नागालँड राज्याची माहिती मराठी | Nagaland information in marathi

Nagaland information in marathi : नागालँड भारताचे एक उत्तर पूर्व राज्य आहे. नागालँडची राजधानी कोहिमा ही आहे. नागालँड राज्याची सीमा पश्चिमेला आसाम, पूर्वेला बर्मा आणि दक्षिणेला मणिपूर ला जाऊन मिळते. नागालँड मधील सर्वात मोठे शहर दिमापूर आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नागालँड राज्याची माहिती मराठी (Nagaland information in marathi) जाणून घेणार आहोत.

नागालँड राज्याची माहिती मराठी (Nagaland information in marathi)

राज्यनागालँड
निर्मिती 1 डिसेंबर 1963
राजधानीकोहिमा
सर्वात मोठे शहरदिमापूर
अधिकृत भाषाइंग्रजी
लोकसंख्या22 लाख (2020)
क्षेत्रफळ16579 चौकिमी
जिल्हे 12
Nagaland in marathi

1) नागालँड भारताच्या उत्तर-पूर्व ब्रह्मपुत्र घाटामध्ये आणि बर्मा च्या सुंदर पर्वतामध्ये वसलेले लहान राज्य आहे. ज्याच्या परंपरा इतर देशांच्या तुलनेने भिन्न आणि वेगळ्या आहेत.

2) नागालँड च्या उत्तरेला अरुणाचल प्रदेश, पश्चिमेला आसाम, दक्षिणेला मनिपुर आणि पूर्वेला म्यानमार स्थित आहे.

3) नागालँडचे प्राकृतिक सौंदर्य पाहून याला भारत देशाचे स्विझरलँड असेसुद्धा म्हणतात.

4) नागालँड 1961 पूर्वी नागा हिल्स त्वेनसांग या नावाने ओळखले जात होते. परंतु 1 डिसेंबर 1963 रोजी भारत सरकार द्वारे नागालँडला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.

5) नागालँड ची राजधानी कोहिमा आहे तर नागालँडमधील सर्वात मोठे शहर दिमापूर आहे.

6) नागालँड राज्याची लोकसंख्या इतर राज्यांच्या तुलनेने खूप कमी आहे. साधारणपणे 19 लाखाच्या आसपास लोक येथे निवास करतात.

7) नागालँड भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्याची लोकसंख्या 2001 ते 2011 यामध्ये कमी झाली होती.

8) नागालॅंड एक प्राकृतिक सौंदर्याने नटलेले राज्य आहे. ज्याला चारही बाजूंनी पर्वतांनी घेरलेले आहे. नागालँड राज्याचा कमीत कमी वीस टक्के भाग जंगलांनी आणि हिरवळीने भरलेला आहे. ज्यामुळे नागालँड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी हे काही स्वर्गाहून कमी नाही.

9) नागालँडची जवळ जवळ 80 टक्के लोकसंख्या ईसाई धर्माचे पालन करते.

10) नागालँडमध्ये कोहिमा, दीमापुर, मोकोकचुआंग, वोखा, मोन ही पर्यटकांसाठी महत्वाची पर्यटन स्थळे आहेत.

नागालँड माहिती मराठी (Nagaland mahiti marathi)

11) नागालँड राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त अधिक जाती-धर्माचे आणि उपजातींचे लोक राहतात. ज्यांची संस्कृती, मान्यता, रीती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे.

12) नागालँडमध्ये खूप भाषा बोलल्या जातात. परंतु इंग्रजी नागालँडची अधिकृत भाषा आहे.

13) नागालँड मधील लोकांची वेशभूषा सुद्धा खूप वेगळी आहे. येथील निवासी रंगीबेरंगी चादरी प्रमाणे कपडे घालने पसंद करतात.

14) नागालँड मधील काही जनजातीचे लोक आपल्या जुन्या परंपरा मुळे स्वप्नांना खूप महत्त्व देतात. आणि स्वप्नांच्या मदतीने ते सत्य करण्याचा प्रयत्न करतात.

15) नागालँडमध्ये एकमेव रेल्वे स्टेशन आणि विमानतळ आहे. जे दीमापुर मध्ये स्थित आहे. नागालँड राज्याच्या रेल्वे लाईन ची एकूण लांबी 13 किलोमीटर आहे.

16)  नागालँडमध्ये अशी काही जनावरे खाल्ली जातात, जी इतर राज्यांमध्ये साधारणपणे खाल्ली जात नाहीत.

17) नागालँड मधील लोक शिक्षण क्षेत्रामध्ये भारताच्या अनेक राज्यांच्या पुढे आहेत. येथील जवळजवळ 85 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शिक्षित आहे.

18) नागालँड च्या संस्कृतीमध्ये नाच आणि गाण्याला खूप महत्व आहे.

19) नागालँड मधील लोक आज सुद्धा शेकडो वर्षाच्या पिढीपासून चालत आलेल्या लोकगीतांचे गुणगान करतात.

20) नागालँडमधील 80 टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी जोडलेली आहे. येथील जास्त करून सण सुद्धा कृषिक्षेत्राशी जोडलेले आहेत. एक कृषिप्रधान राज्य असून सुद्धा येथील लोक पालेभाज्या खाणे पसंत करत नाहीत.

नागालँड विषयी काही रोचक तथ्य (Facts about nagaland in Marathi)

21) नागालँडमध्ये जगातील सर्वात तिखट मिरची ‘भूट जोलोकिय’ आढळून येते. ज्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

22) नागालँड राज्याला उत्सवांची भूमी असे म्हणतात. हॉर्नबिल उत्सव नागालँड मधील सर्वात लोकप्रिय उत्सव आहे. हा उत्सव राज्य सरकार द्वारे पर्यटन आणि राज्याच्या लोकांमधील संस्कृती वाढवण्यासाठी वर्ष 2000 पासून सुरू करण्यात आला आहे.

23) कोणतीही बाहेरील व्यक्ती नागालँडमध्ये प्रॉपर्टी खरेदी करू शकत नाही. नागालॅंडमध्ये राहण्यासाठी आपल्याला सरकारकडून इनर लाइन परमिट घ्यावी लागते.

24) नागालँड राज्य मध्ये 15 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात.

25) नागालँडमध्ये एकूण अकरा जिल्हे आहेत.

26) नागालँड मधील रस्त्यांची एकूण लांबी 9860 किलोमीटर आहे.

27) नागालँड राज्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींच्या सुद्धा अनेक प्रजाती आढळतात.

28) तांदूळ, भात, मका ही नागालँड मधील प्रमुख पिके आहेत.

29) शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत.

30) नागालँड राज्यात एकूण 16 जमाती राहतात. प्रत्येक जमात त्याच्या विशिष्ट चालीरीती, भाषा आणि पेहराव यामुळे इतरांपेक्षा वेगळी आहे. नागालँड, अंगामी, आओ, चकेसांग, चांग, ​​दिमासा कचारी, खियामिंगन, कोन्याक, लोथा, फोम, पोचुरी, रेंगमा, संगतम, सुमी, इंचुंगर, कुकी आणि झेलियांग या त्या 16 जमाती आहेत.

31) नागालँडमधील सर्वोच्च शिखर सरमती पर्वत आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 3840 मीटर आहे.

32) नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणात मान्सून हवामान आहे ज्यामध्ये आर्द्रता जास्त आहे.

33) नागालँडचा सुमारे एक षष्ठांश भाग उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे – ज्यात पाम, बांबू, रतन तसेच लाकूड आणि महोगनी जंगलांचा समावेश आहे.

34) Blyth’s tragopan गॅलिफॉर्मची एक असुरक्षित प्रजाती, नागालँडचा राज्य पक्षी आहे.

35) मिथुन हा नागालँडचा राज्य प्राणी आहे.

36) हिंदू धर्म हा नागालँडमधील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

नागालँड मधील जिल्हे (Districts of Nagaland in marathi)

नागालँड मध्ये एकूण 12 जिल्हे आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

किफिरेफेक
कोहिमामोकोकचुंग
झुन्हेबोटो मोन
दिमापूर लाँगलेंग
त्वानसांगवोखा
पेरेन नोकलाक
नागालँड मधील जिल्हे (Districts in Nagaland)

नागालँड मधील पाहण्यासारखी ठिकाणे (Tourist places of Nagaland in marathi)

  • दिमापूर
  • कोहिमा
  • मोकोकचुंग
  • किफिरे
  • नागा हेरिटेज गाव

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नागालँड चे मुख्यमंत्री कोण आहेत?

नेफिउ रिओ (2021)

नागालँड चे राज्यपाल कोण आहेत?

जगदीश मुखी (सप्टेंबर 2021)

नागालँड ची राजधानी कोणती आहे?

कोहीमा

नागालँड ची लोकसंख्या किती आहे?

22 लाख (2020)

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण नागालँड राज्याची माहिती मराठी (Nagaland information in marathi) जाणून घेतली. नागालँड माहिती मराठी (Nagaland mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली एक कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *