यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे | Top 10 tourist places of yavatmal in marathi

Top 10 tourist places of yavatmal in marathi : मित्रांनो यवतमाळ हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. यवतमाळ हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो. लोकसंख्येनुसार विदर्भातील सर्वात मोठा तिसरा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखले जाते. भारतातील ब्रिटीश राजवटीमध्ये यवतमाळ हा जिल्हा वणी मधील प्रमुख जिल्हा होता. सन 1905 मध्ये वनी हे नाव बदलून या जिल्ह्याचे नाव यवतमाळ असे ठेवण्यात आले. डोंगराळ आणि मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून सुद्धा यवतमाळला ओळखले जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे (Top 10 tourist places of yavatmal in marathi) जाणून घेणार आहोत.

Top 10 tourist places of yavatmal in marathi
यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे (Top 10 tourist places of yavatmal in marathi)

यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे (Top 10 tourist places of yavatmal in marathi)

जिल्हायवतमाळ
राज्यमहाराष्ट्र
विभागअमरावती
लोकसंख्या13,584 चौकिमि.
क्षेत्रफळ27,75,457 (2011)
भाषामराठी
वाहन नोंदणीMH 19
यवतमाळ माहिती मराठी (Yavatmal information in marathi)
  1. चिंतामणी गणेश मंदिर
  2. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य
  3. सहस्त्रकुंड धबधबा
  4. कंबल्पोष बाबा दर्गा
  5. श्री जगदंबा मंदिर
  6. टिपेश्वर अभयारण्य
  7. रंगनाथ स्वामी मंदिर
  8. येळाबरा धबधबा
  9. ऑक्सिजन पार्क
  10. बेंबळा धरण

1) चिंतामणी गणेश मंदिर (Chintamani Ganesh Mandir)

चिंतामणी मंदिर हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्रातील 21 गणेश पीठांपैकी एक आणि विदर्भातील अष्टपिठापैकी एक अशी या चिंतामणी मंदिराची ख्याती आहे. चिंतामणी गणेश मंदिर हे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे आहे. यवतमाळ शहरापासून चिंतामणी गणेश मंदिर हे ते 23 किलोमीटर अंतरावर आहे. चिंतामणी गणेश मंदिर हे गावाच्या भू पातळीपासून 33 फूट खोल गाभाऱ्यात आहे. आणि या गाभाऱ्यामध्ये उतरण्यासाठी चिरेबंदी अशा दगडाच्या 29 पायऱ्या आहेत. आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची मूर्ती आहे.

2) पैनगंगा वन्यजीव अभयारण्य (Painganga Wildlife Sanctuary)

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य हे पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक अभयारण्य आहे. विविध वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य आहे यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यांना विभागनाऱ्या पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

जानेवारी 1916 मध्ये पैनगंगा वन्यजीव अभयारण्य ची स्थापना करण्यात आली होती. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य हे 325 चौरस किलोमीटर अंतरामध्ये पसरलेले आहे. या अभयारण्यामध्ये आपल्याला अस्वल, कोल्हा, चितळ, तरस, नीलगाय, हरिण असे अनेक प्राणी पाहायला मिळतात. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य आहे यवतमाळ शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

3) सहस्त्रकुंड धबधबा (Sahastrakund waterfalls)

सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर असलेला एक प्रसिद्ध धबधबा आहे. या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या तालुक्यात तर काही भाग नांदेडच्या किनवट तालुक्यात येतो. विदर्भ विदर्भ आणि मराठवाडा त्यांचे विभाजन करणारा हा सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

सहस्त्रकुंड हा धबधबा साधारणपणे 30 ते 40 फूट उंचावरून खाली पडतो. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात. सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ शहरापासून 150 किलोमीटर तर उमरखेड या तालुक्‍याच्या ठिकाणापासून 54 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

4) कंबल्पोष बाबा दर्गा (Kambalposh baba darga)

हजरत कंबल्पोष बाबा दर्गा यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ही दर्गा यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी तालुक्यामधील अरुणावती या नदीच्या किनाऱ्यावर आहे. या दर्ग्यामध्ये दरवर्षी खूप मोठा उरूस साजरा केला जातो. या काळामध्ये ही दर्गा तीन दिवस विविध कार्यक्रमांनी भरलेली असते. हिंदू आणि मुस्लीम धर्माचे लोक येथे दर्शनासाठी या काळामध्ये येत असतात. यवतमाळ शहरापासून हा दर्गा साधारणपणे 50 किलोमीटर अंतरावर आहे.

5) श्री जगदंबा मंदिर (Shree jagdamba mandir)

श्री जगदंबा मंदिर हे आंध्र प्रदेश-महाराष्ट्र सीमेपासून साधारणपणे वीस किलोमीटर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हैदराबाद नागपूर वरील पांढरकावडा गावापासून सात किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे मंदिर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते. आंध्र प्रदेश आणि विदर्भातून अनेक भाविक भक्त या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या मंदिराच्या लगतच एक बगीच्या सुद्धा आहे. त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. श्री जगदंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्त या बगीच्यामध्ये फेरफटका मारताना आपल्याला पाहायला मिळतात.

6) टिपेश्वर अभयारण्य (Tipeshwar Sanctuary)

टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्यपैकी एक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी या तालुक्यामधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या नदीच्या खोऱ्यात टिपेश्वर हे अभयारण्य स्थित आहे. या जंगलामध्ये टिपायी देवीचे मंदिर आहे. टिपायी देवी देवी वरूनच या अभयारण्याला टिपेश्वर हे नाव देण्यात आले आहे. टिपेश्वर अभयारण्य मध्ये आपल्याला वाघ, बिबट्या, रानमांजर, झिपरे अस्वल, काळवीट आणि अनेक सस्तन आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ शहरापासून साधारण पणे 75 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

7) रंगनाथ स्वामी मंदिर (Ranganath Swami Mandir)

रंगनाथ स्वामी हे मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील वनी या शहरामध्ये आहे. हे मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थाना पैकी एक आहे. अनेक भाविक फाल्गुन ते चैत्र या महिन्यांमध्ये येथे दर्शनासाठी गर्दी करत असतात. यवतमाळ शहरातील बस स्टँड पासून रंगनाथ स्वामी मंदिर 110 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

8) येळाबरा धबधबा (Yelabara Waterfall)

येळाबरा धबधबा यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा यवतमाळ मधील सर्वात सुंदर धबधब्या पैकी एक आहे. पावसाळ्यामध्ये हा धबधबा पाण्याने भरलेला पाहायला मिळतो त्यामुळे अनेक पर्यटक पावसाळ्यामध्ये येथे गर्दी करतात. हा धबधबा यवतमाळ जिल्ह्यातील येळाबरा या गावा जवळ आहे. यवतमाळ शहरापासून येळाबरा धबधबा 34 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

9) ऑक्सिजन पार्क (Oxygen park)

ऑक्सीजन पार्क हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख आणि आकर्षक असे पर्यटन स्थळ आहे. ऑक्सीजन पार्क हे शांत ग्रीन झोन साठी प्रसिद्ध आहे. मंत्रमुग्ध निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ऑक्सिजन पार्कला भेट देत असतात. ऑक्सीजन पार्क आहे प्राणायाम, विश्रांती यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. यवतमाळ शहरापासून ऑक्सीजन पार्क हे ठिकाण साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे.

10) बेंबळा धरण (Bembla Waterfall)

बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ मधील एक ठिकाण आहे. बेंबळा हे धरण यवतमाळ शहरापासून साधारणपणे 28 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. बाभूळगाव हे बेंबळा धरणाच्या सर्वात जवळील गाव आहे. बेंबळा धरण बेंबळा नदी वर वसलेले आहे.

या धरणाचा विस्तीर्ण पाणीसाठा पाहिल्यानंतर आपले मन नक्कीच भरून जाते. बेंबळा धरणाच्या आजूबाजूचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. बेंबळा धरण यवतमाळ जिल्हा मधील सर्वात मोठे धरण सुद्धा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात.

आता आपण यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे (Top 10 tourist places of yavatmal in marathi) जाणून घेतली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

यवतमाळ जिल्ह्यातील तालुके

आर्णी, उमरखेड, कळंब, केळापूर, झरी जामणी, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागांव, मारेगांव, राळेगांव, वणी, यवतमाळ तालुका

यवतमाळ किती किलोमीटर आहे?

पुण्यातून यवतमाळ 574.5 किलोमीटर आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटनस्थळे (Top 10 tourist places of yavatmal in marathi) जाणून घेतली. यवतमाळ माहिती मराठी (Yavatmal information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *