फ्री फायर ची माहिती | Free Fire information in marathi

Free Fire information in marathi: तुम्हाला फ्री फायर विषयी माहिती आहे का? किंवा फ्री फायर कोणत्या देशाची गेम आहे? जर तुम्हाला या विषयी माहिती नसेल तर आज आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्हाला मोबाइल किंवा कॉम्प्युटर गेम खेळणे पसंद असेल, किंवा तुम्ही या आधी ही गेम नक्कीच खेळली असेल. जर तुम्ही ही गेम कधी खेळली नसेल तरीसुद्धा याबद्दल कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. चला तर मग आज आपण फ्री फायर विषयी माहिती (Free Fire information in marathi) जाणून घेऊ या.

फ्री फायर विषयी माहिती (Free Fire information in marathi)

फ्री फायर विषयी माहिती (Free Fire information in marathi)

फ्री फायर एक ॲक्शन गेम आहे. ज्यामध्ये आपल्याला 50 लोकांविरुद्ध लढाई करावी लागते. आणि त्यांना मारावे लागते. आणि आपल्याकडे जवळ जवळ दहा मिनिटांचा वेळ असतो. या वेळेमध्ये आपल्याला दुसऱ्या लोकांना मारून आपण लढाई जिंकायची असते. या गेमची सुरुवात काही अशीच झाली होती, की येथे आपल्याकडे कोणत्याही प्रकारची शस्त्रे नसतात आणि आपल्याला जाऊन ती गोळा करावी लागतात.

फ्री फायर चा मालक कोण आहे (Owner of free fire in Marathi)

फ्री फायर गेम चे मालक फॉरेस्ट लि (Forrest Li) हे आहेत. यांनी फ्री फायर या गेमची सुरुवात 20 नोव्हेंबर 2017 मध्ये केली होती. आणि 4 डिसेंबर 2017 मध्ये अँड्रॉइड आणि आयओएस साठी ही गेम लॉन्च केली गेली होती. या मोबाईल गेम चे पाचशे मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

Forrest Li हे फ्री फायर गेमचे मालक आहेत. सध्याच्या काळात फॉरेस्ट ली त्यांची कंपनी गेरेना (Garena) चे चेअरमन सुद्धा आहेत. या कंपनीचा पहिला प्रॉडक्ट Garena Plus हा होता जो एक ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फ्री फायर भारतातील एक यशस्वी मोबाईल गेम आहे. या गेम ला भारतामध्ये खूप पसंद केले जाते. आणि खूप सारे असे सुद्धा लोक आहेत जे फ्री फायर गेम खेळून पैसे सुद्धा कमवतात.

फ्री फायर गेम मध्ये 50 पेक्षा जास्त खेळाडू असतात. जे एक दुसऱ्याला मारण्यासाठी शस्त्रांचा आणि उपकरणांचा वापर करतात. यामध्ये खेळाडूंना इतर खेळाडूंना मारूनच जिंकावे लागते. जो जिंकतो त्याला Booyah दिला जातो. या गेममध्ये चार नकाशे असतात. Barmuda, Purgatory, Kalahari.

फ्री फायर कोणत्या देशाची गेम आहे?

फ्री फायर गेम सिंगापूर या देशांमध्ये बनवली गेली आहे. आणि फ्री फायर बनवणारी garena कंपनी सुद्धा सिंगापूर चीच आहे. जी Gaming, eSports, E-commerce आणि Digital Finance सारख्या क्षेत्रामध्ये काम करते. फ्री फायर गेम चे पाचशे मिलियन पेक्षा जास्त खेळाडू आहेत. आणि ही गेम खूप साऱ्या देशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे.

फ्री फायर गेम बनवण्याची सुरुवात 2017 मध्ये झाली होती. ही गेम बनवण्याचे काम 111 Dots Studio आणि Omens Studios यांना दिले गेले होते. याच्या काही महिन्यानंतर फ्री फायर बीटा व्हर्जन लॉन्च केले गेले. आणि शेवटी 4 सप्टेंबर 2017 ला फ्री फायर ला पूर्ण जगामध्ये लॉन्च केले गेले. आणि ही गेम अँड्रॉइड आणि आयओएस या दोघांसाठी सुद्धा बनवली गेली होती.

ब्राझील या देशामध्ये सर्वात प्रसिद्ध मोबाईल गेम फ्री फायर आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार 450 मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आणि 50 मिलियन पेक्षा जास्त दररोज सक्रिय वापरकर्ते आहेत. याबरोबरच हे ॲप एप्पल ॲप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर यांना मिळून 2018 मध्ये फ्री फायर जगातील सर्वात जास्त डाउनलोड केलेली चौथी गेम ठरली होती.

2019 मध्ये फ्री फायर ब्राझील मध्ये पहिल्या क्रमांकावर होती. याबरोबरच भारतामध्ये फ्री फायर चे 100 करोड पेक्षा जास्त वापर करते आहेत.

फ्री फायर गेम किती रुपये कमावते?

फ्री फायर गेम ने जवळजवळ 200 करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे. जेव्हा स्मार्टफोन गेमिंग बद्दल गोष्ट येते तेव्हा डेवलपर प्रत्येक वेळी प्रतिस्पर्धा बरोबर स्पर्धा करीत असतात. मग शेवटच्या क्रमांकावर येण्यासाठी असो किंवा अन्य काही असो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण फ्री फायर विषयी माहिती (Free Fire information in marathi) जाणून घेतली. फ्री फायर चा मालक कोण आहे (Owner of free fire in Marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “फ्री फायर ची माहिती | Free Fire information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *