जिराफ प्राणी माहिती मराठी | Giraffe information in marathi

Giraffe information in marathi : जिराफ हा आफ्रिकेच्या जंगलामध्ये आढळणारा एक प्राणी आहे. हा प्राणी जिराफिडे पशु परिवाराशी संबंधित आहे. तो आपल्या विशिष्ट शारीरिक रचना साठी ओळखला जातो. लांब पाय आणि लांब मान यामुळे जिराफ सर्वात उंच प्राणी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जिराफ प्राणी माहिती (Giraffe information in marathi) जाणून घेणार आहोत.

Giraffe information in marathi
जिराफ प्राणी माहिती (Giraffe information in marathi)

जिराफ प्राणी माहिती (Giraffe information in marathi)

प्राणीजिराफ
शास्त्रीय नाव जिराफा कॅमलोपॅरार्डालिस
कुटुंबजिराफिडे
वर्गArtiodactyla
आयुर्मान10 ते 25 वर्षे
जिराफ प्राणी माहिती (Giraffe information in marathi)

तुम्हाला माहित आहे का?

जिराफ खूप खातात परंतु तरीही ते एका आठवड्या पर्यंत बिना पाण्याचे राहू शकतात. त्यांना पाण्याचा अधिकांश हिस्सा आहार ग्रहण करणाऱ्या वनस्पती मधून मिळतो.

1) जिराफ या शब्दाची उत्पत्ती अरबी भाषेतील शब्द अल जिराफा शब्दापासून झाली आहे. हा शब्द अरबी भाषा मध्ये आफ्रिकी भाषेमधून पोहोचला आहे.

2) जिराफ या प्राण्याच्या पूर्ण जगामध्ये नऊ प्रजाती आहेत. जे आकार, त्वचा, रंग आणि निवासस्थान अनुसार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.

3) जिराफ मुख्यता मैदानी प्रदेश येथे आढळतो.

4) जंगली जिराफ दहा ते पंधरा वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. आणि प्राणी संग्रहालयामध्ये हाच जिराफ वीस ते पंचवीस वर्षे जगू शकतो.

5) मादी जिराफ ला cow म्हणतात. नर जिराफ ला bulll म्हणतात. जिराफ च्या पिल्लांना Calf म्हणतात.

6) जिराफ एक शाकाहारी प्राणी आहे.

7) जिराफ साधारणपणे एका वेळेस 30 किलो अन्न खाऊ शकतो.

8) जिराफ या प्राण्याला एका दिवसामध्ये 75 किलो किंवा त्यापेक्षा अधिक भोजनाची आवश्यकता असते. म्हणजेच जिराफ आपला अधिकांश वेळा खाण्या मध्ये घालवतो.

9) जिराफ आपल्या शरीरामध्ये लांब काळापर्यंत पाणी साठवून ठेवते. कारण तो स्वतःला कधीही घाम येऊ देत नाही.

10) जिराफ एका वेळेस बारा गॅलन पर्यंत पाणी पिऊ शकतो.

जिराफ विषयी रोचक तथ्य (Facts about Giraffe in marathi)

11) जिराफ खूप खातात परंतु तरीही तो एका आठवड्या पर्यंत बिना पाण्याचा राहू शकतो. त्यांना पाण्याचा अधिकांश हिस्सा आहार ग्रहण करणाऱ्या वनस्पती मधुन मिळतो.

12) जिराफ या प्राण्याची साधारण उंची 4.6 ते 5.5 मीटर असते. म्हणजेच पंधरा ते अठरा फूट.

13) जगातील सर्वात लांब जिराफ George नावाचा Masal bull प्रजातीचा होता. ज्याची लांबी 19 फूट तीन इंच होती.

14) नर जिराफ चे वजन 1200 किलो आणि मादा जिराफ चे वजन 830 किलो असते.

15) जिराफ च्या शरिरावर असलेले पॅटर्न सर्वात वेगळे असतात. प्रत्येक जिराफ च्या शरीरावर वेगवेगळे पॅटर्न आढळतात.

16) जिराफ च्या शरीरावरील पॅटर्न वरून आपण त्याच्या वयाचा अंदाज लावू शकतो.

17) जिराफ खूप कमी झोपतो. जिराफ दिवसभरामध्ये दहा मिनिटांपासून ते दोन तासापर्यंत झोपू शकतो.

18) जिराफ प्राण्याचा गर गर्भकाळ 400 ते 460 दिवसांचा असतो.

19) मादा जिराफ एका वेळेस फक्त एकाच पिलाला जन्म देऊ शकते.

20) नवीन जन्मलेल्या जिराफ ची उंची जवळजवळ सहा फूट असते.

जिराफ ची माहिती मराठी (Giraffe chi mahiti marathi)

21) पिल्लांना पाळण्याची जबाबदारी पूर्णपणे मादी वर असते.

22) पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व स्तनधारी प्राण्यांमध्ये जिराफची शेपटी सर्वात लांब आहे.

23) जिराफ या प्राण्याचे हृदय दोन फूट लांब असते. आणि त्याचे वजन अकरा किलो ग्रॅम असते.

24) जिराफ या प्राण्याचे ब्लडप्रेशर खूप जास्त असते.

25) जिराफ धावताना त्याच्या हृदयाचे ठोके 170 प्रतिमिनिट पडतात.

26) जिराफ या प्राण्याची जीभ 45 सेंटिमीटर लांब होऊ शकते.

27) जिराफ आपल्या जिभेच्या मदतीने सहज कान साफ करू शकतो.

28) जिराफ 35 मैल प्रति किलोमीटर या वेगाने धावू शकतो.

29) जिराफ या प्राण्याची चालण्याची गती जवळ जवळ दहा मैल प्रतितास इतकी असते. असं त्याच्या लांब पायामुळे शक्य होतं.

30) जिराफ या प्राण्याची दृष्टी खूप चांगली असते.

जिराफ विषयी माहिती (Giraffe meaning in Marathi)

31) जिराफ मुख्यत्वे आफ्रिकेत आढळणारा प्राणी आहे.

32) जिराफचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमलोपॅरार्डालिस असे आहे.

33) जिराफ हा पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये सर्वात उंच प्राणी आहे.

34) जिराफ केवळ पायांच्या हाडांमध्ये असलेल्या यांत्रिक ताणामुळे त्याच्या शरीरावर सुमारे एक हजार किलोग्रॅम वजन उचलू शकतो.

35) जिराफचा वापर काही वैज्ञानिक प्रयोग आणि शोधांसाठीही केला गेला आहे. अंतराळवीर आणि लढाऊ वैमानिकांसाठी सूट विकसित करताना शास्त्रज्ञांनी जिराफच्या त्वचेच्या गुणधर्मांकडे लक्ष दिले आहे.

36) जिराफ हा रोमन लोकांनी गोळा केलेल्या आणि प्रदर्शित केलेल्या अनेक प्राण्यांपैकी एक होता.

जिराफ प्राण्याच्या प्रजाती

तज्ज्ञांनी जिराफच्या नऊ उपप्रजाती आकार, रंग, ठिपके आणि सापडलेल्या भागांच्या आधारे निश्चित केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत :

  • न्युबियन जिराफ
  • सोमाली जिराफ
  • पश्चिम आफ्रिकन जिराफ
  • थॉर्निकॉफ्ट किंवा रोडेशियन जिराफ
  • दक्षिण आफ्रिकन जिराफ
  • रोथचाइल्ड, बॅरिंगो किंवा युगांडाचा जिराफ
  • मसाई किंवा किलीमांजारो जिराफ
  • कॉर्डोफन जिराफ
  • अंगोलन किंवा नामिबियन जिराफ

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जिराफ कोठे राहतो?

साधारणपणे जिराफ खुल्या मैदानात आणि विखुरलेल्या जंगलात आढळतात. जिराफ अशा ठिकाणी राहणे पसंत करतात जेथे मुबलक बाभूळ किंवा किकरची झाडे आहेत कारण त्यांची पाने हे जिराफाचे मुख्य अन्न आहे. त्यांची मान लांब असल्यामुळे त्यांना उंच झाडांची पाने खाण्यात काहीच अडचण येत नाही.

जिराफ हा कोणत्या प्रकारच्या प्रदेशात वास्तव्य करणारा प्राणी आहे?

जिराफ मुख्यत्वे आफ्रिकेत आढळणारा प्राणी आहे.

जिराफ पाणी कसे पितात?

जिराफांना पाण्याच्या स्त्रोतातून पाणी पिण्यासाठी पाय पसरून खाली वाकावे लागते. त्यांच्या लांब मानेमुळे त्यांना उभे राहून पाणी पिण्यासाठीअवघड होते.

जिराफची जीभ किती लांब असते?

जिराफची जीभ 18 इंचांपर्यंत लांब असू शकते, ज्यामुळे त्यांना झाडे आणि झुडपांमधून अन्न मिळण्यास मदत होते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण जिराफ प्राणी माहिती (Giraffe information in marathi) जाणून घेतली. जिराफ ची माहिती मराठी (Giraffe chi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. Giraffe in marathi ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *