Rain poems in marathi – Paus Kavita Marathi : मित्रांनो आपल्या या निसर्गामध्ये अनेक बदल घडत असतात. त्यातील एक बदल म्हणजे ऋतू. पावसाळा हा ऋतू अनेक लोकांना खूप आवडतो. विशेष म्हणजे लहान मुलांना. कारण लहान मुलांना पाण्यात भिजायला खूप आवडते. आणि याच बरोबर लोकांना पावसाविषयी कविता वाचायला सुद्धा खूप आवडतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पाऊस कविता मराठी (Rain poems in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 पाऊस कविता मराठी (Rain poems in marathi)
- 1.1 पाउस कविता मराठी (Paus Kavita Marathi)
- 1.2 पहिला पाऊस कविता मराठी (Pahila paus kavita)
- 1.3 पाऊस मनीचा कविता मराठी
- 1.4 पुन्हा कालचा पाउस कविता मराठी
- 1.5 हा पहिला पाऊस कविता मराठी
- 1.6 पाऊस (Rain poem in Marathi)
- 1.7 परतीचा पाऊस
- 1.8 बाहेर बरसती धारा रे
- 1.9 आता घे दुवा
- 1.10 पाऊस आलाय भिजून घ्या
- 1.11 पाऊस कविता मराठी शांता शेळके
- 2 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 3 सारांश (Summary)
पाऊस कविता मराठी (Rain poems in marathi)
पाउस कविता मराठी (Paus Kavita Marathi)
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
सांडून जातो धुवांधार
आसुसलेलं, थबकलेलं..
बरंच काही
मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी,
पण आपल्या मनातलं
सारं काही शहाण्यासारखं समजून घेत
हवं तेव्हा, हवा तसा
आपल्यासाठीच भरून येतो..
निवळशंख पाणी
एक थेंब, दोन थेंब..
आभाळभर रांगच रांग;
पुन्हा थेंब, त्यात पाऊस..
नितळ नितळ करत जातो,
बरंच काही, आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
पहिला पाऊस कविता मराठी (Pahila paus kavita)
आल्या पावसाच्या धारा
संगे घेऊनिया वारा
पानापाचोळ्यांचा सडा
उडे गगनात सारा
मेघ नभात साचता
कृष्ण धवलं नजारा
आल्या चैतन्याच्या लाटा
मोर फुलवी पिसारा
साऱ्या सृष्टीचा पसारा
भिजे चिंब चिंब सारा
वैशाखात तापलेल्या गंध
मातीचा तो न्यारा
धुंद होऊन विद्युलता
करी प्रकाशाचा मारा
साथ देई मेघराजा
वाजे सृष्टीचा नगारा
पाऊस मनीचा कविता मराठी
पाऊस मनीचा कधी सरणार आहे
काठोकाठ प्याला आता भरणार आहे
बंध मनाचे सारे तुटले आता हे
दुःख आसवांत सजणार आहे
अडखळले जे गीत निःशब्द भावनांचे
शब्दातून ओठावर ते फुलणार आहे
यातना हृदयातल्या डोळ्यांत साचलेल्या
सांग कधी दुःखात भिजणार आहे
सावली आता मज सोडून जाणार
अंधारच तिचे अस्तित्व पुसणार आहे
पुन्हा कालचा पाउस कविता मराठी
आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर
हा पहिला पाऊस कविता मराठी
सुखावणारा हा पहिला पाऊस
मला नित्य वेगळा भासतो
मनात साठलेल्या आठवणींना
हळूच ओले करतो
मग या अल्लड पावसात मी
जणू बेधुंद होऊन नाचतो
अन् सरी अलगद झेलताना
बालपणांतील आठवणीत रमतो
पावसाच्या सरी अंगावर येताच
मी चिंब चिंब भिजून जातो
अन् लहान होऊन जरासा
खट्याळ खोड्या मी करतो
हवा हवासा वाटणारा हा पाऊस
नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो
धावपळीच्या जीवनातही पुन्हा
बालपणाचे सुखद क्षण देऊन जातो…
पाऊस (Rain poem in Marathi)
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,
गारठलेल्या संध्याकाळी हिरवीचिंब पायवाट…
कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय, कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरतोय… बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण
कोणी पावसात आसवे लपवून हलके करतोय आपले मन… कोणासाठी गर्द गहिरा कोणासाठी हिरवे रान
पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी हरवून जाई मनाचे भान…
परतीचा पाऊस
ढगांचा गडगडाट आणि
विजांचा कडकडाट
ओल्या मातीचा कोवळा गंध
चालला तो चिंब
वसुंधरेला भिजवून सृष्टीला विजयाची देऊनी सलामी
परतूनी चालली पावसाची स्वारी
श्रीगजाननावरती वाहूनी अक्षता
नवरात्रीत अंबेमातेसोबत
रास तो खेळला
ढोलताशांसंगे रंगत त्याची न्यारी
परतूनी चालली पावसाची स्वारी
इंद्रधनुचे नभी उधळूनी रंग
ढगांचे पुंजकेही झाले खेळात दंग
रेशमाच्या सरींचा
इंद्रधनुचे नभी उधळूनी रंग
ढगांचे पुंजकेही झाले खेळात दंग
पानाफुलासोबत संग रोमांचित झाले
सृष्टीचे अंग अंग
बाहेर बरसती धारा रे
मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे
स्थिर अचल दिशांतुन दाही
निःशब्द वेदना काही
का व्याकुळ आज किनारा रे
बाहेर बरसती धारा रे
मी उन्मन, काही सुचेना
लाटांत निमंत्रण प्राणां
भरतीत मलाच इशारा रे
बाहेर बरसती धारा रे
आता घे दुवा
का रं पावसा असा
कहर अवेळी मांडला?
शेतकरी राजा माजा
पार ओरबाडूनी गेला !
ग्याल सारं पिकपाणी
स्वप्न पण विखुरली,
घामाची, कष्टाची त्याज्या
झोळी पण रीती झाली !
नको रं असा कोसळु
ठेव जाणिव लेकरांची,
ऐकलसा खुप शिव्याशाप
आता घे दुवा तरी त्यांची !
झाल गेलं तो विसरतो
जुपल पुन्हा तो कामाला,
दिवु नकोस रं तू दगा
अजाबात पुढल्या वक्ताला !
पाऊस आलाय भिजून घ्या
पाऊस आलाय?.भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
पाऊस कविता मराठी शांता शेळके
आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥
कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥
लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥
झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥
वीज कडाडतां, भय दाटे उरीं
एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- पु ल देशपांडे कविता (Pu La Deshpande poems in marathi)
- शांता शेळके यांच्या कविता (Shanta Shelke Poems in Marathi)
- बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (Bahinabai Chaudhary poems in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पावसावर आधारित पाच कविता
या लेखामध्ये पावसावर आधारित पाच कविता आहेत.
काल मार्क्स ही कोणाची कविता आहे?
काल मार्क्स ही नारायण सुर्वे यांची कविता आहे.
पाऊस आला या कवितेचे लेखक कोण?
पाऊस आला या कवितेचे लेखिका शांता शेळके आहेत.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाऊस कविता मराठी (Rain poems in marathi) जाणून घेतल्या. पाउस कविता मराठी (Paus Kavita Marathi) तुम्हाला कश्या वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या कविता आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
Hii very nice poem