Pu La Deshpande Books list in Marathi : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पु.ल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे व माहिती (Pu La Deshpande Books list in Marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
पु. ल. देशपांडे यांची माहिती (Pu La Deshpande information in marathi)
नाव | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु.ल.देशपांडे) |
जन्म | 8 नोव्हेंबर 1919 (मुंबई) |
मृत्यू | 12 जून 2000 (पुणे) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वडील | लक्ष्मण त्रिंबक देशपांडे |
आई | लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे |
पत्नी | सुनीता पुरुषोत्तम देशपांडे |
पुरस्कार | पद्मश्री, महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण |
कार्यक्षेत्र | नाटककार, साहित्यकार, संगीतकार विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक |
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे (Pu La Deshpande Books list in Marathi)
- बटाट्याची चाळ
- अपूर्वाई
- दाद
- गणगोत
- पुरचुंडी
- हसवणूक
- मैत्र
- व्यक्ती आणि वल्ली
- खिल्ली
- चार शब्द
- अघळ पघळ
- जावे त्यांच्या देशा
- आपुलकी
- उरलंसुरलं
- कान्होजी आंग्रे
- पोरवय
- असा मी असामी
- खोगीरभरती
- गोळाबेरीज
- मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
- पूर्वरंग
- वयम मोठम खोटम
- विठ्ठल तो आला आला
- तीन पैशाचा तमाशा
- तुका म्हणे आता
- ती फुलराणी
- नवे गोकुळ
- पुढारी पाहिजे
- भाग्यवान
- आम्ही लटके ना बोलू
- सुंदर मी होणार
- रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
- वंग-चित्रे
- मित्रहो!
- श्रोतेहो !
- मोठे मासे छोटे मासे
- काय वाट्टेल ते होईल
- एक झुंज वार्याशी
- गुण गाईन आवडी
- पु.ल.: एक साठवण
- रसिकहो !
- तुझे आहे तुजपाशी
- वटवट वटवट
- अंमलदार
- टेलिफोनचा जन्म
- मुक्काम शांतिनिकेतन
- एका कोळीयाने
- भावगंध
- कोट्याधीश पुल
- गाठोडं
- द्विदल
- एक शून्य मी
- नस्ती उठाठेव
- पाचामुखी …
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे व माहिती (Pu La Deshpande Books list in Marathi)
नस्ती उठाठेव
एकूण 13 लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक पुलंची ही नस्ती उठाठेव हवीशी उठाठेव करून टाकते. लेखाबरोबरच नाट्यप्रवेशही वाचायला मिळतात.शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाची खुमासदार गंमत त्यात अनुभवायला मिळतात.
एक शून्य मी
पु. ल. देशपांडे यांच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह. ‘मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस’ या लेखाने पुस्तकाची सुरवात होते. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी, एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ आदी लेखांतून पु. ल. अनेक विषय हाताळतात. त्यातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन ते घडवितात.
अघळ पघळ
खळाळून हसत दिवस प्रसन्न करणाऱ्या 12 लेखांचा हा संग्रह आहे. अर्थातच पु. लं. देशपांडे यांच्या खास शैलीत शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचे भांडार त्यातून खुले होते. या विनोदाला दृश्यात्मकता असल्याने प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहण्याची किमया या लेखांनी साधली आहे. या लेखांची शिर्षकही आगळीवेगळी आहेत.
हसवणूक
हसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करीत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. माझं खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पोष्टिक जीवन, पाळीव प्राणी अशा कथांमधून पु. ल. चा निखळ, खळखळता विनोद पानोपानी आपल्या भेटीला येतो. पण त्याही आधी आपल्याला भेटते ती त्यांची सही आणि त्यांनी वाचकांशी केलेलं हितगुज.
बटाटयाची चाळ
प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. देशपांडे हे आपले सांस्कृतिक वैभव आणि त्यांची बटाट्याची चाळही! चाळीचे हे पुस्तक आले आणि त्या नंतर त्याच्यावर आधारित नाट्यप्रयोग. हा प्रयोग पाहण्यासाठी मुंबईत तीन-तीन तास रांगेत उभे राहून तिकिटे काढत, अशा आठवणी सांगितल्या जातात. पुलंच्या या चाळीत वाचकांनी आणि प्रेक्षकांनीही स्वतःला शोधले. सांस्कृतिक चळवळ, सांस्कृतिक शिष्टमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह-झालीच पाहिजे अशा एकूण 12 प्रकरणांमधून ही चाळ उभी राहते. सूक्ष्म निरीक्षणशक्तीने रंगविलेली चाळीतील व्यक्तीचित्रे मनमुराद हसवितात.
व्यक्ती आणि वल्ली
व्यक्ती आणि वल्ली हे पु.ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचे नाव आहे. इ.स. 1944 मध्ये ‘अभिरुची’ नावाच्या मासिकात पु.लं. नी ‘अण्णा वडगावकर’ नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून इ.स. 1961 पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे.
अपूर्वाई
अपूर्वाई हे पु. ल. देशपांडे यांनी मराठी भाषेत लिहिलेले प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. 1960 साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले. त्यांनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स व जर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे.
आपुलकी
मराठी मनाला साद घालणार्या बालगंधर्व, कवी गिरीश, अनंत काणेकर, शरद तळवलकर आदि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची पु. लं चा लेखणीनं जिवंत केलेली भावचित्रें म्हणजे ‘आपुलकी’.
उरलंसुरलं
पु.लं.च्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह! पु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात- ‘माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्या माझ्या वाचकवर्गालाच हे ‘उरलंसुरलं’ कृतज्ञपूर्वक अर्पण करतो.’
काय वाट्टेल ते होईल
काय वाट्टेल ते होईल ही पु.ल. देशपांडे यांनी, अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची आत्मकथा आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- मराठी कादंबरी यादी (Marathi novel list)
- 100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors)
- मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पु. ल. देशपांडे यांच्या नाटकांची नावे / यादी
अंमलदार
एक झुंज वाऱ्याशी
तीन पैशाचा तमाशा
ती फुलराणी
तुका म्हणे आता
तुझे आहे तुजपाशी
भाग्यवान
सुंदर मी होणार
पु ल देशपांडे विनोदी कथा
एका रविवारची कहाणी,
बिगरी ते मॅट्रिक,
मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?
मी आणि माझा शत्रुपक्ष.
पु ल देशपांडे यांचा जन्म कोठे झाला?
पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबई येथे झाला.
अपूर्वाई हे प्रवासवर्णन कोणी लिहिले
अपूर्वाई हे प्रवासवर्णन पु ल देशपांडे यांनी लिहिले.
पु ल देशपांडे प्रवासवर्णने
अपूर्वाई
पूर्वरंग
जावे त्यांच्या देशा
वंगचित्रे
पु. ल. देशपांडे व्यक्तिचित्रे
आपुलकी
गणगोत
गुण गाईन आवडी
व्यक्ती आणि वल्ली
पु ल देशपांडे कोण होते?
पु ल देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, विनोदकार होते. त्यांचा जन्म 1919 मध्ये मुंबईत झाला आणि 2020 मध्ये पुण्यात त्यांचे निधन झाले.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे (Pu La Deshpande Books list in Marathi) जाणून घेतली. पु. ल. देशपांडे यांची माहिती (Pu La Deshpande information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
Credits : Books Summaries from BOOKGANGA.COM