आयटीआय चा फुल फॉर्म काय आहे | ITI full form in marathi

ITI full form in marathi : मित्रांनो ज्या वेळेस आपली दहावी पूर्ण होते त्यामुळे आपल्यासमोर आता काय करावे हा पर्याय येतो. त्यावेळेस आपल्याला अनेक लोकांनी आयटीआय हा पर्याय नक्कीच सांगितला असेल. किंवा तुम्ही कधी तरी याविषयी ऐकलं असेल. पण तुम्हाला या विषयी संपूर्ण माहिती नक्कीच नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण आयटीआय काय आहे (ITI information in marathi), आयटीआय चा फुल फॉर्म (ITI full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यात 417 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 381 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या संस्था 134 प्रकारच्या व्यवसायांचे (ट्रेड)चे प्रशिक्षण देतात. या संस्थांमध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख 50 हजार विद्यार्थी प्रवेश घेतात.

आयटीआय काय आहे (ITI information in marathi)

आयटीआय एक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्याला औद्योगिक स्तरावर काम करण्यालायक बनवले जाते. याच्या मदतीने कोणताही विद्यार्थी कोणत्याही फॅक्टरीमध्ये स्वयंरोजगार करण्यासाठी काबिल होऊ शकतो. कारण यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते. कारण त्यांना एका क्षेत्रामध्ये कुशल बनवायचे असते.

तसं पाहायला गेलं तर आयटीआय मध्ये अनेक प्रकारचे ट्रेड कोर्स आहेत. जो ट्रेड आपल्याला आवडेल तो ट्रेड निवडून आपण यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकतो. कारण जर एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर ती आपण जास्त दिवस करू शकत नाही. आता हे आपल्यावर आहे की आपल्याला कोणता ट्रेड आवडतो.

ITI full form in marathi
आयटीआय चा फुल फॉर्म (ITI full form in marathi)

आयटीआय चा फुल फॉर्म (ITI full form in marathi)

आयटीआय चा फुल फॉर्म (ITI full form in marathi) आहे Industrial Training Institute. आयटीआय ला मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हणतात. आयटीआय ला हिंदी मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थान असे म्हणतात.

आयटीआय चा अर्थ काय आहे (ITI meaning in Marathi)

आयटीआय म्हणजेच Industrial Training Institute चा अर्थ (ITI meaning in Marathi) आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

आयटीआय कोर्स मधील ट्रेडस (Treds of ITI information in marathi)

आयटीआय मधील ट्रेड हा आपल्या जीवनाचा एक टर्निंग पॉइंट असतो. कारण जो ट्रेड आपण निवडतो त्यामध्ये आपल्याला करियर करायचे असते. यासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा शिक्षकांना विचारून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. आयटीआय मध्ये अनेक प्रकारचे ट्रेड उपलब्ध आहेत. परंतु आपल्याला योग्य वाटेल असाच ट्रेड आपण निवडायला हवा.

आयटीआय आपण सरकारी किंवा प्रायव्हेट कॉलेजेस मधून सुद्धा करू शकतो. परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये या कोर्सेसची फी जास्त असते. म्हणून जास्त करून विद्यार्थी सरकारी कॉलेज निवडतात. सरकारी कॉलेजेस मध्ये विद्यार्थ्यांचा खर्च सुद्धा खूप कमी होतो. आता आपण आयटीआय मधील ट्रेड जाणून घेऊ.

 • Electrician
 • Fitter
 • Welder
 • Carpenter
 • Book binder
 • Plumber
 • Pattern maker
 • Diesel mechanical
 • Computer operator and programming
 • Wireman
 • Mechanical
 • Pump Operator

आयटीआय करण्यासाठी किती फी लागते?

आयटीआय कोर्स करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे आपण गुणवत्ता यादीतून सरकारी कॉलेजेस मध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे आपण खाजगी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. जर आपण सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन केले तर आपल्याला काही फी द्यावी लागत नाही. परंतु जर आपण प्रायव्हेट कॉलेजेस मधुन हा कोर्स केला तर आपल्याला 10 ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च त्या प्रायव्हेट संस्थेवर सुद्धा अवलंबून असतो.

आयटीआय करण्याचे फायदे काय आहेत?

 • आयटीआय करण्याचा पहिला फायदा हा आहे की हा कोर्स फक्त सहा महिने किंवा दोन वर्षाच्या आत असतो. इतर कोर्स प्रमाणे याचा कालावधी तीन ते चार वर्षाचा नसतो.
 • आयटीआय हा कोर्स खूप स्वस्तात होतो. ज्यांच्याकडे इतर कोर्स करण्यासाठी जास्त पैसे नसतील ते विद्यार्थीसुद्धा हा कोर्स सहजपणे करू शकतात.
 • आयटीआय हा कोर्स आपण दहावी झाल्यानंतर सुद्धा करू शकतो. हा कोर्स झाल्यानंतर आपण सहजपणे जॉब सुद्धा मिळू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आयटीआय प्रवेशासाठी आपले वय किती असावे?

आयटीआय प्रवेशासाठी आपले वय कमीत कमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.

आयटीआय कोर्स चा कालावधी किती वर्ष असतो?

आयटीआय कोर्सेस चा कालावधी सहा महिन्यापासून ते एक ते दोन वर्षाचा असतो.

आयटीआय करण्यासाठी किती खर्च येतो?

जर आपण सरकारी कॉलेजमधून आयटीआय केला तर आपल्याला जास्त खर्च येत नाही. परंतु जर आपण खाजगी कॉलेजमधून आयटीआय केला तर 10 ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च त्या संस्थेवर अवलंबून असतो.

आयटीआय चा फुल फॉर्म काय आहे (ITI full form in marathi)

आयटीआय चा फुल फॉर्म आहे Industrial Training Institute यालाच आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हणतो.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आयटीआय चा फुल फॉर्म (ITI full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आयटीआय काय आहे (ITI information in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *