लंडन शहराविषयी माहिती मराठी | London information in marathi

London information in marathi : इंग्लंड आणि युनायटेड किंगडम यांची राजधानी असलेले लंडन हे शहर जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचा बिंदू आहे. लंडन हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर आहे.आजच्या या पोस्टमध्ये आपण लंडन शहराविषयी माहिती मराठी (London information in marathi) जाणून घेणार आहोत.

London information in marathi)
लंडन शहराविषयी माहिती मराठी (London information in marathi)

लंडन शहराविषयी माहिती मराठी (London information in marathi)

शहरलंडन
देश इंग्लंड
लोकसंख्या89 लाख (2021)
क्षेत्रफळ607 चौरस किमी.
संकेतस्थळhttps://www.london.gov.uk/
लंडन शहराविषयी माहिती मराठी (London information in marathi)

जगातील सर्वात मोठे राजघराणे म्हणजेच इंग्लंडची राणी त्यांच्या राजधानीचे शहर हे लंडन आहे. आजच्या काळामध्ये जर पर्यटनाचा विषय आला तर लंडन शहर जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. या शहरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत.

1) खरंतर बिग बेन हे टॉवर च नाव नाही तर टॉवर वर लावलेल्या एका घड्याळाच नाव आहे. त्याला द एलिजाबेथ टॉवर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

2) लंडन मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा इंग्रजी आहे. परंतु लंडन शहरांमध्ये 300 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. अनेक भारतीय लंडन शहरांमध्ये वसलेले आहेत. त्यामुळे इंग्रजीबरोबरच गुजराती बंगाली आणि पंजाबी भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात.

3) लंडनमध्ये टॅक्सी ची लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की, तुम्हाला लंडन शहरातील प्रत्येक गल्ली आणि जागेच नाव माहित आहे. या इतक्या साऱ्या जागांचं आणि गल्यांच नाव लक्षात ठेवण्यासाठी जवळ जवळ दोन ते चार वर्षे लागतात. आहे ना इंटरेस्टींग!

4) लंडन मधील Traflagar Square मध्ये लावलेला जॉर्ज वॉशिंग्टन यांचा स्टॅच्यू अमेरिकेतील इम्पोर्टेड मातीवर लावला आहे. कारण त्यांनी म्हटलं होतं की मी परत कधीही इंग्लंडच्या माती वर पाय ठेवणार नाही.

5) लंडन शहरांमध्ये राहणारे अर्धे लोक गोरे म्हणजेच White People आहेत.

6) 2016 मध्ये लंडनला राहण्याच्या कॅटेगिरी वरून जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात महाग शहर म्हणून घोषित केलं आहे.

7) 2014 मध्ये लंडनमध्ये जवळजवळ एक करोड साठ लाख लोक पर्यटनासाठी आले होते. आणि त्यामुळे सर्वात जास्त पर्यटक येणारे शहर म्हणून सुद्धा लंडनला ओळखले जाते.

8) लंडन हे शहर रोमन लोकांनी वसवले होते. त्यांनी त्याला Londinium हे नाव दिलं होतं. त्यानंतर त्याचं लंडन असं करण्यात आलं.

9) आता लंडनमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी 37 टक्के लोक लंडनमध्ये जन्मलेले नसून बाहेरून येऊन तेथे वसलेले आहेत.

10) लंडनमधील युवक आपल्या कमाईतील साठ टक्के हिस्सा आपल्या घराच्या भाड्यावर खर्च करतात. मग तुम्ही विचार करू शकता येथे घरे किती महाग असतील.

लंडन माहिती मराठी (London mahiti marathi)

11) लंडन मध्ये मुंबई आणि दिल्ली पेक्षा जास्त भारतीय भोजनालय आहेत.

12) सन 1952 मध्ये 5 डिसेंबर पासून ते नऊ डिसेंबर पर्यंत लंडनमध्ये इतकं प्रदूषण वाढलं होतं की, या कारणामुळे 12 हजार लोक मृत्युमुखी पडले होते.

13) लंडनच्या इतिहासातील सर्वात भयानक घटनांपैकी एक म्हणजे 1666 मध्ये लागलेली आग. शहराचा मोठा भाग आगीच्या ज्वाळांनी व्यापला होता कारण लंडनवासीयांची सुमारे 70,000 घरे आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाली होती. परंतु या मध्ये फक्त सहा लोकांचा मुर्त्यु झाला होता.

14) सोळाव्या शतकाच्या दरम्यान लंडन मध्ये असा नियम होता की आपण आपल्या पत्नीबरोबर रात्री नऊच्या नंतर भांडण करू शकत नाही. कारण याच्यामुळे होणाऱ्या आवाजामुळे दुसऱ्या लोकांना त्रास होईल.

15) लंडनमध्ये 70 पेक्षा जास्त अरबपती राहतात.

16) लंडन मधून जाणाऱ्या थेम्स नदीची लांबी 346 किमी आहे आणि ही जगातील एक सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते.

17) थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला 2000 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.

18) लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे.

19) पश्चिमात्य शास्त्रीय व रॉक संगीताच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात आहेत.

20) लंडन हे उच्च शिक्षणासाठीचे जगातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण 43 (युरोपात सर्वाधिक) विद्यापीठे आहेत.

लंडन विषयी काही रोचक तथ्य (Facts about London in marathi)

21) लंडनने आजवर 1908, 1948 व 2012 ह्या तीन वेळा ऑलिंपिक खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे.

22) रग्बी, क्रिकेट व टेनिस हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत.

23) जगातील सर्वात लहान पुतळा लंडनमध्ये बांधण्यात आला आहे. चीजचा तुकडा खात असलेल्या दोन उंदरांचा पुतळा जगातील सर्वात लहान पुतळा म्हणून ओळखला जातो. हे इतके लहान आहे की आपल्याला लक्ष द्यावे लागेल किंवा कोणीतरी आपल्याला त्याकडे निर्देशित केले पाहिजे.

24) जगातील टॉप टेन म्युझियम आणि गॅलरीपैकी तीन लंडनमध्ये आहेत आणि एकूण 857 आर्ट गॅलरी आहेत.

25) लंडनमध्ये युनेस्कोची चार जागतिक वारसा स्थळे आहेत: टॉवर ऑफ लंडन, मेरीटाइम ग्रीनविच, वेस्टमिन्स्टर पॅलेस आणि केव रॉयल बोटॅनिक गार्डन्स.

26) लंडनमध्ये दरवर्षी 197 हून अधिक सण साजरे केले जातात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण लंडन शहराविषयी माहिती मराठी (London information in marathi) जाणून घेतली. लंडन माहिती मराठी (London mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *