलगाय विषयी माहिती (Snail information in marathi) जाणून घेतली. गोगलगाय माहिती मराठी (Gogalgai mahiti marathi) तुम्हाला कशी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *