श्रीलंका विषयी माहिती | Shrilanka information in marathi

Shrilanka information in marathi : तसं तर श्रीलंका क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात लहान देश आहे. परंतु हा देश सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या खूप सजलेला आहे. बुद्धाचे दर्शन तमिळ आणि सिंहली राजनीती आणि अनेक पाहण्यासारखी ठिकाणे येथे या देशांमध्ये आढळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण श्रीलंका देशाची माहिती (Shrilanka information in marathi) जाणून घेणार आहोत.

Shrilanka information in marathi
श्रीलंका विषयी माहिती (Shrilanka information in marathi)

Contents

श्रीलंका विषयी माहिती (Shrilanka information in marathi)

देशश्रीलंका (Shrilanka)
राजधानीश्री जयवर्धनपुर कोट्टे, कोलंबो
सर्वात मोठे शहरकोलंबो
अधिकृत भाषासिंहला, तमिळ
लोकसंख्या2.14 कोटी (2020)
क्षेत्रफळ65,610 चौकिमी
राष्ट्रीय चलनश्रीलंकी रूपया (LKR)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+94
श्रीलंका विषयी माहिती (Shrilanka information in marathi)

श्रीलंका विषयी रोचक तथ्य (Facts about shrilanka in marathi)

1) भारताच्या दक्षिणेला फक्त 31 किलोमीटर अंतरावर श्रीलंका आहे.

2) 1972 पर्यंत श्रीलंकेचे नाव सिलोन होते, ज्याला बदलून नंतर लंका करण्यात आले. आणि 1978 मध्ये याच्यापुढे सन्मान सूचक शब्द म्हणून श्री जोडण्यात आला. आणि त्यामुळे या देशाचे नाव श्रीलंका असे झाले.

3) रामायण असे पहिले पुस्तक आहे ज्यामध्ये श्रीलंकेचे वर्णन केलं होते. तेही अगदी विस्तारित पणे.

4) भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये श्रीराम आणि वानर सेना यांच्याद्वारे बनवलेला रामसेतू आज सुद्धा आहे. मंदीराच्या अभिलेखा नुसार हा रामसेतू पूर्णपणे सागराच्या पाण्यावर स्थित आहे.

5) श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ हॉलीबॉल आहे. परंतु येथील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. 1996 मध्ये श्रीलंकेने क्रिकेट चा वर्ल्डकप सुद्धा जिंकला आहे.

6) आज पासून 2300 वर्षांपूर्वी श्रीलंकेमधील संपूर्ण लोकसंख्या हिंदू धर्माची मानली जात होती. इसवी सन तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोक ने आपला पुत्र महेंद्र याला श्रीलंके मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले होते. आणि मग तेथील राजाने बौद्ध धर्माला तेथील राजधर म्हणून घोषित केले.

7) श्रीलंके मध्ये काही जातीय समूह राहतात. ज्यामध्ये तमिळ आणि सिंहल प्रमुख आहेत.

8) श्रीलंकेमध्ये एकूण नऊ राज्य आहेत आणि सर्व मिळून 25 जिल्हे आहेत.

9) हिंदी महासागरामध्ये श्रीलंकेचा आकार एका मोत्यासारखा दिसतो. यामुळे याला हिंदी महासागराचा मोती असेसुद्धा म्हणतात.

10) श्रीलंके मधील सर्वात उंच पर्वत माऊंट पेड्रो हा पर्वत आहे. ज्याची उंची 2524 मीटर आहे. येथे जाण्याला मनाई आहे. कारण याचा उपयोग सैनिक कार्यासाठी केला जातो.

श्रीलंका देशाची माहिती (Shrilanka country information in marathi)

11) दक्षिण आशियामध्ये श्रीलंकेतील सर्वात जास्त साक्षर लोक आहेत. येथील साक्षरता दर 92 टक्के आहे.

12) इसवी सन अठराशे मध्ये श्रीलंकेच्या समुद्रावर इंग्रजांनी अधिकार गाजवला होता.

13) दुसऱ्या महायुद्धानंतर 4 फेब्रुवारी 1948 ला श्रीलंकेला इंग्रजांनी स्वातंत्र्य दिले.

14) श्रीलंका असा पहिला देश आहे ज्याच्या पहिल्या प्रधानमंत्री महिला होत्या. श्रीमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

15) श्रीलंकेमध्ये खूप सारे धबधबे आहेत. या देशाची वीज याच कारणामुळे येते.

16) अनुराधा पूर श्रीलंकेचे एक प्राचीन शहर आहे. जे जवळ जवळ चौदाशे वर्षापर्यंत या देशाची राजधानी होते. त्या वेळी याला अनुराधा पूर साम्राज्य या नावाने ओळखले जात होते.

17) श्रीलंकेमधील लोकांचे मुख्य भोजन भात आहे. त्याला ते तिन्ही वेळेस खूप आनंदाने खातात.

18) श्रीलंकेच्या शहरांमध्ये एक बौद्ध मंदिर आहे. जिथे भगवान बुद्धाच्या दाताचा एक अवशेष सुरक्षित ठेवलेला  आहे.

19) श्रीलंकेमध्ये एकमेव इंटरनॅशनल एअरपोर्ट कोलंबो शहरामध्ये आहे.

20) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला श्रीलंकेमध्ये दहापासून ते पंधरा हजार हत्ती होते. परंतु आता ती संख्या घटून सहा हजार झाली आहे.

श्रीलंका देशाची माहिती मराठी (Shrilanka mahiti marathi)

21) श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालचा उपसागर तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे.

22) भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत.

23) पर्यटनाच्या दृष्टीने देखील श्रीलंका या शहराला एक वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान आहे.

24) 4 फेब्रुवारी 1948 ला श्रीलंकेला ब्रिटन कडून स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे 4 फेब्रुवारी हा श्रीलंकेचा स्वातंत्र्य दिवस आहे.

25) 22 मे 1972 ला श्रीलंका हा देश प्रजासत्ताक देश बनला होता.

26) 65,610 चौकिमी हे श्रीलंकेचे क्षेत्रफळ आहे.

27) चहा, कॉफी, नारळ, रबर व मुळात श्रीलंकेची असलेली दालचिनी या पदार्थांच्या निर्यातीसाठी श्रीलंकेची ख्याती आहे.

28) उष्णकटिबंधीय वने, समुद्रकिनारे यांमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य हे पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंकेचे आकर्षण आहे. येथे नैसर्गिक मौल्यवान खड्यांच्या खाणी आहॆेत.

29) श्रीलंका हा शेतीप्रधान देश आहे. सखल भागात आणि डोंगउतारावर भातशेती केली जाते. डोंगरउतारावर पायऱ्या-पायऱ्याची शेती असते.

30) चहाची निर्यात करणारा श्रीलंका हा एक महत्वाचा देश आहे.

श्रीलंका विषयी माहिती (Shrilanka information in marathi)

31) श्रीलंकेत आंबा, केळी, फणस, पपई, अननस यांच्या बागा आहेत. लवंग मिरी, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेती होते.

32) श्रीलंका देश खनिज तेल, कापड यत्रे, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूची आयात करतो.

33) चहा, नारळ, रबराच्या वस्तू, मौल्यवान रत्ने, खोबरे, मसाल्याचे पदार्थ, दोरखड इत्यादी वस्तूची श्रीलंका निर्यात करतो.

34) बॉलिवूड मध्ये काम करणारी सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस श्रीलंका या देशाची आहे.

35) इतर देशांच्या तुलनेत श्रीलंका मध्ये आढळणारे नारळ मोठे असतात.

36) श्रीलंका मधील संगीत बैला (Baila) नावाने ओळखतात. ज्याला तेथील लोक खूप पसंद करतात.

37) श्रीलंका चा राष्ट्रीय पक्षी जंगली कोंबडा आहे.

38) श्रीलंका मध्ये प्राण्यांच्या 123, पक्ष्यांच्या 227, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 178 आणि उभयचरांच्या 122 प्रजाती आढळतात.

39) श्रीलंकेचा ध्वज, ज्याला सिंह ध्वज असेही म्हटले जाते, हा जगातील सर्वात जुना ध्वज मानला जातो.

40) श्रीलंका मधील महत्वाचे सण : सिंहली आणि तामिळ नवीन वर्ष, वेसाक, पोसॉन महोत्सव, कटारागामा महोत्सव, वेल उत्सव, दीपावली.

श्रीलंका विषयी माहिती (Shrilanka information in marathi)

41) 1505 मध्ये प्रथम पोर्तुगीजांनी श्रीलंके मध्ये पहिली वसाहत निर्माण केली, नंतर 1658 मध्ये डच आणि नंतर 1796 मध्ये ब्रिटिशांनी. शेवटी, 1948 मध्ये देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

42) श्रीलंकेकडे जगातील सर्वात कमी शक्तिशाली पासपोर्ट आहे.

43) मनुष्याने लावलेले सर्वात जुने जिवंत झाड श्रीलंकेत आहे. अनुराधापुरातील श्री महा बोधीची 2,000 वर्षांपासून सतत देखभाल केली जात आहे. हे भारतातील बोधगया येथून आणलेल्या कापणीतून उगवले गेले आहे, ज्या झाडाखाली बुद्धाना ज्ञानप्राप्ती झाली असे म्हटले जाते.

44) 2016 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला मलेरियामुक्त घोषित केले. 20 व्या शतकाच्या मध्यावर हा मलेरिया ग्रस्त देशांपैकी एक देश होता.

45) श्रीलंकेतील सर्वोत्तम राष्ट्रीय उद्याने : विल्पट्टू राष्ट्रीय उद्यान (WILPATTU NATIONAL PARK), गल ओया, वासगामुवा आणि कौदुल्ला राष्ट्रीय उद्याने (GAL OYA, WASGAMUWA AND KAUDULLA NATIONAL PARKS), बुंदला राष्ट्रीय उद्यान (BUNDALA NATIONAL PARK), मिनेरिया राष्ट्रीय उद्यान (MINNERIYA NATIONAL PARK).

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

श्रीलंका ची राजधानी (Capital of shrilanka) कोणती आहे?

श्रीलंका ची राजधानी श्री जयवर्धनपुर कोट्टे, कोलंबो आहे.

श्रीलंका ची लोकसंख्या (Population of shrilanka) किती आहे?

श्रीलंका ची लोकसंख्या 2.14 कोटी (2020) आहे.

श्रीलंका चे चलन काय आहे? (Currency of shrilanka)

श्रीलंका चे चलन श्रीलंकी रूपया (LKR) आहे.

भारत श्रीलंका यांच्यातील एक चिंचोळा समुद्र मार्ग

भारत श्रीलंका यांच्यातील एक चिंचोळा समुद्र मार्ग म्हणजे पाल्कची सामुद्रधुनी.

कोलंबो परिषदेत प्रामुख्याने कोणत्या भागातील लोकांचा विचार करण्यात आला?

कोलंबो परिषदेत प्रामुख्याने आशिया-पॅसिफिक प्रदेश भागातील लोकांचा विचार करण्यात आला.

पोर्तुगीजांनी श्रीलंकेत कशाचा व्यापार केला?

पोर्तुगीजांनी श्रीलंकेत मसाल्याचा व्यापार केला.

श्रीलंकेत कोणती शासन प्रणाली आहे?

श्रीलंकेत अर्ध-अध्यक्षीय प्रणाली आहे.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण श्रीलंका विषयी माहिती (Shrilanka information in marathi) जाणून घेतली. श्रीलंका देशाची माहिती (Shrilanka mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *