पत्रकार दिन माहिती 2022 | Journalist Day information in marathi

Journalist Day information in marathi : महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. आज आपण पत्रकार दिन माहिती (Journalist Day information in marathi) जाणून घेणार आहोत.

Journalist Day information in marathi
पत्रकार दिन माहिती (Journalist Day information in marathi)

पत्रकार दिन माहिती (Journalist Day information in marathi)

मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरु केले. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जांभेकर यांचे स्मरण करुन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो.

बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता.

भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.

त्याचवेळी इंग्रजी सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.

वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.

पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | patrkar din quotes in marathi

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

निर्भिड आणि निःपक्ष पत्रकारितेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी सर्व बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा…

मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

लेखणी असो वा माईक. पण निर्भिड, प्रामाणिक आणि सचोटीची पत्रकारीता करणा-या तमाम पत्रकार बंधू, भगिनींना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

आपल्या लेखणीतून आदर्श व निर्भीड विचारांना वारसा देणाऱ्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रसार माध्यमातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा…

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या देशातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी पत्रकार दिनानिमित्त मुद्रित माध्यमांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व्हिडीओ जर्नलिस्ट बंधू-भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक,पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

राष्ट्रीय पत्रकार दिन

16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

हा पत्रकारितेचा प्राण आहे

लोकशाही हा पत्रकारितेचा प्राण आहे.

पत्रकारिता म्हणजे काय?

वर्तमानपत्रे किंवा मासिके यासाठी वृत्त गोळा करण्याचा आणि वृत्तलेखन करण्याचा किंवा त्याबाबत आकाशवाणी किंवा दूरदर्शन यावर बोलण्याचा व्यवसाय म्हणजे पत्रकारिता.

पत्रकारिता कोर्स मराठी

डिप्लोमा इन जर्नलिझम,

पत्रकार म्हणजे काय?

वृत्तपत्रांत नियमितपणे लेखन करणाऱ्या, तसेच बातम्या देणाऱ्या लेखकांना पत्रकार असे म्हणतात.

शोध पत्रकारिता म्हणजे काय?

शोध पत्रकारितेमुळे संबधित व्यक्तींच्या अपकृत्यांबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. एवढेच नव्हे, तर अपकृत्यांना आळाही बसू शकतो. मात्र त्यासाठी शोध पत्रकारांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविणे आणि त्यांनी लिहिलेल्या मजकुराला जागा देणे, अशा तीन प्रकारे वृत्तपत्रांना अधिक खर्च करावा लागतो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण पत्रकार दिन माहिती (Journalist Day information in marathi) जाणून घेतली. पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | patrkar din quotes in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *