पु ल देशपांडे कविता | Pu La Deshpande poems in marathi

Pu La Deshpande poems in marathi : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे हे लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. तसेच ते प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, गायकही होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात पु. ल. म्हणून ओळखले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पु ल देशपांडे यांच्या कविता (Pu La Deshpande poems in marathi) जाणून घेणार आहोत.

पु ल देशपांडे यांच्या कविता (Pu La Deshpande poems in marathi)

पु ल देशपांडे यांच्या कविता (Pu La Deshpande poems in marathi)

मैत्री

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
‘रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असंही काहीच नाही;
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव
असणं ही झाली मैत्री.’
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी
माणसातलं माणूसपण जाणलं…..
अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा.
ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या…

मीपणा

‘एकदा मीपणा’ विकून पहा…..
‘जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समैजेल की किती फालतू गोष्ट
‘आपण इतके दिवस’ ‘बाळगत होतो…???’

‘बोलावे तर विचार करुन……
‘नाहीतर बडबड सगळेच करतात…..
“ऐकावे तर अंतःकरणातून……
‘आरोळी तर सारेच देतात….!’

‘टिपावं तर अचूक टिपावं…..
‘नेम तर सारेच धरतात…..
“शिकावं तर माफ करायला…..
‘राग तर सगळेच करतात….!’

‘खळगी भरावी तर उपाशी पोटाची…..
‘पोट भरुन तर सारेच जेवतात…..
‘प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष..
‘सुखाचे घोट तर सारेंच घेतात…!”

‘जगावं तर इतरांसाठी…..
‘स्वतःसाठी तर सगळेच जगतात…..
‘ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास….
“घात तर सारेच करतात…!”

“दुःखामधे सुद्धा रहावं हसत “
वेळ तर सर्वांचीच येते…..
‘झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
‘राख तर सर्वांचीच होते….

मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ ॥१॥

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण ॥२॥

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे ॥३॥

‘खुदकन हसू’ चे पैसे आठ
खो खो खो’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा कुणी वंदा ॥४॥

कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच?
हा लेकाचा शहाणा की खुळा?
मग मी मारतो मलाच डोळा ॥५॥

पु ल देशपांडे यांच्या विनोदी कविता (Pu La Deshpande comedy poems in marathi)

फोटोमधली तरुणी

माझ्या खोलीतल्या
फोटोमधली तरुणी परवाच
मला म्हणाली
‘मला चागंलेसे स्थळ
शोधून द्या ना – इथे
माझ्या जीवाला टांगल्यासारखं वाटतंय’

चायलेंज

अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचीली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलवीला रेडा । रेघ बी. ए. ची ओलाडां!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भितं
चालवून दावा जणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा चायलेंज स्विकारा

घुंघुंर

आणि मध्यरात्री…..
जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या
एकच सारमेय दूरवर भुंकत होता
त्या वेळी तुझे घुंघुंर ऐकू आले.
अधांराच्या दालनातून
तुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले…
पण मी नाही दचकलो…
मी काही रातकिडा आहे?

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून पुण्यात वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात.

एक होती ठम्माबाई

एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्क कुठे उरलेच नाही वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर शोफर बेरा कुक –
घरात आंबून चाललय सुख
घराबाहेर दुःख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हर एक दुःखावरती डोस
पाजीन म्हणतेः पिणार कोण?
सगळ्या जणींना करते फोन
11 ‘मला कराल का हो मेंबर?”
अय्या, सॉरी, राँग नंबर !”
‘सगळ्या मेल्या मारतात बंडल’
म्हणून स्वतःचेच काढते ‘ मंडळ ‘!

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पु ल देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार

1) पद्मश्री
2) महाराष्ट्र भूषण
3) महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
4) पद्मभूषण

पु ल देशपांडे विचार

1) माणसाचे केस गेले असले तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस नसावा.
2) “जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे.”
3) काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.
4) समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
5) भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे.

पाच अक्षरी मराठी नाटकांची नावे

1) तो मी नव्हेच
2) मानापमान
3) सुवर्णतुला
4) बावणखणी
5) पुण्यप्रभाव
6) भावबंधन

पहिले मराठी नाटककार कोण

विनायक जनार्दन कीर्तने

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पु ल देशपांडे यांच्या कविता (Pu La Deshpande poems in marathi) जाणून घेतल्या. पु ल देशपांडे यांच्या विनोदी कविता (Pu La Deshpande comedy poems in marathi) तुम्हाला कश्या वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे सुद्धा पु ल देशपांडे यांच्या काही कविता असतील तर त्या कमेंट करा. आम्ही त्या या लेखामध्ये नक्की समाविष्ट करू.

One thought on “पु ल देशपांडे कविता | Pu La Deshpande poems in marathi

  1. Ek jagtik vyakti jyani amch lahanpanat aplya shikshana chi odh mulanchya dokyawrti thwli…
    Shat Naman Sahebana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *