भारतीय अंतराळवीर नावे व माहिती | Indian astronauts information in marathi

Indian astronauts information in marathi : अंतराळवीर हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाश प्रवास करणारा मनुष्य आहे. राकेश शर्मा, कल्पना चावला यासारख्या अंतराळवीरांनी आपल्या भारत देशाचे नाव खूप मोठे केले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय अंतराळवीर नावे (Names of Indian astronauts) व भारतीय अंतराळवीरांची माहिती (Indian astronauts information in marathi) जाणून घेणार आहोत.

Indian astronauts information in marathi
भारतीय अंतराळवीर नावे व माहिती (Indian astronauts information in marathi)

भारतीय अंतराळवीर नावे (Names of Indian astronauts)

भारतीय अंतराळवीर नावे जन्मतारीख
राकेश शर्मा13 जानेवारी 1949
कल्पना चावला 17 मार्च 1962
सुनीता विल्यम्स19 सप्टेंबर 1965
भारतीय अंतराळवीर नावे

भारतीय अंतराळवीरांची माहिती (Indian astronauts information in marathi)

भारतीय अंतराळवीरांची नावे आता आपण जाणून घेतली आहेत. आता आपण भारतीय अंतराळवीरांची माहिती जाणून घेऊ या.

राकेश शर्मा

राकेश शर्मा

राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा 138 वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो 2 एप्रिल 1984 रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-11 यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. “अंतराळातून भारत कसा दिसतो?”, या प्रश्‍नाला त्यांनी “सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा’ असे अभिमानी उत्तर दिले होते. राकेश शर्मा यांनी अंतराळात रशियन अवकाशयानातून दिलेले हे उत्तर प्रत्येक भारतीयाला रोमांचित करून गेले होते. अशोक चक्र देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे. विंग कमांडर म्हणून निवृत्त झाल्यानंतर राकेश शर्मा यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये चाचणी पायलट म्हणून काम केले.

पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला मराठी माहिती

कल्पना चावला

ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगड धिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे.

कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. पंजाब विद्यापीठातून त्यांनी 1982 साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे 1984 मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून 1988 मध्ये डॉक्टरेट मिळवली.

डिसेंबर 1994 साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये 15 व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-87 वर काम केले. अवकाशात त्यांनी 376 तास व 34 मिनिटे प्रवास केला.

सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स

ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या 14 व्या मोहिमेवर व 15 व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (195 दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (7 वेळा) आणि जास्त वेळ (50 तास, 40 मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. 2012 मध्ये तिने 32 व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच 33 व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.

जून 1998 पासून NASA सोबत जोडलेल्या सुनीताने आतापर्यंत एकूण 30 वेगवेगळ्या स्पेसक्राफ्टमधून 2770 उड्डाणे केली आहेत. 2008 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पहिल्या भारतीय अंतराळवीर चे नाव काय?

राकेश शर्मा

अंतराळ म्हणजे काय?

अंतराळ म्हणजे पृथ्वीच्या पलीकडे आणि आकाशीय शरीर यांच्यामध्ये अस्तित्वात असलेला विस्तार.

अवकाश संशोधन म्हणजे काय?

अवकाशातील वेगवेगळ्या ग्रहांचा आणि पृथ्वीचा अभ्यास म्हणजे अवकाश संशोधन.

आकाश म्हणजे काय?

हा पृथ्वीवर केंद्रीत असलेला एक गोलाकार गोल आहे, ज्यावर सूर्य, तारे, ग्रह आणि चंद्र प्रवास करत आहेत.

अवकाश म्हणजे काय?

अवकाश, अंतरीक्ष किंवा अंतराळ म्हणजे विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात.
अंतरिक्षला इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जागेस अंतराळ, अंतरिक्ष किंवा अवकाश म्हणतात

कल्पना चावला यांचे कार्य

डिसेंबर 1994 साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये 15 व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-87 वर काम केले. अवकाशात त्यांनी 376 तास व 34 मिनिटे प्रवास केला.

अंतराळयान म्हणजे काय?

अंतराळयान म्हणजे अंतराळात जाण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे वाहन. अंतराळयानांचा दळणवळण व पृथ्वीनिरीक्षण यासाठी उपयोग होतो. अंतराळयानाचा उपयोग दळणवळण, पृथ्वीनिरीक्षण, हवामान, ग्रहांचा अभ्यास यांसाठी होतो. भविष्यकाळात याचा उपयोग खगोल पर्यटनासाठी होऊ शकतो.

भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे

बंगळुरू

भारताने आजवर कोणकोणते उपग्रह अवकाशात पाठवले आहेत?

इन्सॅट-2इ, इन्सॅट-3ब, इन्सॅट-3इ, कल्पना-1, जीसॅट-2, जीसॅट-3 व इन्सॅट-4 अ

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय अंतराळवीर नावे (Names of Indian astronauts) व भारतीय अंतराळवीरांची माहिती (Indian astronauts information in marathi) जाणून घेतली. अंतराळवीरांची नावे व फोटो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *