महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे | State tree of Maharashtra in Marathi

State tree of Maharashtra in Marathi : मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. आणि अनेक वृक्षांचा उपयोग आपण गेल्या काही शतकांपासून करत आलो आहे. परंतु आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे म्हंटल्यावर प्रश्न पडतो. म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे (State tree of Maharashtra in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे (State tree of Maharashtra in Marathi)

महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे (State tree of Maharashtra in Marathi)

तुम्हाला माहित आहे का?

आपल्या महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे ज्याला इंग्लिश मध्ये मँगो (Mango) असे म्हणतात. याचेच Botanical Name Mangifera indica आहे.

आपल्या महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे ज्याला इंग्लिश मध्ये मँगो (Mango) असे म्हणतात. याचेच Botanical Name Mangifera indica आहे. आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील 250 ते 300 लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.

जगाच्या आंबा उत्पादनापैकी 56 टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास 1300 जातींची नोंद आहे. परंतु 25 ते 30 जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये केशर या आंब्याच्य जातीची लागवड वाढली आहे.

आंब्याला धार्मिक कार्यातही खूप मह्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात.

आंब्याचे झाड (Mangifera Indica) हे साधारणपणे 35 ते 40 मीटर उंच असते. त्याचा घेर साधारणपणे 10 मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असून पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान 15 ते 35 सेंटिमीटर लांब तर 6 ते 16 सेंटिमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.

संस्कृत भाषेत आंब्याला आमराह म्हणतात, त्यामुळे हिंदी , मराठी , बंगाली, मैथिली इत्यादी भाषांमध्ये याला “आंबा” हे नाव पडले. मल्याळममध्ये त्याचे नाव मान आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे?

महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे (State tree of Maharashtra in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *