यूट्यूब विषयी माहिती | YouTube information in marathi

Youtube information in marathi : मित्रांनो यूट्यूब वर व्हिडिओ पाहायला तर सर्वांना आवडते.  याच यूट्यूब च्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल करिअर सुद्धा बनवलं आहे  आता यूट्यूब चा वापर तर सर्वजण करतात. आणि यूट्यूब पूर्ण जगामध्ये गूगल नंतर सर्वात जास्त वापरला जाणारा सर्च इंजिन बनला आहे. एक काळ होता जेव्हा लोक कोणताही कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही ची वाट बघत होते. परंतु यूट्यूब मुळे हे अगदी सोपे झाले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण यूट्यूब विषयी माहिती (YouTube information in marathi) जाणून घेणार आहोत.

Amazing facts about youtube in marathi
यूट्यूब विषयी माहिती | YouTube information in marathi

यूट्यूब विषयी माहिती (YouTube information in marathi)

प्लॅटफॉर्मयूट्यूब (YouTube)
स्थापना14 फेब्रुवारी 2005
हेडक्वार्टर सान ब्रुनो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
संस्थापक स्टीव्ह चेन (Steve Chen),
जावेद करीम (Jawed Karim) &
चाड हर्ले (Chad Hurley)
वापरकर्ते2 अब्ज (ऑक्टोबर 2020)
मालक संस्था अल्फाबेट इन्कॉर्पोरेटेड (इ.स. 2015 –)
YouTube information in marathi

1) यूट्यूब ची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 ला झाली होती ज्याला Steve Chain, Chad Hurleya आणि Javed Karim यांनी बनवले होते. हे तिघेही PayPal मध्ये काम करत होते.

2) यूट्यूब वर पहिला व्हिडिओ जावेद नावाच्या चॅनल वर 23 एप्रिल 2005 ला रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी टाकला होता. हे यूट्यूब चे Co-founder जावेद करीम यांचच चॅनल होत. हा व्हिडिओ फक्त 19 सेकंदाचा होता आणि त्याच नाव होत Me at the zoo.

3) यूट्यूब बनल्यानंतर जवळजवळ 18 महिन्या नंतर म्हणजेच 9 ऑक्टोबर 2006 ला गुगल ने 1 अरब 65 डॉलर ला यूट्यूब ला विकत घेतले होते.

4) आता पूर्ण जगामध्ये 2 अब्ज लोक यूट्यूब चा वापर करतात.

5) प्रत्येक मिनिटाला यूट्यूब वर जवळजवळ 400 तासांचे व्हिडिओ अपलोड केले जातात.

6) दररोज यूट्यूब वर 5 अब्ज पेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले जातात.

7) ज्याप्रमाणे यूट्यूब ची प्रसिध्दी वाढत आहे ते पाहिलं तर अस वाटत की 2025 पर्यंत 32 वर्षाच्या खालील कोणीही टीव्ही चॅनल चा पॅक खरेदी करणार नाही.

8) भारताच्या मुंबई शहरासहित जगातील 10 शहरांमध्ये यूट्यूब स्पेस नावाची जागा आहे, जेथे 10 हजार पेक्षा जास्त Subscribers असलेले लोक जाऊन आपला व्हिडिओ शूट करू शकतात. येथे ग्रीन स्क्रीन पासून sound stage सारख्या अनेक सुविधा आहेत.

9) सन 1998 मध्ये गुगल कंपनी ची सुरुवात करण्यासाठी आपलं गॅरेज देणारी महिला Susan Vojsiki नंतर यूट्यूब ची सीईओ बनली होती.

10) युट्युब जगातील दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. जे गुगल नंतर सर्वात जास्त वेळा पाहिले जाते.

यूट्यूब विषयी माहिती (YouTube information in marathi):

11) तुम्हाला माहित आहे का जवळजवळ 80% पेक्षा जास्त यूट्यूब चे views अमेरिकेच्या बाहेरून येतात.

12) जगातील चीन, इराण आणि उत्तर कोरिया हे असे देश आहेत जेथे यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी बंदी आहे.

13) यूट्यूब वर येणाऱ्या सर्व views मध्ये सर्वात जास्त views हे मोबाईल वरून येतात.

14) यूट्यूब वर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडिओ हा डेस्पासिटो (Despacito) हा आहे. हे एक साँग आहे जे 4 मिनिट आणि 42 सेकंदाच आहे.

15) आज पूर्ण जगातील सर्वात मोठ यूट्यूब चॅनल भारताच T-Series आहे.

16) यूट्यूब वरील सर्वात लांब व्हिडिओ च नाव The Longest video on YouTube हे आहे. हा व्हिडिओ 596 तास 31 मिनिटे आणि 21 सेकंदाचा आहे.

17) आज यूट्यूब पूर्ण जगामध्ये 76 भाषेमध्ये आणि 88 देशांमध्ये उपलब्ध आहे.

18) इतक्या मोठ्या यूट्यूब कंपनीला चालवण्यासाठी 6,350,000,000 डॉलर इतका खर्च येतो.

19) यूट्यूब वरील सर्वात कमी वयाचा स्टार हा Ryans World channel आहे. या चॅनल चा मालक 6 वर्षाचा असताना 2017 मध्ये यूट्यूब वरून 1 करोड 10 लाख रुपये कमवले होते.

20) यूट्यूब वर काम करणाऱ्या लोकांपैकी 50% चॅनल असे आहेत जे वर्षाला 6 अंकामध्ये पैसे कमवतात.

यूट्यूब माहिती मराठी (YouTube mahiti marathi)

21) युट्युब वर पाहिले जाणारे 70 टक्के व्हिडिओ हे मोबाईलच्या माध्यमातून पाहिले जातात.

22) लोक युट्युब वर एक अब्ज पेक्षा जास्त तास दररोज व्हिडिओ पाहतात. जे की फेसबुक आणि नेटफ्लिक्स यांच्या व्हिडिओ पेक्षा जास्त आहे.

23) युट्यूब वर दररोज सरासरी एक अब्ज मोबाईल व्हिडिओ व्ह्यूज येतात.

24) युट्युब bing आणि yahoo यांच्या तुलनेने अधिक लोकप्रिय आहे.

25) युट्युब ची सुरुवात व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झाली होती.

26) युट्युब ला सर्वात पहिल्यांदा एक डेटिंग साईट बनवण्यासाठी डिझाईन केले गेले होते.

27) युट्युब ला 16.5 टक्के ट्राफिक अमेरिका या देशातून येते.

28) 2020 पर्यंत युट्युब वर 37 मिलियन युट्युब चॅनेल उपलब्ध होते.

29) सन 2020 मध्ये सर्वात जास्त डाऊनलोड केलेले आयफोन मधील ॲप यूट्यूब होते.

30) एकूण युट्युब वापर करणाऱ्या लोकांमधील 62 टक्के लोक दररोज युट्युब ला भेट देतात.

यूट्यूब विषयी माहिती (YouTube information in marathi)

31) प्रत्येक मिनिटाला केल्या जाणाऱ्या ट्विटमधील चारशे ट्विटमध्ये युट्युब ची लिंक दिलेली असते.

32) YouTube India हे भारतामध्ये 2008 मध्ये लॉन्च केले गेले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

युट्युब कोणत्या देशाचे ॲप आहे?

युट्यूब अमेरिकेचा ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे.

युट्युब चे मुख्यालय (Headquarter of youtube) कोठे आहे?

युट्युब चे मुख्यालय सान ब्रुनो, कॅलिफोर्निया आहे.

युट्युब चा शोध कधी लागला?

युट्युब चा शोध 14 फेब्रुवारी 2005 रोजी लागला.

यूट्यूब चे संस्थापक (Founders of youtube) कोण आहेत?

यूट्यूब चे संस्थापक स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) & चाड हर्ले (Chad Hurley) आहेत.

युट्युब या माध्यमावर पहिला व्हिडिओ कधी तयार झाला

युट्युब या माध्यमावर पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005 ला रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी तयार झाला.

यूट्यूब चे किती वापरकर्ते आहेत? (Users of youtube)

यूट्यूब चे 2 अब्ज (ऑक्टोबर 2020) वापरकर्ते आहेत.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण यूट्यूब विषयी माहिती (YouTube information in marathi) जाणून घेतली. यूट्यूब माहिती मराठी (YouTube mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *