Fox information in marathi : कोल्हा हा एक असा प्राणी आहे ज्याचा उपयोग गोष्टीमध्ये अनेकदा केलेला आढळतो. लहानपणी कोल्याची गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली असेल. दंतकथा मध्ये कोल्ह्याला धूर्त आणि चलाख प्राणी म्हणून समजले जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण कोल्हा प्राणी माहिती मराठी (Fox information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
कोल्हा प्राणी माहिती मराठी (Fox information in marathi)
प्राणी | कोल्हा |
जात | सस्तन प्राणी |
कुटुंब | कॅनिडे |
शास्त्रीय नाव | Vulpes Vulpes |
आयुर्मान | 3-10 वर्षे |
1) कोल्हा कुत्र्याच्या परिवारातील सदस्य आहे. नर कोल्ह्याला Dog Fox आणि मादा कोल्ह्याला Vixen म्हणतात. कोल्ह्याच्या पिल्लाला Pups, Kits किंवा Cubs म्हणतात.
2) जगामध्ये कोल्ह्याच्या 25 प्रजाती आढळतात.
3) कोल्ह्यायांच्या समूहाला Skulk किंवा Leash म्हणतात.
4) कोल्हा साधारणपणे वनक्षेत्रात राहतो. ते पर्वतावर, गवतामध्ये, मैदानी भागात सुद्धा राहतात.
5) अंटार्टिका सोडलं तर पूर्ण जगामध्ये कोल्हा आढळून येतो.
6) कोल्ह्याची सर्वात जास्त आढळली जाणारी जात म्हणजे लाल कोल्हा.
7) जंगलामध्ये कोल्ह्याचा जीवन काळ जवळजवळ तीन वर्षाचा असतो. परंतु प्राणी संग्रहालयामध्ये दहा वर्षापर्यंत कोल्हा जगू शकतो.
8) कोल्हा सकाळी किंवा संध्याकाळी कमी सूर्यप्रकाश असण्याच्या वेळी सक्रिय असतो.
9) कोल्हा नेहमी एकटा राहतो किंवा छोट्या समूहामध्ये राहतो.
10) कोल्हा नेहमी एकटा शिकार करणे पसंद करतो. परिवारात किंवा समूहात राहताना सुद्धा कोल्हा हा एकटाच शिकार करतो.
कोल्ह्याविषयी माहिती मराठी (Kolha mahiti marathi)
11) कोल्हा जमिनीची खुदाई करून स्वतःचे घर बनवतो.
12) कोल्हा आणि मांजर यामध्ये काही समानता आढळतात.
13) कोल्हा सुद्धा मांजरा प्रमाणे शिकार करतो.
14) कोल्हा हा कुत्र्याच्या परिवारातील एकमेव सदस्य आहे जो झाडावर चढू शकतो. काही कोल्हे मांजरा प्रमाणे झाडावर चढतात सुद्धा.
15) कोल्ह्याची श्रवणक्षमता उत्कृष्ट असते. लाल कोल्हा खूप अंतरावरून सुद्धा आवाज ऐकू शकतो.
16) कोल्हा वेगवेगळ्या प्रकारचे 40 आवाज काढू शकतो.
17) कोल्हा 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो.
18) कोल्हा प्राणी सर्वभक्षी आहे. म्हणजे तो मांस आणि वनस्पती दोन्ही खातो.
19) कोल्हा एका दिवसामध्ये जवळजवळ एक किलो ग्रॅम अन्न खातो.
20) कोल्ह्याला नेहमी अतिरिक्त भोजन संग्रह करण्याची सवय असते.
कोल्ह्याविषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Fox facts in marathi)
21) मादा कोल्ह्याचा गर्भकाल 53 दिवसात असतो.
22) मादा कोल्हा मार्च ते मे महिन्यामध्ये साधारण चार ते सहा पिल्लांना जन्म देतो.
23) पिल्लांना पाळण्याची जबाबदारी नर आणि मादी दोघेही घेतात.
24) उष्ण आणि वाळवंटात राहत असल्यामुळे कोल्ह्याचे कान मोठ्या आकाराचे असतात. जे त्यांच्या शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात.
25) कोल्हा शिकार करण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतो.
26) दंतकथा मध्ये कोल्ह्याला धूर्त आणि चलाख प्राणी म्हणून समजले जाते.
27) युनायटेड किंगडम, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, इटली या देशांमध्ये मनोरंजनासाठी कोल्ह्याची शिकार करण्याची प्रथा आहे.
28) कोल्हा नेहमी रात्रीच्या वेळी शिकार करतो.
29) मांसाहारी खाण्यासाठी कोल्हा कोंबडा, मासा, मोर आणि सशाची शिकार करतो.
30) कोल्ह्याची लांबी 24 ते 48 सेंटिमीटर लांब असते.
कोल्हा माहिती मराठी (Fox in marathi)
31) कोल्ह्याची पिल्ले जन्मतः आंधळी असतात आणि जन्मानंतर नऊ दिवसांपर्यंत डोळे उघडत नाहीत. त्या काळात, ते गुहेत विक्सन (मादी) सोबत राहतात तर नर त्यांना अन्न आणून देतो. ते 7 महिन्यांचे होईपर्यंत ते त्यांच्या पालकांसोबत राहतात.
32) नर कोल्ह्याचे डोके साधारणपणे 26 ते 28 इंच असते तर मादीचे डोके साधारणपणे 24 ते 26 इंच असते.
33) नर कोल्ह्याची शेपटी 15 ते 17 इंच लांब असते, तर मादीची शेपटी 14 ते 16 इंच असते. लाल कोल्ह्याची शेपटी त्यांच्या शरीराची अर्धी लांबी बनवते.
34) कोल्ह्यांना अविश्वसनीय सुद्धा ऐकू येते. ते त्यांच्या श्रवणाचा उपयोग कीटक आणि लहान सस्तन प्राणी पकडण्यासाठी करतात.
35) कोल्हे जमिनीखाली दफन केलेल्या अन्नाचा वास घेण्यास सक्षम असतात. त्यांची वास घेण्याची क्षमता खूप मजबूत असते.
36) कोल्हा हा निशाचर प्राणी आहे, याचा अर्थ तो रात्रीच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतो, अगदी मांजरींप्रमाणे.
37) कोल्हे त्यांचा प्रदेश चिन्हांकित करण्यासाठी त्यांचे मूत्र आणि मल वापरतात.
38) लाल कोल्ह्यांना जगातील शीर्ष 100 सर्वात आक्रमक प्रजातींमध्ये सूचीबद्ध केले आहे आणि आपण त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये देखील पाहू शकतो.
39) कोल्हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी चांगले जुळवून घेतात.
40) ‘द लिटिल प्रिन्स’ ही सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक आहे ज्यामध्ये कोल्हा आहे. या कथेत, कोल्हा लहान राजकुमारला अनेक मौल्यवान धडे शिकवतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah information in marathi)
- सिंह प्राणी माहिती मराठी (Lion Information in Marathi)
- घोडा प्राणी माहिती मराठी (Horse information in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कोल्हा कोठे राहतो?
कोल्हा हा प्राणी जमीन खोदून त्यामध्ये राहतो. शहरी भागात, दाट सहसा झुडपांमध्ये किंवा शेडच्या खाली आणि कधीकधी झाडांच्या मुळांच्या खाली आणि रेल्वेच्या बांधाखाली देखील कोल्हा राहतो.
कोल्ह्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
कोल्ह्याचे शास्त्रीय नाव Vulpes Vulpes
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कोल्हा प्राणी माहिती मराठी (Fox information in marathi) जाणून घेतली. कोल्हा माहिती मराठी (Fox in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.