50+ आत्मविश्वास सुविचार मराठी | Self confidence quotes in marathi

Self confidence quotes in marathi : आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर “विश्वास ठेवणे”. आत्मविश्वास ही खरोखर एक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. आत्मविश्‍वासामुळे विचारस्वातंत्र्य मिळते आणि त्यामुळे महान कार्याच्या अंमलबजावणीत साधेपणा आणि यश मिळते. ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास भरलेला असतो, त्याला आपल्या भविष्याची कोणतीही चिंता नसते. आजच्या या पोस्टमध्ये आपण आत्मविश्वास सुविचार मराठी (Self confidence quotes in marathi) जाणून घेणार आहोत.

Self confidence quotes in marathi
आत्मविश्वास सुविचार मराठी (Self confidence quotes in marathi)

आत्मविश्वास सुविचार मराठी (Self confidence quotes in marathi)

जोपर्यंत आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होतं नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ति त्याचे तोंड पाहत राहतील.

आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे.

कष्ट इतक्या शांततेत करा, की यश हमखास धिंगाणा घालेल.

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.

वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस? हे नाही तर, तू काय करतोस? हे विचारतात……

कोणीही तुमच्यासोबत नसेल, तर घाबरुन जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात.

काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते. ‘हो, मी करू शकतो.

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे,हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कासल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.

अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही, तर यशाचा एक भाग आहे. त्यामुळे हार मानू नका.

आत्मविश्वास वर मराठी सुविचार (Confidence quotes in marathi)

Confidence quotes in marathi
आत्मविश्वास वर मराठी सुविचार (Confidence quotes in marathi)

आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.

आत्मविश्वास असला की मग तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीच आर्धी लढाई जिंकलेले असतात!!

कष्ट अशी चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.

जगातील सर्वात चांगला दागिना म्हणजे “परिश्रम” आणि सर्वोत्तम आयुष्याचा जोडीदार म्हणजे ‘आत्मविश्वास’.

आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे, आशा सोडावी अशी वाटते.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.

एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

आत्मविश्वासाठी प्रेरक सुविचार मराठीमध्ये (Confidence quotes in marathi)

Confidence quotes in marathi
आत्मविश्वासाठी प्रेरक सुविचार मराठीमध्ये (Confidence quotes in marathi)

अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास या त्या यशाचा पाया आहे.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी.

न हरता …. न थकता …. न थांबता … प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

आत्मविश्वास सुविचार मराठी (Aatmvishwas suvichar marathi)

Aatmvishwas suvichar marathi
आत्मविश्वास सुविचार मराठी (Aatmvishwas suvichar marathi)

तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती.

गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.

मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..

फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रूतून उभं राहायचं, प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्या वेगाने निघून जातं, आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाच असतं.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”

आत्मविश्वास विचार मराठी (Confidence thoughts in marathi)

Confidence thoughts in marathi
आत्मविश्वास विचार मराठी (Confidence thoughts in marathi)

धैर्य धरणार्‍याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.

स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल.

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक,सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक. परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग.

रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते.

आगीत हात घातला तर भाजेल हे ऐकून, वाचुन कळतं त्यासाठी आपण हात भाजुन घ्यायला नको. आणि अनुभव घेण्यासाठी कधी कधी दुसर्‍यांचे अनुभवही कामी येतात. नुसतं वाचणं आणि त्या लेखकांची अनुभुती समजून घेऊन ती भावना, त्याचं गांभीर्याने म्हणणं समजून घेणं यात फरक आहे.

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

आत्मविश्वास स्टेटस मराठी (Confidence status in marathi)

Confidence status in marathi
आत्मविश्वास स्टेटस मराठी (Confidence status in marathi)

न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत नाही.

यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो.

नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशीबाकडे नेणे गरजेचे असते.

जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय, नवीन वाट आपल्याला सापडत नाही, ती वाट शोधणे महत्वाचे असते.

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायऱ्यांवरुन शिखरावर पोहोचवते.

स्मितहास्य ही अशी वक्र रेशा आहे, जी तुमच्या समस्या कमी करुन तुमचा आत्मविश्वास वाढवते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे?

1) अति विचार करणे टाळावे.
2) नकारात्मक विचार करणं टाळावं.
3) भूतकाळाचा विचार करू नये.
4)

आत्मविश्वास म्हणजे काय?

आत्मविश्वास म्हणजे स्वतःकडे सकारात्मक विचाराने पहाणे. असे विचार जग बदलून टाकू शकतात.

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आत्मविश्वास सुविचार मराठी (Self confidence quotes in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आत्मविश्वास वर मराठी सुविचार (Confidence quotes in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *