त्रिकोणासन माहिती मराठी | Trikonasan information in marathi

Trikonasan information in marathi : बैठं काम, व्यायामाचा अभाव यामुळे कंबरेचं दुखणं खूप लवकर काही जणांच्या मागे लागतं. त्याचबरोबर बैठ्या कामामुळे पचनाशी संबंधित विकारही सतावत असतात. अशा लोकांसाठी त्रिकोणासन हे एक उत्तम आसन आहे. कंबरेचे स्नायू लवचीक आणि मजबूत बनवणारं हे आसन आहे. ते करत राहिल्यानं पाय, गुडघे, पोटऱ्या, हात, खांदे आणि छातीचे स्नायू लवचीक होतात. पार्श्वभागाची हाडं मजूबत होतात. आजच्या या लेखामध्ये आपण त्रिकोणासन माहिती मराठी (Trikonasan information in marathi) जाणून घेणार आहोत.

Trikonasan information in marathi
त्रिकोणासन (Trikonasan in marathi)

त्रिकोणासन माहिती मराठी (Trikonasan information in marathi)

या आसनामध्ये शरीराचा आकार त्रिकोणी होतो, म्हणून त्यास त्रिकोणासन म्हणतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि शरीर सुडौल करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

त्रिकोणासन कसे करावे?

सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये तीन ते चार फूट अंतर ठेवा.
उजवे पाऊल 90 अंशामध्ये आणि डावे पाऊल 15 अंशामध्ये उजवीकडे फिरवा.
दोन्ही पावलांची पकड जमिनीवर घट्ट आहे याची खात्री करून घ्या.
एक दीर्घ श्वास आत घेऊन श्वास सोडत उजवीकडे झुकताना दोन्ही हात सरळ एका रेषेत ठेवा आणि उजवा हात जमिनीकडे आणि डावा हात हवेत सरळ येऊ द्या.
असे करताना कंबर वाकली नाही पाहिजे. शक्य होईल असा उजवा हात उजव्या पायाच्या नडगीवर, घोटय़ावर किंवा जमिनीवर पायाजवळ टेकवा.
श्वासाची गती सामान्य ठेवून जेवढा वेळ शक्य असेल, तेवढा वेळ या स्थितीत थांबून राहायचे आहे. नंतर श्वास घेत हळूहळू पूर्वस्थितीत या. त्यानंतर हेच आसन दुसऱ्या बाजूने करा.

त्रिकोनासनाचे फायदे (Benefits of Trikonasan in marathi)

  • हे आसन केल्याने मान, पाठ, कंबर आणि पाय यांचे स्नायू मजबूत होतात.
  • शरीराचे संतुलन सुरळीत होते.
  • पचनसंस्था चांगली राहते.
  • ॲसिडिटीपासून सुटका मिळते.
  • चिंता, तणाव, पाठ आणि पाठदुखी नाहीशी होते.
  • पोटावरील अतिरिक्त चरबी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.
  • शरीर तंदुरुस्त, मजबूत आणि लवचिक बनवते.
  • दररोज त्रिकोणासनाचा अभ्यास केल्याने वातामुळे होणारे शरीरातील आजार कमी होतात व कालांतराने ते उद्भवतच नाहीत.
  • अकारण भीती आणि ताण-तणाव यामुळे होणारी अस्थिरता कमी होते.
  • मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.

त्रिकोनासनात घ्यावयाची काळजी

  • हे आसन कमी रक्तदाब, उच्च रक्तदाब, मायग्रेन, जुलाब, मान आणि पाठीला दुखापत झाल्यास करू नये.
  • हे आसन करताना डोकेदुखी, चक्कर येणे किंवा पाठदुखी यांसारखी समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टर किंवा योग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • गरोदरपणात हे आसन करू नये.
  • पित्त अथवा संधिवाताचा त्रास असल्यास या आसनाचा अभ्यास टाळावा.
  • शक्यतो आसन योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

सारांश

आजच्या या लेखामध्ये आपण त्रिकोणासन माहिती मराठी (Trikonasan information in marathi) जाणून घेतली. याचबरोबर त्रिकोणासन कसे करावे? आणि त्रिकोनासनाचे फायदे काय आहेत याविषयी माहिती जाणून घेतली. Trikonasan mahiti marathi, Trikonasan in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

One thought on “त्रिकोणासन माहिती मराठी | Trikonasan information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *