याक प्राणी माहिती मराठी | Yak information in marathi

Yak information in marathi : याक हा बैलाप्रमाणे दिसणारा परंतु पर्वतीय आणि थंड भागामध्ये आढळणारा एक प्राणी आहे. याकला स्थानिक भाषेमध्ये चमरी गाय या नावानेसुद्धा ओळखतात. या प्राण्याचे वैज्ञानिक नाव बोस ग्रुन्नियन्स आहे. याक हा प्राणी तिबेट, नेपाळ, लडाख आणि काश्मीर यासारख्या भारताच्या उत्तर भागांमध्ये थंड आणि निर्जन पठारा मध्ये आढळतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण याक प्राणी माहिती मराठी (Yak information in marathi) जाणून घेणार आहोत.

याक प्राणी माहिती मराठी (Yak information in marathi)

याक प्राणी माहिती मराठी (Yak information in marathi)

प्राणीयाक
जात सस्तन प्राणी
शास्त्रीय नाव Bos grunniens
आयुर्मान 15-20 वर्षे
याक प्राणी माहिती मराठी (Yak information in marathi)

1) याक हा एक असा प्राणी आहे जो शाकाहारी प्राण्यांच्या श्रेणीमध्ये येतो. हा प्राणी गवत भोजनाच्या रूपामध्ये खाणे पसंद करतो.

2) याक प्राण्यांची शिंगे खूप मोठी असतात. ज्याचा उपयोग तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये बर्फ तोडण्यासाठी करतो.

3) याक प्राण्यांचे शरीर लांब केसांनी झाकलेले असते. हे केस त्याला थंड प्रदेशांमध्ये गरम राहण्यासाठी मदत करतात.

4) याक हा प्राणी एक प्रकारची गाय आहे. परंतु हा जंगलांमध्ये आढळतो. याक या प्राण्याच्या काही प्रजाती पाळीव सुद्धा आहेत.

5) भारताच्या लडाखमध्ये याक या प्राण्याला दूध, मांस आणि त्याच्या त्वचेसाठी पाळले जाते.

6) याक प्राण्याचा उपयोग भारत आणि तिबेट यासारख्या कठीण रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी आणि ओझे वाहून नेण्यासाठी करतात.

7) याक हा प्राणी दिसायला काळा, पांढरा आणि जाड असतो.

8) याक प्राण्याचा खांदा उंच असतो, पाठ सपाट असते, आणि पाय छोटे असतात. छोटे पाय असल्यामुळे हिमालयामध्ये तो सहजपणे चढू आणि उतरू शकतो.

9) तिबेटमधील लोक याक च्या शेपटीचा उपयोग चामडा बनवण्यासाठी करतात.

10) मादा याक प्राण्याचा गर्भकाल 257 ते 270 दिवसांचा असतो.

याक माहिती मराठी (Yak prani mahiti marathi)

11) याक या प्राण्याची पिल्ले जन्मानंतर जवळजवळ पाच ते दहा मिनिटात उठू आणि चालू शकतात.

12) याक हा एक भित्रा प्राणी म्हणून सुद्धा ओळखतात.

13) जंगलामध्ये आढळणारा याक हा प्राणी शारीरिक रूपांमध्ये पाळीव याक पेक्षा मोठा असतो.

14) पाळीव याक प्राण्याचे वजन 600 ते 1100 पाउंड असते.

15) जंगली याक या प्राण्याचे वजन 2 हजार पौंड पेक्षा जास्त असते.

16) उत्तर अमेरिका या देशांमध्ये गाय पेक्षा जास्त याक पाळला जातो.

17) या प्राण्यांची प्रतिरोधक क्षमता खूप जास्त असते.

18) पाळीव याक (Bos grunniens) चा रंग काळा, राखाडी, किंवा पांढरा सुद्धा असू शकतो. याच्या सर्वांगावर लांब आणि खरखरीत केस असतात. याला ‘चमरी’, ‘चवरी’ किंवा ‘सुरागाय’ असे सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी याला तिबेटी बैल सुद्धा म्हणतात.

19) इंग्रजी शब्द “याक” हा तिबेटी भाषेतून आला आहे.

20) याक हा कळपामध्ये राहणारा प्राणी आहे. त्याच्या कळपात अनेक याक असतात.

याक विषयी काही रोचक तथ्य (Facts about yak in marathi)

21) याक कोणत्याही सस्तन प्राण्यापेक्षा जास्त उंचीवर राहतात.

22) 2008 मध्ये केलेल्या लोकसंख्येच्या अभ्यासात दिलेल्या संदर्भानुसार, जगात सुमारे 10,000 याक आहेत.

23) याक याला काही लोक तिबेटचा बैल असेही म्हणतात. त्याला ‘चमरी’ किंवा ‘चणवरी’ किंवा ‘सुरगाई’ असेही म्हणतात.

24) याक -40 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करण्यास सक्षम असतात. या तापमानात ते तलाव आणि नद्यांमध्ये आंघोळ करतानाही आढळले आहेत.

25) इतर गायींच्या प्रजातींप्रमाणेच, याकमध्ये एकापेक्षा जास्त पोट असतात ज्याचा वापर ते खाल्लेल्या वनस्पतींमधून यशस्वीरित्या सर्व पोषक तत्वे मिळवण्यासाठी करतात.

26) जंगली याक प्रामुख्याने तिबेटच्या उत्तरेकडील प्रदेशात आणि चीनच्या उत्तरेकडील काही भागांमध्ये आढळतात, ज्यात किंघाई आणि शिनजियांगचा समावेश आहे. ते भारतातील लडाख परिसरातही आढळतात. दशलक्ष वर्षांपूर्वी, भूतानमध्ये जंगली याक लोकसंख्या देखील आढळून आली होती परंतु आता या देशात ते नामशेष झाले आहेत.

27) जंगली याक हे मोठे प्राणी असू शकतात, परंतु ते त्यांच्या प्रचंड आकाराच्या तुलनेत खूप वेगाने धावू शकतात. ते नदीत आरामात पोहू शकतात आणि बर्फातूनही जाऊ शकतात.

28) जंगली याक मादीचे वजन नर जंगली याकच्या एकूण वजनाच्या एक तृतीयांश असते. प्रौढ नरांचे सरासरी वजन सुमारे 1000 kg असते, तर मादी याकचे वजन सुमारे 300 kg असते.

29) जंगली आणि घरगुती याक हे भक्षक नसून तिबेटच्या पठारावर आढळणाऱ्या तिबेटी लांडग्यांद्वारे त्यांची शिकार केली जाते.

30) चीनमधील काही प्रदेशांमध्ये याकचे दूध हे सुपरफूड मानले जाते. याकपासून मिळणारे दूध अत्यंत पौष्टिक मानले जाते आणि ते लोणी बनविण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

याक काय खातात?

याक शाकाहारी आहेत आणि प्रामुख्याने गवत खातात, परंतु पाने, साल आणि इतर वनस्पती देखील खातात.

याक किती काळ जगतात?

याक २०-२५ वर्षे राहू शकतात.

वाहतुकीसाठी याक वापरता येईल का?

होय, याकचा वापर डोंगराळ भागात वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो जिथे वाहने प्रवास करण्यास सक्षम नसतील.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण याक प्राणी माहिती मराठी (Yak information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. याक माहिती मराठी (Yak prani mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *