पहिले मराठी नाटककार कोण | Who was the first Marathi playwright

Who was the first Marathi playwright : मित्रांनो नाटक हा एक कला प्रकार आहे. या कला प्रकारामध्ये अनेक प्रसिद्ध नाटके झाली आहेत. परंतु आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की पहिले मराठी नाटककार कोण होते. तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पहिले मराठी नाटककार कोण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पहिले मराठी नाटककार कोण (Who was the first Marathi playwright)

Contents

नाटक मराठी माहिती (Natak mahiti marathi)

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यातली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही.

पहिले मराठी नाटककार कोण (Who was the first Marathi playwright)

मराठीमधील पहिले नाटककार विष्णुदास भावे नसून महात्मा ज्योतिराव फुले आहेत. मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठीमधील पहिले नाटक लिहिले होते. आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी नाटक या प्रकाराचा वापर करण्याचा हेतू महात्मा ज्योतिराव फुले यांचा होता. आणि यातूनच उगम झाला महाराष्ट्रातील पहिल्या नाटकाचा. मराठीमधील पहिले नाटक म्हणजे तृतीय रत्न.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी म्हणजेच सन 1855 झाली तृतीय रत्न हे नाटक लिहिले. मराठी रंगभूमीचा प्रारंभ 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी केला. परंतु पहिले मराठी नाट्य लेखन 1856 मध्ये झाले होते आणि तेही गो. म. माढगावकर यांच्या व्यवहारोपयोगी नाटक या पाच प्रवेश नाटकांपासून असे मानले जाते. परंतु या नाटका पूर्वीच सन 1855 मध्येच महात्मा ज्योतिराव फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले होते. आणि हेच मराठीतील पहिले नाटक आहे.

या नाटकाला रूढ कथानक नाही. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षु जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्नी, एक ख्रिश्चन धर्म उपदेशक, एक मुसलमान आणि एक विदूषक अशी एकूण आठ पात्रे या नाटकात आहेत. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एका भांडवलावर दुसऱ्या एका अंधश्रद्धा आणि अशिक्षित, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, याचे चित्रण या नाटकांमध्ये आहे. या नाटकांमधील विदूषक समाजप्रबोधनाचे काम करतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

गाजलेल्या मराठी नाटकांची नावे यादी

1) घाशीराम कोतवाल
2) सखाराम बाईंडर
3) नटसम्राट
4) वाऱ्यावरची वरात
5) जाणता राजा
6) वऱ्हाड निघालंय लंडनला
7) तो मी नव्हेच !
8) कट्यार काळजात घुसली
9) ऑल दि बेस्ट
10) सही रे सही

मराठी नाटकांची नावे

1) गंमत जंमत
2) चार दिवस प्रेमाचे
3) चूक भूल द्यावी घ्यावी
4) बे दुणे पाच
5) हसवाफसवी

नाटक हा कशाचा प्रकार आहे?

नाटक हा कवितेचा एक प्रकार आहे (दृश्यशास्त्र). जी रचना केवळ श्रवणानेच नव्हे, तर दृश्‍यातूनही श्रोत्यांना हृदयात रुचते, तिला नाटक किंवा दृश्य-काव्य म्हणतात.

शाकुंतल या नाटकाचे लेखक कोण?

शाकुंतल या नाटकाचे लेखक आण्णासाहेब किर्लोस्कर हे आहेत.

नाट्यमन्वंतर ही संस्था कोणी निर्माण केली?

नाट्यमन्वंतर ही संस्था संगीतकार केशवराव भोळे यांनी निर्माण केली.

थोरले माधवराव पेशवे या ऐतिहासिक नाटकाचे लेखक कोण?

थोरले माधवराव पेशवे या ऐतिहासिक नाटकाचे लेखक विनायक जनार्दन कीर्तने हे आहेत.

मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक कोणते?

मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक तृतीय रत्न हे आहे.

पाच अक्षरी मराठी नाटकांची नावे

1) अंमलदार
2) उद्याचे जग
3) कवडीचुंबक
4) कार्टी श्रीदेवी
5) कुटाळकंपू

चंद्रलेखा या नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्थेचे निर्माते

चंद्रलेखा या नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्थेचे निर्माते मोहन वाघ हे आहेत.

आंबा आणि गुलाबराव ही पात्रे कोणत्या नाटकातील आहेत?

आंबा आणि गुलाबराव ही पात्रे वरखाली दोन पाय नाटकातील आहेत.

विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक कधी सादर केले?

विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक 1843 मध्ये सादर केले.

नाटक ही कोणती कला आहे?

नाटक ही प्रेक्षकांसाठी दाखवली जाणारी दृक् व श्राव्य कला आहे.

एकांकिका हा नाटकाचा कोणता प्रकार आहे?

एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. एकांकिका ही एकरसात्मक, एककेंद्री, एकजिनसी नाट्यकृती असते.

एकांकिका म्हणजे काय?

एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका.

मराठीतील पहिली एकांकिका कोणती आहे?

श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक ही मराठीतील पहिली एकांकिका आहे असे मानतात.

संगीत शाकुंतल हे किती अंकी नाटक आहे?

संगीत शाकुंतल हे पाच अंकी नाटक आहे.

ऑल दि बेस्ट या नाटकाचे लेखक कोण?

ऑल दि बेस्ट या नाटकाचे लेखक देवेंद्र पेम हे आहेत.

रिंगणनाट्य हे नाटक पुढील प्रकारातील आहे?

रिंगणनाट्य हे नाटकाचा एक प्रकार आहे. रिंगणनाट्य हे पथनाट्यासारखे असते.

नाटक म्हणजे काय (Drama meaning in Marathi)

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते.

पहिले मराठी नाटककार कोण?

महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नाटक मराठी माहिती (Natak mahiti marathi) जाणून घेतली. पहिले मराठी नाटककार कोण (Who was the first Marathi playwright) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *