Sahastrakund waterfall information in marathi : सहस्त्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे. पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी भेट देण्यासाठी या धबधब्याला येत असतात. हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लाखो लोक गर्दी करतात. हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर वसलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण सहस्त्रकुंड धबधबा माहिती मराठी (Sahastrakund waterfall information in marathi) जाणून घेणार आहोत.

सहस्त्रकुंड धबधबा माहिती मराठी (Sahastrakund waterfall information in marathi)
सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर वसलेला आहे. या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो तर काही भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो. मराठवाडा आणि विदर्भ यांचे विभाजन करणारा हा सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर स्थित आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच हा धबधबा संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करीत असतो. नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. नदीच्या अलीकडील पात्रात कोसळणार्या धारेचा हा सर्वांत मोठा धबधबा आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लामपूर गावापासून साधारणता 5 किलोमीटर अंतरावर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. 30 ते 40 फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा खास करून ऑगस्ट ते सप्टेंबर या पावसाच्या महिन्यात पर्यटकांची गर्दी निर्माण करतो. सहस्त्रकुंड धबधबा तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. खडकावरील शेवाळ्यामुळे खूप जवळ जाणे धोक्याचे असले तरी थोडी काळजी घेतली तर खडकावरवर बसून पाण्याचे तुषार झेलत अंग ओलेचिंब झालेलेसुद्धा कळत नांही.
सहस्त्रकुंड धबधबा इतिहास (Sahastrakund History in Marathi)
मराठवाडा आणि विदर्भाच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर परशुरामाने बाण मारून सहस्त्रकुंड धबधबा ची निर्मिती केली आहे असे या धबधब्या बद्दल बोलले जाते. पैनगंगा नदीला पाणी गंगा नदी म्हणून सुद्धा ओळखले जाते. सहस्त्रकुंड धबधबा पाहिल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो असं अनेक पर्यटक सांगतात.
सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी ठिकाणे (Tourist places of Sahastrakund waterfall)
सहस्त्रकुंड धबधबा पाहिल्यानंतर येथे अनेक पाहण्यासारखी ठिकाणे सुद्धा आहेत. यामध्ये माहूरचे रेणुका माता मंदिर, दत्तशिखर, अनुसया मातेचे मंदिर, आणि येथील निसर्ग पर्यटनाने नटलेल्या डोंगर-दऱ्या पाहायला सुद्धा लोकांना खूप आवडतात. सहस्त्रकुंड धबधबा याच्या किनाऱ्यावर एक सुंदर बगीचा सुद्धा तयार करण्यात आला आहे. या बागेमध्ये असणारी वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करून घेतात.
नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी आवर्जून येतात. हा धबधबा नांदेड पासून 100 किलोमीटर किनवट पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा पैनगंगा नदीवर उभारण्यात येणारा प्रस्तावीत बहुद्देशिय प्रकल्प आहे. कौठा तांडा तालुका हिमायतनगर, जि. नांदेश या गावाजवळ बांधण्यात येणार आहे. यात जवळपास 6277 हेक्टर जमिन बुडीत क्षेत्रात येनार आहे. या प्रकल्पाची किंमत 583 कोटी रुपये इतकी राहणार आहे.या प्रकल्पाद्वारे 25 मेगा वॅट विज उत्पादन होणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi)
- महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (Maharashtra gk question in Marathi)
- अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती (ashtavinayak ganpati names and places in marathi)
- कैलास मंदिर वेरूळ माहिती मराठी (kailash mandir verul information in marathi)
- चिखलदरा संपूर्ण माहिती मराठी (chikhaldara marathi mahiti)
- मुंबईतील गिरगाव चौपाटी पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती (Girgaon Chowpatty information in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लामपूर गावापासून साधारणता 5 किलोमीटर अंतरावर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे.
सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
मराठवाडा आणि विदर्भ यांचे विभाजन करणारा सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर स्थित आहे.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा माहिती मराठी (Sahastrakund waterfall information in marathi) जाणून घेतली. Sahastrakund dhabdhaba nanded ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.