गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते | Who was the first Chief Minister of Goa

Who was the first Chief Minister of Goa : गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. 30 may 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. परंतु अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते (Who was the first Chief Minister of Goa)आजच्या या पोस्टमध्ये आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Who was the first Chief Minister of Goa
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते (Who was the first Chief Minister of Goa)

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते (Who was the first Chief Minister of Goa)

गोव्याचे पहिले मुख्यमंत्रीदयानंद बाळकृष्ण बांदोडकर
जन्म12 मार्च 1911
मृत्यू 12 ऑगस्ट 1973
पक्ष एमजीपी
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते (Who was the first Chief Minister of Goa)

दयानंद बाळकृष्ण बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. याबरोबरच ते दमण आणि दीवचे देखील पहिले मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) प्रतिनिधित्व करताना, त्यांनी 1963, 1967 आणि 1972 च्या निवडणुका जिंकल्या आणि 1973 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सत्तेत होते.

त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे येथे 12 मार्च 1911 रोजी झाला. वडिलांचे नाव बाळकृष्ण व आईचे श्रीमती. त्यांच्या लहानपणीच त्यांचे मातृपितृछत्र हरपले. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे झाले. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही त्यांनी आत्मसात केल्या होत्या.

आवश्यक शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे यशस्वी खाणमालक म्हणून नावलौकिक व धनदौलत मिळविली. व्यवसायाने खाणमालक असलेल्या भाऊसाहेबांनी आपल्या खाणीवर काम करणाऱ्या मजुरांपासून ते मॅनेजरपर्यंत सर्व थरातील, कामगारांचे हित जपले होते. कामगारांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबांचे आरोग्य या बाबतीत ते जागरूक होते. खाणींची माती शेतात जाऊन शेतांची नासाडी होऊ नये यासाठी ते सदैव जागरूक असायचे. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली त्यामुळे ते दानशूर म्हणून ओळखले जायचे. त्यांचा विवाह सुशीलाबाई पेडणेकर यांच्याशी झाला होता.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते (Who was the first Chief Minister of Goa) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *