ग्रामपंचायत विषयी माहिती | Gram panchayat information in marathi

By | November 3, 2022

ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi) : ग्रामपंचायत बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. छोट्या खेड्यांमध्ये कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहिले जाते. पंचायत राज मधील सर्वात शेवटचा पण महत्त्वाचा हा एक टप्पा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi) जाणून घेणार आहोत.

Gram panchayat information in marathi
ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi)

Contents

ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi)

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याच्या पूर्वीपासून म्हणजेच 1958 पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली होती. या कलमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असा उल्लेख केलेला आहे. ज्या गावांची लोकसंख्या 600 पेक्षा जास्त असेल त्या गावांमध्ये ग्रामपंचायत स्थापन केली जाते, आणि ज्या गावांची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल त्या गावांमध्ये गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते.

लोकसंख्यासदस्य संख्या
600 ते 15007 सदस्य
1501 ते 3000 9 सदस्य
3001 ते 4500 11 सदस्य
4501 ते 600013 सदस्य
6001 ते 750015 सदस्य
7501 पेक्षा जास्त17 सदस्य
Gram panchayat information in marathi

आपल्या गावची लोकसंख्या किती आहे यावर त्या गावची सदस्य संख्या ठरवली जाते. जर गावाची लोकसंख्या 600 ते 1500 असेल तर त्या गावांमध्ये 7 सदस्य असतील. जर गावची लोकसंख्या 1501 ते 3000 असेल तर त्या गावांमध्ये 9 सदस्य असतील. जर गावाची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तर त्या गावांमध्ये 11 ग्रामपंचायत सदस्य असतील. 

जर गावची लोकसंख्या 4501 ते 6000 असेल तर त्या गावांमध्ये 13 सदस्य असतील. जर गावामध्ये 6001 ते 7500 लोकसंख्या असेल तर त्या गावांमध्ये 15 ग्रामपंचायत सदस्य असतील. आणि जर गावची लोकसंख्या 7501 पेक्षा जास्त असेल तर त्या गावांमध्ये 17 ग्रामपंचायत सदस्य असतील. म्हणजेच ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी 7 सदस्य आणि जास्तीत जास्त 17 ग्रामपंचायत सदस्य असतात.

ग्रामपंचायतीची निवडणूक (Grampanchayat Election in marathi):

सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो. सर्वात पहिल्यांदा सर्व जण सदस्य असतात. त्यानंतर सरपंचाची निवड केली जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 50 टक्के आरक्षण हे महिलांना राखीव असते. अनुसूचित जातीसाठी त्या गावांमध्ये किती लोकसंख्या आहे यानुसार त्यांचे आरक्षण ठरवले जाते. इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण राखीव असते.

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी नियम (Rules for gram panchayat election in marathi):

 • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
 • उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असायला हवे.
 • ज्या गावच्या ग्रामपंचायतीसाठी आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्या गावच्या मतदान यादी मध्ये त्या उमेदवाराचे नाव असावे.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने:

 • ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर
 • व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर.
 • जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान.
 • विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान.

ग्रामपंचायतीची कामे / कार्ये:

 • गावात रस्ते बांधणे.
 • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
 • दिवाबत्तीची सोय करणे.
 • जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
 • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
 • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
 • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
 • शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
 • शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
 • गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, उरुस यांची व्यवस्था ठेवणे.

सरपंचाची निवड :

निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे एका वर्षामध्ये बारा सभा घेतल्या जातात त्यांना मासिक सभा असे म्हणतात. आणि यामध्ये चार ग्रामसभा असतात. या चार ग्रामसभा या 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशी घेतल्या जातात. आणि ग्रामसभा या ग्रामपंचायतीला घ्याव्याच लागतात. निवडणुकीनंतर जी पहिली सभा होते मग ती ग्रामसभा असो किंवा मासिक सभा असो त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंच निवडले जातात.

सरपंच आणि उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर जर विरोधी पक्षाला काही यामध्ये विरोध असेल किंवा अडचण असेल तर ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार करू शकतात. जड जिल्हाधिकाऱ्यांकडून सुद्धा त्यांच्या शंकेचे निरसन झाले नाही तर ते विभागीय आयुक्तांकडे आपली तक्रार दाखल करू शकतात.

सरपंच अधिकार व कार्ये :

 • मासिक सभा बोलावणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.
 • गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
 • ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
 • योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे.
 • ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे.

सरपंच मानधन :

सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांना अतिथी भत्ता म्हणून वार्षिक अंदाजपत्रकांच्या 2% किंवा 6000/- रु यापैकी जी मोठी रक्कम असते ती दिली जाते.

राजीनामा :

सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे तर उपसरपंच सरपंचांकडे देतात. अकार्यक्षमता, गैरवर्तन यासारख्या कारणांवरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंचास पदमुक्त करते.

ग्रामसेवक :

ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.

ग्रामसेवकांची कामे :

 • ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
 • ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
 • गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
 • लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
 • करवसुल करणे.
 • जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे.
 • जन्म-मृत्यू,उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हनून काम पाहणे.
 • बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज करणे.
 • मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज करणे.
 • बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे.
 • जनमाहिती अधिकारी कामकाज करणे.
 • जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे.
 • विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे.
 • आपत्कालीन समिती सचिव म्हणून काकाज करणे.
 • झाडे लावणे, शौचालय बांधून ते वापरायला शिकविणे.
 • ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज करणे.

अविश्वासाचा ठराव :

जर निवडणूक झाली आणि सरपंच आणि उपसरपंच यांची निवड झाली तर विरोधी पक्षाला सहा महिन्यापर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. जर तरीही विरोधी पक्षाने अविश्वासाचा ठराव मांडला आणि जर जिल्हाधिकाऱ्याने तो ठराव फेटाळला तर पुढील एक वर्ष विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव मांडू शकत नाही.

ग्रामसभा :

ग्रामपंचायतीला चार ग्रामसभा या वर्षातून घ्याव्या लागतात. ग्रामसभेतील सदस्य म्हणजेच प्रमुख हा सरपंच असतो. आणि जर सरपंच नसेल तर त्या ठिकाणी उपसरपंच हा प्रमुख म्हणून काम करतो. ग्रामसभेमध्ये सचिवाचे काम हे ग्रामसेवक सांभाळतो.

ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाणारी कामे:

 • कर आकारणीसाठी मान्यता देणे.
 • ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मजुरी देणे.
 • ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष खर्च व काम यांच्या पाहणीसाठी दक्षता समिती नेमणे.
 • ग्रामपंचायतीचे सदस्य निवडणे.
 • ग्रामसभा ठरावाच्या माध्यमातून सर्व विभागांना सूचना व मत पाठवू शकते.

अंदाजपत्रक :

प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावासाठी अंदाजपत्रक बनवावे लागते. म्हणजे समजा आता 2021 चालू आहे, 2022 मध्ये ग्रामपंचायतीला काय काय कामे करायची आहेत याविषयी लिहिणे म्हणजे अंदाजपत्रक. ही कामे गावातील लोकांकडून सांगितली जातात. आणि ही कामे अंदाजपत्रकामध्ये लिहून 31 डिसेंबर 2019 च्या आत पंचायत समितीकडे पाठवावी लागतात. त्यानंतर पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठवते. त्यानंतर राज्य सरकार त्या गावची लोकसंख्या किती आहे हे पाहून त्यासाठी निधी मंजूर करते. आणि आपल्याला 2022 मध्ये हा निधी मंजूर होतो.

15 वा वित्त आयोग :

1 एप्रिल दोन हजार वीस पासून पंधराव्या वित्त आयोगाचे ची सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी 14 वा वित्त आयोग होता. 14 व्या वित्त आयोग या मध्ये शंभर टक्के निधी हा सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये येत होता. परंतु 15 व्या वित्त आयोगामध्ये फक्त 80 टक्के निधी हा ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये येईल. आणि इतर 20 टक्के मधील निधी हा 10 टक्के पंचायत समितीकडे आणि 10% जिल्हा परिषदेकडे जाईल.

आता तुम्ही म्हणाल हे वीस टक्के पैसे आणायचे कसे. तर त्यासाठी ते काम ग्रामपंचायतीला करावे लागते. म्हणजेच आपल्याला पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे जाऊन सांगावे लागेल की, आम्हाला ही कामे करण्यासाठी इतका निधी लागणार आहे.  तर ते आपल्याला तो निधी देतील.

आता आपण ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi) जाणून घेतली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

संविधानामधील ग्रामपंचायत स्थापन करणे बाबत कोणते कलम आहे ?

महारास्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5

ग्रामपंचायत स्थापना कलम

महाराष्ट्र (मुबंई) ग्रामपंचायत अधिनियम, 1958 चे कलम 5

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी किमान वयाची अट 21 वर्ष आहे.

ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?

उत्तर : ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही लोकसंख्येवर अवलंबून असते. ती साधारणपणे 7 ते 17 यांच्यामध्ये असते.

ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण पाहते?

उत्तर : ग्रामसेवक

निष्कर्ष :

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ग्रामपंचायत विषयी माहिती (Gram panchayat information in marathi) जाणून घेतली. ग्रामपचायत माहिती मराठी (Grampanchayat mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

8 thoughts on “ग्रामपंचायत विषयी माहिती | Gram panchayat information in marathi

 1. sandip bhalerao

  khupach chan yat karmachari yanchi mahiti ani karmachari yanche adhikar kay kay ahe he jar kalale tr bare hoil

  Reply
  1. Vijay Agoshe

   एकदम सुटसुटीत मस्त माहिती दिली आहे…. .

   Reply
 2. Ismail Mahmood Dhansay

  agdi point to point pan mahatwachi mahiti denara lekh.

  Reply
 3. शरद

  अ नावाचं मोठ गाव आहे आणि त्यामध्ये ब, आणि क नावाची दोन छोटी महसूली गावे आहेत पण ग्रामपंचायत अ नावाने ओळखली जाते जर ग्रामसभा ची नोटीस काढायची असल्यास अ, बरोबर ब आणि क गावांचा उल्लेख करावा की ग्रामपंचायत अ मधील रहिवाशी म्हणून उल्लेख करावा याच कृपया स्पष्ष्टीकरण करावा ही विनंती

  Reply
  1. Talks Marathi Post author

   अ ग्रामपंचायत रहिवासी आहे, असा उल्लेख करावा.

   Reply
  2. malhari chavan

   Sir….. तुमचा प्रश्न खूप चांगला आहॆ आपली काही हरकत नसेल तर उत्तर देतो.
   आपणास ग्रामसभेचे नोटीस काढताना ग्रामपंचायत…अ… उल्लेख करावा लागेल फक्त परंतु नोटीस मध्ये तुमाला असे लिहावे लागेल पहा
   ग्रामपंचायत.. अ.. ( महसूल ब )
   …………. वगैरे धन्यवाद शरद sir

   Reply
 4. Saurabh Dongare

  मला ग्रामपंचायत ही माहिती वाचून खूप आनंद झाला म्हणजे की हे माहीत की आपली ग्रामपंचायत आपल्या ग्रामस्थांसाठी/गावकरी लोकांसाठी कोणती कामे करू शकते आणि कोणती कामे कोण करू शकतो सचिवाकडे या प्रमुखांकडे कोणते कामे असतात हे सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *