मित्रांनो मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय आणि प्रोसेसर म्हणजे काय याविषयी माहिती आपण गेल्या काही पोस्ट मध्ये पाहिली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर मधील फरक काय (Difference between Microcontroller and Microprocessor in Marathi) आहे याविषयी माहिती जाणून घेऊ या.

मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर मधील फरक (Difference between Microcontroller and Microprocessor in Marathi)
मायक्रो कंट्रोलर | मायक्रो प्रोसेसर |
याचा उपयोग एका Application मध्ये एक Single Task Execute करण्यासाठी केला जातो. | मायक्रोप्रोसेसर चा उपयोग मोठ्या ॲप्लिकेशन मध्ये केला जातो. |
मायक्रो कंट्रोलर ला एम्बेडेड सिस्टम चे हृदय म्हणतात. | मायक्रोप्रोसेसर ला कॉम्प्युटर सिस्टिमच हृदय असे म्हणतात. |
मायक्रो कंट्रोलर चा उपयोग कॉम्पॅक्ट सिस्टीम मध्ये केला जातो. | मायक्रोप्रोसेसर चा उपयोग कॉम्पॅक्ट सिस्टीम मध्ये केला जात नाही. |
मायक्रो कंट्रोलर च्या पूर्ण सिस्टिम चा खर्च खूप कमी असतो. | मायक्रोप्रोसेसर च्या सिस्टीम चा खर्च जास्त असतो. |
मायक्रो कंट्रोलर साठी कमी वीज खर्च होते. | मायक्रोप्रोसेसर साठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होते. |
जास्तकरून मायक्रो कंट्रोलर मध्ये पावर सेविंग मोड असतो. | जास्तकरून मायक्रो प्रोसेसर मध्ये पावर सेविंग मोड नसतो. |
मायक्रो कंट्रोलर ला रिप्लेस करणे खूप सोपे असते. | मायक्रोप्रोसेसर ला रिप्लेस खूप अवघड असते. |
मायक्रो कंट्रोलर मध्ये जास्त प्रमाणात रजिस्टर असतात त्यामुळे प्रोग्राम देणे खूप सोपे जाते. | मायक्रो प्रोसेसर मध्ये खूप कमी प्रमाणात रजिस्टर असतात त्यामुळे अनेक ऑपरेशन हे मेमरी च्या आधारावरच होतात. |
मायक्रो कंट्रोलर हे Harvard Architecture वर आधारित आहे. | मायक्रोप्रोसेसर हे Neumann model वर आधारित आहे. |
मायक्रो कंट्रोलर मध्ये Internal Controlling Bus वापरली जाते. | मायक्रो प्रोसेसर मध्ये RAM, ROM जोडण्यासाठी External Bus वापरली जाते. |
मायक्रो कंट्रोलर चा उपयोग प्रामुख्याने वाशिंग मशीन, MP 3 प्लेअर मध्ये केला जातो. | मायक्रोप्रोसेसर चा उपयोग प्रामुख्याने पर्सनल कॉम्प्युटर मध्ये केला जातो. |
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर मधील फरक (Difference between Microcontroller and Microprocessor in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.