डब्ल्यूएचओ चा फुल फॉर्म काय आहे | WHO full form in marathi

WHO full form in marathi : या कोरोना च्या काळामध्ये vaccine, Sanetizer, Hand wash, Social Distance या शब्दांबरोबरच डब्ल्यूएचओ हा शब्द सुद्धा खूप प्रसिद्ध झाला होता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की डब्ल्यूएचओ काय आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण डब्ल्यूएचओ काय आहे (WHO information in marathi), डब्ल्यूएचओ चा फुल फॉर्म काय आहे (WHO full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

डब्ल्यूएचओ माहिती मराठी (WHO information in marathi)

नावजागतिक आरोग्य संघटना
स्थापना 7 एप्रिल 1948
उद्देश्यआरोग्यविषयक संस्था
मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड
जागतिक आरोग्य संघटना माहिती मराठी (WHO information in marathi)

डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. ही एक युनायटेड नेशन ने बनवलेली एजन्सी आहे. जी जगभरातील लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी काम करते. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ ची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली होती. आणि आपण त्याच दिवशी जागतिक आरोग्य दिवस सुद्धा साजरा करतो.  डब्ल्यूएचओ चे मुख्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा शहरामध्ये आहे. आपला भारत देश सुद्धा डब्ल्यूएचओ चा एक सदस्य आहे. भारतामध्ये डब्ल्यूएचओ चे मुख्यालय दिल्ली मध्ये आहे.

भारत 12 एप्रिल 1948 रोजी डब्ल्यूएचओ चा सदस्य बनला होता. डब्ल्यूएचओ चे डायरेक्टर Tedros Ad Janom Ghebr Eyesus आहेत. या संघटनेचे 194 सदस्य राज्य आहेत. आणि यांची सहा Semi autonomous regional offices आफ्रिका, अमेरिका, Southeast Asia, Europe, Eastern Mediterranean आणि Western Pacific येथे आहेत.

याशिवाय डब्ल्यूएचओ ची 150 ऑफिसेस जगभरामध्ये पसरली आहेत. डब्ल्यूएचओ चे स्टॉप मध्ये सात हजार पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. या स्टाप मध्ये मेडिकल डॉक्टर शिवाय शास्त्रज्ञ, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट सामील आहेत.

डब्ल्यूएचओ चा फुल फॉर्म काय आहे (WHO full form in marathi)

डब्ल्यूएचओ चा फुल फॉर्म काय आहे (WHO full form in marathi)

डब्ल्यूएचओ चा फुल फॉर्म आहे World Health Organization. यालाच मराठी मध्ये जागतिक आरोग्य संघटना असे म्हणतात. ज्याचे मुख्यालय स्विझरलँड देशामधील जिनिव्हा शहरामध्ये आहे.

डब्ल्यूएचओ चा अर्थ काय आहे (WHO meaning in Marathi)

डब्ल्यूएचओ चा अर्थ आहे जागतिक आरोग्य संघटना. ही एक अशी संघटना आहे जी संपूर्ण जगाच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत काम करत असते. या कोरोना च्या काळामध्ये सुद्धा सर्वांना यातून बाहेर काढण्यासाठी डब्ल्यूएचओ ने खूप मोलाचे कार्य केले आहे.

डब्ल्यूएचओ ची कार्ये काय आहेत (Works of WHO in marathi)

  • जगभरातील लहान मुले महिला आणि पुरुष यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कार्य करणे.
  • संक्रमणापासून होणारे आजार जसे की एचआयव्ही, इन्फ्लूएंजा, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या अनेक आजारांपासून जगभरातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • डब्ल्यूएचओ आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी सरकारला मदत करते.
  • आहार राहण्याची व्यवस्था, स्वच्छता इत्यादी कार्यामध्ये सुधारणा करण्याचे काम सुद्धा डब्ल्यूएचओ करते.
  • अत्यंत उपयुक्त आणि उच्च गुणवत्ता असणारी औषधे आणि उपचार लोकांपर्यंत पोहोचवणे.
  • डब्ल्यूएचओ ने इबोला, एचआईवी, स्मॉलपॉक्स आणि कुपोषण यांसारख्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी खूप मोलाची मदत केली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जागतिक आरोग्य संघटना कोणत्या देशात आहे?

डब्ल्यूएचओ चे मुख्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा शहरामध्ये आहे.

डब्ल्यूएचओ चा अर्थ काय आहे (WHO meaning in Marathi)

डब्ल्यूएचओ चा अर्थ आहे जागतिक आरोग्य संघटना. ही एक अशी संघटना आहे जी संपूर्ण जगाच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत काम करत असते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण डब्ल्यूएचओ काय आहे (WHO information in marathi), डब्ल्यूएचओ चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *