खंड्या पक्षी विषयी माहिती | Kingfisher information in marathi

Kingfisher information in marathi : खंड्या पक्षी हा कोरासीफॉर्म्स वर्गातील एक छोटा आणि मध्यम आकाराचा चमकील्या पक्ष्यांचा समूह आहे. हा पक्षी साधारणपणे ऑस्ट्रेलियामध्ये आणि पूर्ण जगामध्ये आढळतो. हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण खंड्या पक्षी विषयी माहिती (Kingfisher information in marathi) जाणून घेणार आहोत.

खंड्या पक्षी विषयी माहिती (Kingfisher information in marathi)

खंड्या पक्षी विषयी माहिती (Kingfisher information in marathi)

पक्षीखंड्या
शास्त्रीय नाव हॅल्सायन स्मिर्मेन्सिस (Halcyon smyrnensis)
प्रजातीसुमारे 90
आयुर्मान15 वर्षे
खंड्या पक्षी माहिती मराठी (Khandya pakshi mahiti Marathi)

1) खंड्या पक्षी पृथ्वीवरील ध्रुवीय आणि वाळवंटी भाग सोडला तर सर्व ठिकाणी आढळतो.

2) खंड्या या पक्षाच्या अनेक जाती जगामध्ये विभिन्न ठिकाणी आढळतात. सर्व मिळून 87 प्रजाती आहेत. यामधील प्रमुख Pied Kingfisher, Small Blue Kingfisher, Black Caped Kingfisher इत्यादी. भारतामध्ये नऊ प्रकारचे खंड्या पक्षी आढळतात.

3) लाफिंग जॅक नावाचा खंड्या पक्षी ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतो. हा पक्षी त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून प्रसिद्ध आहे. स्मॉल ब्ल्यू खंड्या पक्षी चिमणीच्या समान असतो. हा पक्षी निळ्या रंगाचा असतो. आणि हा माशांची शिकार करण्यामध्ये सर्वात पुढे असतो.

4) नदी आणि तलावांच्या किनारी हा पक्षी नेहमी आढळतो. हा पक्षी झाडांशिवाय घरटे बनवू शकतो. हा पक्षी कोणत्याही जागी घरटे बनवू शकतो. कधीकधी हा पक्षी जमिनीमध्ये बिळामध्ये सुद्धा राहतो. यांच्या घरामध्ये आपल्याला माशांची हाडे नक्कीच सापडतात.

5) खंड्या या पक्षाचा आकार छोट्या आणि मोठ्या या दोन्ही प्रकारांमध्ये असतो. जगातील सर्वात मोठा खंड्या पक्षी ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. आणि जगातील सर्वात लहान आकाराचा खंड्या पक्षी आफ्रिकेमध्ये आढळतो.

6) खंड्या पक्षी सामान्यपणे झाडे आणि पाणी यांच्या आसपास निवास करतो. झाडांजवळ राहणारे खंड्या पक्षी कीटक खातात, तर पाण्याच्या जवळ राहणारे खंड्या पक्षी मासे खातात.

7) खंड्या हा पक्षी मांसाहारी आहे. या पक्षाचे मुख्य अन्न पतंग कीटक असतात. हा पक्षी माशांचे सुद्धा शिकार करतो.

8) Alcedo atthis हे खंड्या पक्षाचे वैज्ञानिक नाव आहे.

9) खंड्या या पक्षाचे साधारण वजन 50 ग्रॅम असते.

10) खंड्या या पक्षाची साधारण लांबी 15 ते 30 सेंटिमीटर असते.

खंड्या पक्षी माहिती मराठी (Khandya pakshi mahiti Marathi)

11) खंड्या पक्षी साधारणपणे जास्तीत जास्त दहा वर्षे जगतो.

12) खंड्या या पक्षाची दृष्टी खूप चांगली असते. ज्यामुळे तो सहजपणे शिकार करू शकतो.

13) खंड्या या पक्षाचे मुख्य दुश्मन साप आणि मांजर असतात.

14) खंड्या पक्षी दोन ते दहा अंडी देतो.  जी पांढऱ्या रंगाची असतात.

15) नर आणि मादी खंड्या पक्षी दिसायला समान असतात.

16) खंड्या या पक्षाची चोच लांब आणि पाय लहान असतात.

17) खंड्या या पक्षाने केलेला हल्ला 99% यशस्वी होतो.

18) लाफिंग कूकाबुरा हा खंड्या पक्षी सर्वात वजनदार म्हणजे 450 ग्रॅम असतो.

19) जास्तीत जास्त खंड्या पक्षाचे पंख चमकदार असतात. ज्यामध्ये हिरवा आणि निळा रंग असतो.

20) खंड्या पक्षी पाण्याच्या वरून पाहतो आणि त्यानंतर तो माशांना पकडतो.

खंड्या पक्षी विषयी रोचक तथ्य (Facts about Kingfisher in marathi)

21) खंड्या पक्षी आता नामशेष होत चालला आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

22) पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.

23) किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात.

24) ते पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतात , परंतु जर हवामान जास्त गरम नसेल तर ते दुपारच्या वेळी देखील शिकार करू शकतात.

25) किंगफिशर हे सामान्यतः लाजाळू पक्षी असतात, परंतु तरीही मानवी संस्कृतीत ते मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, सामान्यतः त्यांच्या चमकदार पिसारा किंवा काही प्रजातींमध्ये मनोरंजक वर्तनामुळे.

26) किंगफिशरची सर्वात लहान प्रजाती म्हणजे आफ्रिकन बटू किंगफिशर (इस्पिडिना लेकॉन्टी), जिचे सरासरी वजन 10.4 ग्रॅम आणि आकार 10 सेमी (4 इंच) आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मासे पकडणारा लांब चोचीचा रंगीबेरंगी पक्षी

मासे पकडणारा लांब चोचीचा रंगीबेरंगी पक्षी खंड्या पक्षी आहे.

पाण्यावर सूर मारून मासे पकडणारा पक्षी

पाण्यावर सूर मारून मासे पकडणारा पक्षी खंड्या पक्षी आहे.

खंड्या पक्षी समानार्थी शब्द

गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडला, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण खंड्या पक्षी विषयी माहिती (Kingfisher information in marathi) जाणून घेतली. खंड्या पक्षी माहिती मराठी (Khandya pakshi mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “खंड्या पक्षी विषयी माहिती | Kingfisher information in marathi

  1. आज सकाळी मी आमच्या जवळच्या झाडावर हा पक्षी पाहिला. त्याची माहिती वाचली. खूप छान माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाली. ज्ञानात भर पडली. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *