40+ फुलांची नावे मराठी व माहिती | Flowers name in Marathi

Flowers name in Marathi : फुले ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडतात. फूल हे फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो. फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, सणांमध्ये करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण फुलांची नावे मराठी (Flowers name in Marathi) आणि फुलांची माहिती मराठी (Flowers information in marathi) जाणून घेणार आहोत.

फुलांची नावे मराठी (Flowers name in Marathi)

40+ फुलांची नावे मराठी (Flowers name in Marathi)

Flowers Name फुलांची नावे मराठी
Crossandraअबोली
Daturaधोतरा
Oleanderकण्हेर
Sunflowerसूर्यफूल
Periwinkleसदाफुली
Marigoldझेंडू
Spanish Jasmineचमेली
Coral Jasmineपारिजातक
hibiscusजास्वंद
roseगुलाब
tuberoseनिशिगंध
lotusकमळ
Jasminजाई
Common Jasmineजुई
Chrysanthemumsशेवंती
Night cestrumरातराणी
Zinnia झिनिया
Daffodil ड्याफोडिल
Lilyलिली
Mogra मोगरा
Tulipट्युलीप
Mimusops elengiबकुळ
Umbrella Treeकेवडा
Frangipaniसोनचाफा
Yellow gingerसोनटक्का
Pansy पानसडी
Common Flax अळशी चे फुल
Annona Hexapetala हिरवा चाफा
Saussurea Obvallataब्रम्ह कमळ
Sweet granadillaकृष्ण कमळ
Bluewater Lilyनील कमळ
Cosmosकॉसमॉस
Dahliaडेलिया
Zinniaझिनिया
Water lilyपाण्यातील लिली
Blue Bellनीलघंटी
Poppyपॉपी
Irisआयरिस
Pansyबनफुल
Orchidऑर्किड
40+ फुलांची नावे (Flowers name in Marathi)

फुलांची माहिती मराठी (Flowers information in marathi)

1) अबोली

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. या फुलाचा गजरे करण्यासाठी वापर होतो. याच्या सालींपासून बनवलेले तेल जखमा लवकर भरून आणण्यासाठी वापरतात. या वनस्पतीला आवश्यक अशा खास मशागतीची गरज नसते. या फुलाचा रंग काहीसा केशरी असा असतो त्याला अबोली रंग अस म्हंटले जाते.

2) कण्हेर

कण्हेर हे भारतात अनेक ठिकाणी आढळणारे एक झाड आहे. याच्या फुलांच्या रंगावरून यास पांढरा अथवा पिवळा कण्हेर असेही म्हणतात. उद्यानांमध्ये, रस्त्याच्या कडेला आणि खाजगी बागांमध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून कण्हेर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

3) सूर्यफूल

अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारमाही वनस्पती आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले आहे. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. संकर पद्घतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत.

गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व इजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात.

4) सदाफुली

सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते.हे फुल बाराही महिने फुलले असते. सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त पाच पाकळ्या असतात. गुलाबी, पांढरी आणि जांभळी या तीन प्रकारात ही फुले आढळतात.

5) झेंडू

झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत.

दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा, दरवाज्याला आणि वाहनांना घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नवरात्रामधल्या सातव्या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात.

6) पारिजातक

पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे.

हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवणारा हा पारिजात “प्राजक्त” म्हणूनही ओळखला जातो. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात.

7) जास्वंद

भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात.

जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी उमललेले दिसते. जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात.

8) गुलाब

गुलाब ही एक बहु- वर्षीय, झुडूप, काटेरी, अतिशय सुंदर सुवासिक फुले असलेली फुलांची वनस्पती आहे. त्याच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी बहुतेक आशियाई मूळ आहेत. काही प्रजातींचे मूळ प्रदेश युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर पश्चिम आफ्रिका आहेत.

भारत सरकारने 12 फेब्रुवारी हा ‘रोझ-डे’ म्हणून घोषित केला आहे. गुलाबाचे फूल त्याच्या कोमलता आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणूनच लोक लहान मुलांना गुलाबाच्या फुलाची उपमा देतात.

9) निशिगंध

निशिगंध ही एक सुवासिक फुले देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पॉलियांथेस ट्युबेरोसा आहे. झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची एक ते दीड मीटर एवढी असते. निशिगंधाला हिंदीत रजनीगंधा तर इंग्लिशमध्ये ट्यूबरोझ नाव आहे. निशिगंधाची फुले रात्री फुलतात. म्हणून त्या फुलांना निशिगंधा म्हणतात.

एकेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले नेहमी बघायला मिळतात. या प्रकारची फुले असलेली जात शृंगार या नावाने ओळखली जाते. त्याचप्रमाणे दुहेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले सुहासिनी या नावाने कृषी क्षेत्रात परिचित आहे.

10) कमळ

कमळ हे चिखलात, पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे 100 जाती जगभर आढळतात. तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे.

इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळाची फुले सापडतात.कमळ हे भारताचे व व्हिएटनामचे राष्ट्रीय फूल आहे.कमळाची फुले उबदार असतात. कमळ हे विविध रंगात पाहायला मिळते. कमळाचे फळ खाण्यासाठी मखना या नावानी वापरतात. कमळ हे फूल देवी लक्ष्मीच्या हातात आपल्याला दिसते.

11) जाई

जाई हे एक प्रकारचे सुगंधी फूल असून तिच्या वेलीचा वेलवर्गीय कुळात समाविष्ट होतो. सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.

जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात. जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे या फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात.

12) शेवंती

शेवंती मुळची आशिया आणि युरोप या देशामधील आहे. शेवंती फुले विविध रंगाची असतात.शेवंती हे एक सुगंधी फूल आहे, त्याच्या झाडालाही शेवंती म्हणतात. पुदिण्याच्या वर्गातले हे झाड अतिथंड प्रदेशांपासून ते गरम हवेतही वाढते. शेवंतीच्या फुलांच्या वेण्या केसांत माळायची जुनी पद्धत आहे.

13) लिली

हे दिसायला बल्बपासून वाढणारी फुल दिसतात. हे फुल दिसायला बरीच मोठी असतात. लिली या फुलांच्या वनस्पती समूहाला संस्कृती व साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. यातील बहुतेक प्रजाती समशीतोष्ण उत्तर गोलार्धातील आहेत. तरीही त्यांचा विस्तार उत्तरेकडील उपनगरातसुद्धा आहे. इतर अनेक फुलांच्या नावांमध्ये “लिली” आहेत परंतु ते खर्या लिलीशी संबंधित नाहीत.लीली जांभळा, पांढरा व अनेक रंगांचे राहतात.

14) मोगरा

मोगरा हे एक प्रकारचे अत्यंत सुवासिक फूल आहे. याच्या वेलीचा झुडपासारखा विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलापासून अत्तरही तयार केले जाते. मोगऱ्याचे फूल पांढऱ्या रंगाचे असते, त्याला बिया नसतात. हे फुल 2.5 सेमी चे असते.

मोगर्‍याला बिया नसतात. त्याची रोपे तयार करावी लागतात. हे बहुवार्षिक पिक आहे, यासाठी जमिनीची चांगली नांगरट करावी लागते.

15) ट्यूलिप

ट्यूलिप ही वसंत ऋतूमध्ये फुलणारी वनस्पती आहे. ही फुले सर्वात सुंदर आणि आकर्षक आहेत. फुलांचा रंग मोत्यासारखा पांढरा असतो आणि पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस गुलाबी जांभळ्या रंगाचे पट्टे राहतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पाच फुलांची नावे (5 flowers name in Marathi)

पाच फुलांची नावे पुढीलप्रमाणे : कमळ, गुलाब, मोगरा, लिली, झेंडू.

Tulip flower name in Marathi

पलांडू कुलातील ट्यूलिपा वंशातील कोणत्याही वनस्पतीला ट्यूलिप हे सर्वसाधारण नाव आहे.

दहा फुलांची नावे (10 flowers name in Marathi)

झिनिया, ऍस्टर, डेलिया, जास्वंद, आबोली, चाफा, सदाफुली, चमेली, ऑर्किड, सूर्यफूल.

Jasmine flower in marathi

जास्मिन फुलला चमेली असे म्हणतात.

पांढऱ्या फुलांची नावे (White flowers name in Marathi)

लिली, ऑर्किड, ट्यूलिपा, पांढरा गुलाब,

20 flowers Name in Marathi

आजच्या या लेखात आपण 20 फुलांची नावे जाणून घेतली आहेत.

प वरून फुलांची नावे

पारिजातक, पानसडी, पॉपी.

सुवासिक फुलांची नावे

जास्वंद, गुलाब, झेंडू, अबोली, चाफा ही सुवासिक फुले आहेत.

झुडपांना येणारी फुलांची नावे

जास्वंद, गुलाब ही झुडपांना येणारी फुले आहेत.

लाल फुलांची नावे

गुलाब, पॉपी, ट्यूलिप्स, लाल सूर्यफूल, कॉसमॉस ही लाल रंगाची फुले आहेत.

दिवसा फुलणारी फुलांची नावे

गुलाब, धोतरा, झेंडू ही दिवसा फुलणारी फुले आहेत.

र वरून फुलांची नावे

रातराणी, रेन लिली, रॉक गुलाब

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 40+ फुलांची नावे मराठी (Flowers name in Marathi) जाणून घेतली. फुलांची माहिती मराठी (Flowers information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. Fulanchi mahiti marathi जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

One thought on “40+ फुलांची नावे मराठी व माहिती | Flowers name in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *